Subscribe Us

शैक्षणिक विकासा द्वारेच राष्ट्र बांधणी शक्य,डॉ किशोर वानखेडे

 *शैक्षणिक विकासाद्वारे राष्ट्रबांधनी शक्य. --डॉ. किशोर वानखडे* 


         सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय खामगाव च्या राष्ट्रीय सेवायोजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर जनुना या गावी दि.29/01/2024 पासून सुरू आहे. या शिबिरामध्ये दि. 02/03/2024 ला दुपारच्या विशेष बौद्धिक सत्रा मध्ये शिबिरातील स्वयंसेवक व गावकऱ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. किशोर वानखडे उपस्थित होते यावेळी त्यांचे " राष्ट्रबांधणी आणि शिक्षण" या विषयावर  व्याख्यान संपन्न झाले.. आपल्या उद्बोधनात डॉ. किशोर वानखडे म्हणाले की शिक्षण हे राष्ट्रबांधणीचे प्रमुख साधन आहे. भारतीयांना कारकून म्हणून राज्यकारभारात सहभागी करून घेता यावे यासाठी इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था केली.परंतु त्याची दुसरी बाजू भारतीयांच्या जमेचीच झाली.या आधुनिक शिक्षण प्रणालीतून वैचारिक प्रबोधन चळवळ उदयास आली.याच काळात महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवत समतेचे दालन खुले केले.ब्रिटिश काळात 1854 सालाचा वुड यांचा शिक्षण खलीता,1882 चे हंटर कमिशन,1904 वर्षीचा विद्यापीठ कायदा,1917 सली तयार केलेला सदलर आयोग भारतीयांसाठी शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी उपयुक्त ठरले.परंतु शिक्षण प्रणाली पूर्णतः एक केंद्रित होती.स्वातंत्र्य नंतर 1948 चे राधाकृष्णन आयोग,1968 चे कोठारी आयोग,1986 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,2020 मध्ये अस्तित्वात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतीयांच्या शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारे ठरले.प्राचीन,मध्ययुगीन तथा आधुनिक काळात अस्तित्वात आलेल्या शिक्षण पद्धती युवक वर्गाला वैचारिक ,सामाजिक चळवळी कडे नेण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षण हेच आपल्या राष्ट्रबांधणीचा प्रमुख आधार आहे हे विसरता कामा नये.आणि म्हणून प्रत्येक भारतीयांनी शिक्षण हे फक्त पास होण्यासाठी न घेता शिक्षणाला स्वउन्नतीं ते राष्ट्रउन्नतीचा आधार बनवावा असे आवाहन विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रासेयो विभागाचे आणि विशेष श्रमसंस्कार शिबिराचे कार्यक्रमाधिकारी प्रा.गोपाल राखोंडे सर हे उपस्थित होते. राष्ट्र बांधणी करताना शिक्षणाला कोणताही पर्याय नसून शिक्षण हेच राष्ट्रबांधणीचे प्रमुख हत्यार असल्याचे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.गोपाल राखोंडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अलका कारणे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन अतुल सदाशिव व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.श्रेया चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला रासोयोचे स्वयंसेवकांसह असंख्य गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments