2.8 पानांची मांडणी
एक पिंपळाचे व एक मक्याचे पान घ्या. दोन्ही पानांच्या पर्णपत्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा.
पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर (vein) असते. यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागांत विभागल्यासारखे दिसते. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांचे एक जाळेच तयार होते, तर मक्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांस समांतर असतात. पिंपळाचे पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्यास (Reticulate venation) असणारे, तर मक्याचे पर्णपत्र समांतर शिराविन्यास (Parallel venation) असणारे असते.
फुलाला लांब किंवा आखूड देठ (Pedicel) असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते, तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार (Receptacle) असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात.
निदलपुंज (Calyx) : कळी अवस्थेत पाकळ्या
हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.
दलपुंज (Corolla) : दलपुंज पाकळ्यांनी (Petals)
बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर या फुलांच्या दलपुंजांचे आकार, गंध व रंग यांचे निरीक्षण करा.
पुमंग (Androecium) : फुलाचा हा पुल्लिंगी भाग
असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात.
जायांग : (Gynoecium) : फुलाचा हा स्त्रीलिंगी
भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते.
2. एक चांगले ब्लेड घ्या आणि फुलाच्या कुक्षीपासून (Stigma) देठापर्यंत उभा छेद घ्या. या दोन भागांपैकी प्रत्येक भागामध्ये सारखीच रचना तुम्हांला दिसेल.
परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन (Pollination) असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते.

फळ (Fruit)
आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा आकार, रंग, चव यांमध्ये विविधता आढळून येते. आंब्यात एकच कोय असते, तर फणसात असंख्य गरे व बिया असतात.
बोर, आंबा, चिकू, सफरचंद अशा फळांची निरीक्षणे करा. काय दिसते ? त्यांमध्ये कवचाची, गराची व बियांची रचना, संख्या वेगवेगळी असते. काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस आलेले असते.
शेंगदाणे, वाटाणा, गहू, ज्वारी या बिया तीन ते चार तास पाण्यात भिजवा. चिमटीने बी दाबा. कोणत्या बी चे दोन समान भाग होतात ते पहा. ज्याचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदल बी (Dicotyledons) म्हणतात, तर ज्यांचे दोन समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी (Monocotyledons) म्हणतात.
उतऱ्या वरून खालील प्रश्न सोडवा.
1.शिर म्हणजे काय
2. पानाची रचना कशी असते
3.पुष्पा धार म्हणजे काय
4.निदल पुंज म्हणजे काय
5.दलपंज म्हणजे काय
6.पुमंग म्हणजे काय
7.जायांग म्हणजे काय
8.परागी भवन म्हणजे काय
9.दविदल बी म्हणजे काय
10 एकदल बी म्हणजे काय
0 Comments