*आजच्या काळात फक्त महामानवांचे विचारच या जगाला तारू शकतात- प्रा. डॉ. किशोर वानखडे*
खामगाव: स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गोसे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे श्रमसंस्कार शिबिर ग्राम ज्ञानगंगापूर, ता. खामगाव येथे सुरू आहे.
सध्याच्या अवघड काळामध्ये महामानवांचे विचारच या जगाला तारू शकतात असे मत प्रा डॉ किशोर वानखडे यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील बौद्धिक सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांनी महापुरुषांनी ठरवून दिलेल्या मूल्य शिक्षणाचे घडे गिरविल्यास त्यांना आयुष्यातील कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही,महामानव यांनी दाखविलेला मानवतेचा मार्गच मानवाला तारू शकतो त्यांचे विचार स्व जीवन हेच खरे मानवतेचे आधारस्तंभ आहे त्यामुळे पुस्तकातून मानवतेचे पुजारी असलेले सर्व महामानव जीवनात आदर्श मानावे,तद्वतच सर्वांनी महापुरुषांद्वारा शिकवलेल्या मुख्य तत्वांचा बारीक अभ्यास करून ही तत्वे अंगीकारली पाहिजेत असेही त्यांनी सांगितले. महापुरुषांचे सुविचार केवळ ऐकून चालणार नाही तर ते आचरणात सुद्धा आणले पाहिजेत असे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक नागरिक यांनी व्यक्त केले. महिला कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका डॉ. नीता बोचे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले महापुरुषांचा अभ्यास करणे व त्यामधील सर्व बाबी चांगल्या पद्धतीने समजून घेणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असून सर्वांनी ते पार पाडले पाहिजेत असे मत यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. उमेश खंदारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन तोरणा ग्रुपचे गटप्रमुख प्रशांजीत गव्हांदे यांनी तर आभार प्रदर्शन अमरदीप सूर्यवंशी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश शर्मा, हरिष राऊत, शुभम पारखे, अक्षय बायस्कर, भूषण कोल्हे, ओम पुरी व रुद्राक्ष सोळंके यांनी मेहनत घेतली
0 Comments