विद्यार्थ्यांनी शिवरायांचा निदान एकतरी गुण घ्यावा : शिवव्याख्याते प्रा डॉ किशोरजी वानखडे
खामगाव- स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. महाविद्यालय, खामगाव च्या रासेयो पथकाद्वारा शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रा डॉ किशोरजी वानखडे यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून झाली. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भारतीयांचेच नाही तर संपूर्ण जगाचे आदर्श आहेत. आमचे छत्रपती म्हणजे सदगुणांचा भांडार होते. उत्तम राज सत्तेच्या कौशल्यांचा एक अथांग महासागर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते असे प्रतिपादन यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक नागरिक यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जुलमी राजसत्तांविरुद्ध लढा देऊन रयतेचं राज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी
महाराज हे भारतीय इतिहासातील धाडसी आणि शिस्तप्रिय शासकांपैकी एक त्यामुळेच त्याचे आजही करोडो चाहते आहेत.त्यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे देशाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. त्याचे आचरण आणि विचार हे नेहमीच लाखो युवकांसाठी आपल्या भविष्यासाठी मार्गदर्शक राहिले आहेत . हे आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी नेहमीच मदत करतील. औरंगाजेबाच्या अतिबलशाली मुघल साम्राज्याला कडवा प्रतिकार देताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मजबूत ,कणखर मराठी सत्तेचा पाया घातला . त्यांचे जीवन, त्यांच्या सैन्य मोहिमा,शिवाजी महाराजांचे विचार आणि दूरदृष्टी आणि देशभक्ती अनेक शतकांपासून देशभक्त भारतीयांना प्रेरणा देत आहेत.आई जिजाऊचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्तित्वात आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी छत्रपतींचा निदान एकतरी गुण आपल्या आयुष्यात अंगीकारावा असे मार्गदर्शन शिवव्याख्याते प्रा डॉ किशोरजी वानखेडे यांनी केले. राजा शिवछत्रपती सांगायला सोपे आहेत, राजा शिवछत्रपती ऐकायलाही सोपे आहेत आणि राजा शिवछत्रपतींचा जयघोष करणे सुद्धा खूप सोपे आहे परंतु राजा शिवछत्रपती अंगीकारणे खूप कठीण आहे असे प्रतिपादन यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ पी बी उबाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले..
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन रासेयो स्वयंसेवकांनी राष्ट्रहिताकरिता सदैव तत्पर रहावे असे आवाहन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक नागरिक यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाचे संचालन श्री प्रशांजीत गव्हांदे यांनी केले. आभार प्रदर्शन कु. श्रुती खंडारे यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंद निकाळजे, ऋषिकेश वाघमारे,ओम राऊत, आकाश भोरे, प्रसाद गोरे, गौरव शेगोकार, गौरव धरमाळी, आकाश अस्वार, शुभम राठोड, रोहन ठाकरे, सागर वारे, विष्णु भिसे, प्रथमेश ताकवाले, महेश तायडे, महेश पवार, सुयोग चंद्रे, प्रेम करवते, प्रथमेश कोहळे, रामकृष्ण सोळंकी, पवन चव्हाण, पवन दाबेराव, दीपक सोळंके, गौरव चव्हाण, राहुल वस्काले, करण कोठारी, रोहन डवर, पवन सोळंके, रुचिता काळे, श्रुती खंडारे, अंजली करांगळे, पूजा बोचरे, स्नेहा रोटे, हरीश मुंढे इत्यादी रासेयो स्वयंसेवकांनी तथा स्वयंसेविकांनी मेहनत घेतली.
0 Comments