Subscribe Us

वर्ग.8.नागरिक शास्त्र.भारताची संसद

 २. भारताची संसद


प्रश्न १ - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(१) लोकसभेवर पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात.

(अ) भौगोलिक मतदार संघ

(ब) धार्मिक मतदार संघ

(a) स्थानिक सरकारी संस्था

(ड) प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत

मतदार संघ

उत्तर - लोकसभेवर भौगोलिक मतदार संघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात.

(२) भारताचे हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

(अ) राष्ट्रपती

(ब) उपराष्ट्रपती

(a) पंतप्रधान

(ड) सरन्यायाधीश

उत्तर - भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात

प्रश्न २ शोधा आणि लिहा

(१) लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात.

उत्तर - लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात.

(२) कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे.

उत्तर - कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी संसदेची आहे.

प्रश्न ३ - पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.

उत्तर - कारण (i) राज्यसभा ही कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही. टप्प्या टप्प्याने राज्यसभेचे मोजकेच सदस्य निवृत्त होत असतात. (ii) राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो. त्यामुळे दर दोन वर्षांनी राज्यसभेचे सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले १/३ सदस्य निवृत्त होतात. पण त्यांच्या जागी पुन्हा तितक्याच नवीन सभासदांची नेमणूक केली जाते. (iii) सर्व सदस्य एकत्रितपणे निवृत्त होत नसल्याने राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह असे संबोधले जाते.

(२) लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.

उत्तर - कारण (i) लोकसभेचा उल्लेख भारतीय संसदेचे प्रथम सभागृह असा करण्यात आला आहे. यातील सभासदांची निवड जनतेकडून थेटपणे केली जाते. त्यात इतर कोणाचाही हस्तक्षेप नसतो. (ii) या सभागृहात जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात म्हणून या सभागृहाला पहिले सभागृह म्हणतात

 - खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.

(१) लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात.

उत्तर-(i) सार्वत्रिक निवडणुकांद्वारे लोकसभेच्या सदस्यांची निवड केली जाते. लोकसभेच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात. लोकसभा निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघाची आखणी करण्यात येते. (ii) काही वेळेला पाच वर्षांची मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधी ज्या निवडणुका घ्याव्या लागतात त्यांना मध्यावधी निवडणुका म्हणून संबोधले जाते. (iii) अनेकवेळा अनेक कारणांनी मुदतीच्या आधी लोकसभा विसर्जित झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. मात्र, असे अपवादात्मकच घडते.

(२) लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा.

उत्तर - लोकसभेच्या अध्यक्षांची कामे पुढीलप्रमाणे आहेत. (ⅰ) लोकसभेच्या सभागृहाचे कामकाज नियमितपणे चालविण्याची मुख्य जबाबदारी लोकसभा अध्यक्षांवर असते. लोकसभा ही ज्याप्रमाणे देशातील जनतेचे प्रतिनिधीत्व करते, त्याप्रमाणे अध्यक्ष हा लोकसभेचे प्रतिनिधीत्व करीत असतो. (ii) लोकसभेच्या सभासदांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जपणूक करण्याची जबाबदारी सुद्धा अध्यक्षांवर असते. सभागृहाची प्रतिष्ठा राखणे आणि नियमानुसार सभागृहाचे कामकाज चालविण्यावर त्यांचा भर असतो.

प्रश्न ४ - कायदानिर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा.

उत्तर - (i) लोकांचे हित जोपासता यावे आणि संविधानातील उ‌द्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. (ii) कायदा तयार करण्यापूर्वी कायद्याचा कच्चा मसुदा तयार करण्यात

येतो. याला कायदयाचा प्रस्ताव किंवा विधेयक असे म्हणतात. (iii) संसदेच्या लोकसभा व राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात येते. विधेयक निर्दोष व्हावे याकरिता विधेयक एका समितीकडे सादर केले जाते. विधेयकाच्या बाजू आणि त्रुटी लक्षात घेऊन दोन्ही सभागृहातील सदस्यांनी विधेयकाला मंजुरी दिली की राष्ट्रपर्तीच्या संमतीसाठी पाठवले जाते. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्या विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते.


रचनात्मक मूल्यांकन


तोंडी काम


प्रश्न १ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.


(१) संसद म्हणजे काय ?


उत्तर - राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला


'संसद' असे म्हटले जाते. (२) राज्यसभेत कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींची निवड केली जाते?


उत्तर- साहित्य, विज्ञान, कला, क्रिडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रांतील

(पा.पु. पृष्ठ.71)

घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा मिळतात. निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याचे भौगोलिक मतदारसंघात विभाजन केले जाते. मतदारसंघाची लोकसंख्या साधारणतः सारखी असते. विविध घटकराज्यांना लोकसभेत किती जागा आहेत. हे आंतरजालाच्या (इंटरनेट) माध्यमातून शोधा.

उत्तर महाराष्ट्र-48

मध्य प्रदेश-29

गोवा-२

गुजरात-26

उत्तर प्रदेश-80

उपक्रम

राज्यसभेत १२ सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, या सदस्यांची निवड करतांना कोणते निकष असतात याची माहिती मिळवा.

उत्तर - राज्यसभा सदस्यांपैकी १२ सदस्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते. त्यासाठी भारतीय नागरिकत्व, वयाची ३० वर्षे पूर्ण केलेली असणे हे निकष तर आवश्यक असतातच शिवाय साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक यासारख्या विविध क्षेत्रांतून सदस्य निवडावे लागतात. ज्या सदस्यांची निवड केली जाते त्यांनी त्या त्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेले असले पाहिजे. राजकारणा व्यतिरिक्त इतर सामाजिक क्षेत्रातून सदस्यांची निवड केली जाते. या सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य केलेल्या व्यक्ती या पदावर निवडले जातात. कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते.

(३) राज्यसभेचे संपूर्ण कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालवले जाते? उत्तर - राज्यसभेचे संपूर्ण कामकोज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले

जाते.

Post a Comment

0 Comments