Subscribe Us

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श प्रत्येक भारतीयाने घ्यावा..डॉ किशोर वानखेडे

 आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नगर परिषद मैदान येथे अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा,समता परिषद,माळी सेवा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या कार्यक्रमा मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून  डॉ किशोर वानखेडे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून  काँग्रेस चे ज्येष्ठ नेते नानाभाऊ पाटील, तेजेंद्रासिंग चव्हाण, श्री भोजने साहेब श्री अजय तायडे, भाई सरदार,श्री गौतम भाऊ तेलंग,धोंडीराम जी खंडारे साहेब,अंबादास वानखडे उपस्थित होते या बरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महामानव यांच्या जीवन कार्यावर व्याख्यानातून प्रकाश टाकण्यात आला.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे करोडो भारतीयांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे एक  महान राष्ट्रनिर्माते आहेत.महात्मा फुले यांना गुरू स्थानी मानून त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक चळवळीला कळस चढविण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. मानवमुक्तीच्या लढ्याचे केंद्र बिंदू म्हणून कार्य करीत असताना वाणी आणि कृतीची जोड देत अस्पृश्यांना समतावादी, मानवतावादी,विज्ञानवादी बौद्ध धम्माची दीक्षा देत जागतिक धम्मक्रांति घडवून आणली.

ओबीसी बांधवांच्या हितासाठी १९५२ साली आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा देणारे एक सच्चे बहुजन उद्धार कर्ता म्हणून त्यांना ओळखले जातात. स्वतः सिडणेहम कॉलेज मध्ये प्राध्यापक असताना अर्थशास्त्रात संशोधन करण्यासाठी लंडन येथे जाऊन जागतिक दर्जाचे संशोधन केले.त्याचीच फलश्रुती म्हणून प्रॉब्लेम ऑफ रूपी ग्रंथ आपल्यास मिळाला.ज्यांच्या संकल्पनेतून रिजर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली असे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ म्हणून परिचित आहेत स्री,शेतकरी, कामगार ,कष्टकरी दलीत  यांच्या हितासाठी  सामाजिक लढे उभारणारे एक थोर लढवय्ये म्हणून क्रांतीच्या इतिहासात ते ओळखले जातात. 8 जुलै१९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ज्ञानगंगा लाखो भारतीयां पर्यंत पोहचवून त्यांचे जीवन घडविणारे कृतिशील शिक्षण प्रसारक आहेत.सामाजिक क्रांती करतानाच वैचारिक तथा साहित्यिक क्षेत्रातही भरीव कार्य केले.मूकनायक,बहिष्कृत भारत,जनता,प्रबुद्ध भारत सारखे नियतकालिकांतून प्रबोधनाची अग्नी सतत तेवत ठेवणारे झुंजार पत्रकार, परखड संपादक म्हणून आपल्याला ते परिचित आहेत.अनेक जागतिक कीर्तीचे ग्रंथ लेखन करून भारतीयांच्या ज्ञानाचा परिचय संपूर्ण जगाला त्यांनी करून दिला.भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेले संविधान लिहून सामाजिक क्रांतीला लिखित केले. कलम 17 ते 24 पर्यंत मूलभूत अधिकार ,कलम ४५ नुसार १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे,मोफत व सार्वत्रिक करणारे,त्यातून करोडो विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणारे एक महान शिक्षण क्रांतिकारक आहेत.

बुद्धा अँड हिज धम्म,द प्रॉब्लेम ऑफ रुपी,रिहोल्यूशन अँड काउंटर रिहोल्यूशन,हू वेअर शूद्रा? सारखे अनेक विद्ववत्ताप्रचुर ग्रंथ लिखाण करणारे जागतिक ग्रंथकार म्हणून ओळखले जातात.भारताच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक, धार्मिक,राजकीय,सांस्कृतिक,कृषी,विधी,उद्योग अशा सर्वांगिण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत सर्वांना न्याय मिळवून दिला.बुलडाणा जिल्ह्यात पातूर्डा येथे आयोजित धर्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून जिल्हा वासियांना मार्गदर्शन केले.न्याय,स्वतंत्र, समता,बंधुता ,समाजवाद ,धर्म निरपेक्षता,लोकशाही चा खंबीर आधारस्तंभ म्हणून बाबासाहेब यांचे कार्य प्रत्येकाने स्मरले पाहिजे .त्यांच्या विचारांवर चालणे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे.असे विचार व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम भाऊ तेलंग,संचालन पुरुषोत्तम बापू देशमुख तर आभार प्रदर्शन श्री अजय जी तायडे यांनी केले

Post a Comment

0 Comments