*गो से महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गोंधणापुर किल्ल्यास भेट आणि किल्ल्यात स्वच्छता मोहीम*
*दिनांक.16/12/23*
बुलडाणा जिल्ह्यातील सध्यस्थितीत पूर्ण शाबूत असलेल्या गोंधनापुर किल्ल्यास खामगाव येथील गो से विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव चे इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.संशोधन,महत्त्व,स्थापत्य, पर्यटन,सुरक्षा आणि संवर्धन या विषयाचे दृष्टीने हे भेट महत्त्वाची होती.
या सहली मध्ये एम ए इतिहास विभागाच्या विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.या किल्ल्याच्या सर्विस्तर इतिहास प्रा.डॉ किशोर वानखेडे यांनी सांगितला. यावेळी या किल्ल्याचे इतिहासातील महत्त्व,पी राजा परगणा चे वैशिष्ट ,किल्ल्याचे विविध भाग, परकोट,दरवाजे.बालेकिल्ला,भुयारी मार्ग ,येथील खोल्या,पाणी व्यवस्थापन, शौच कुप,खापरी नाल्या,पाय विहिरी, जिभी, चर्या ,जंग्या,फांजी,बुरुज, कमळ पुष्प,मोट,खालील भुयारी मार्ग,शस्त्रागार खोली,किल्लेदार कोठी,राजा राणी महाल,कारंजे,त्यावरील सुरक्षा कठडे,तोफा ठेवण्याच्या जागा तसेच किल्ल्याच्या इतर महत्त्वपूर्ण भागांची माहिती देण्यात आली. हा किल्ला नागपूर चे महाराज रघुजी राजे भोसले यांनी 1791 साली बांधला.त्या आधी गढी असून किल्ला सदृश्य अस्तित्वात होती. हा किल्ला नागपूर चे महाराजांचा ट्रेझरी म्हणून इतिहासात ओळखला जात होता.या किल्ल्यामध्ये पी.राजा परगण्यातील महसूल गोळा केल्या जात असे.किल्ल्याचे विविध भागांची माहिती घेत असताना किल्ला प्राथमिक स्वरूपात स्वच्छ ही करण्यात आला.येथीलच लक्ष्मी नारायण मंदिरास भेट देऊन मंदिर स्थापत्य,लक्ष्मी नारायण मूर्ती,विष्णू मूर्ती,द्वारपाल,मूर्ती चे निरीक्षण करण्यात आहे.किल्ला आणि मंदिर यांचे मध्ययुगीन काळातील महत्त्व जाणून घेण्यास ही सहल ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची ठरली .या सहली दरम्यान महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्राध्यापक संदीप शिंदे,डॉ किशोर वानखेडे, प्रा.सकल्प कापसे यांचे मार्गदर्शनात ही सहल आयोजित करण्यात आली.
0 Comments