(संसदीय शासन प्रणाली)
१. संसदीय शासन पद्धतीची ओळख
प्रश्न २- खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा
मंडळाचे नाव
कार्ये
(१)
कायदेमंडळ
कायद्यांच्या निर्मितीचे कार्य.
(२)
कार्यकारी मंडळ
कायद्यांची अंमलबजावणी करणे.
(३)
न्यायमंडळ
न्याय देण्याचे कार्य करते.
प्रश्न ३ - पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.
उत्तर - कारण (i) भारतात संसदीय संस्थांची निर्मिती ही ब्रिटिश राजवटीच्या काळातच झाली होती. (ii) त्या काळात ब्रिटिशांनीच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती केली होती. तेव्हापासूनच त्यांनी संसदीय शासनपद्धतीने राज्यकारभार चालविण्यास सुरुवात केली होती. त्यानंतरच्या काळात आपण ही पद्धती आत्मसात करावी की नाही या विषयावर संविधान सभेतही बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. (iii) संपूर्ण चर्चेनंतर संविधानकर्त्यांनी संसदीय शासन पद्धतीत भारताला अनुकूल असे काही बदल करून घेतले आणि त्यानंतर या पद्धतीचा स्वीकार केला. त्यामुळे भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.
(२) संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते
उत्तर - कारण (i) संसदेमध्ये कोणतीही गोष्ट नागरिकांवर लादली जात नाही. सार्वजनिक हितांच्या प्रश्नांवर संसदेत सर्व बाजूंनी चर्चा केली जाते. (ii) या चर्चेत फक्त सत्ता पक्षच नव्हे तर विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. त्यामुळेरान वाहू लागत
शासन नागरिकांवर कोणतीही गोष्ट लादू शकत नाही. (iii) योग्य ठिकाणी शासनाला मदत करणे, कायदे आणि धोरण तयार करताना त्यातील त्रुटींचा विचार करणे, प्रश्नांचा सर्व बाजूंनी विचार करून त्यांची मांडणी करण्याचे काम विरोधी पक्ष करीत असतो. त्यामुळे संसदेला निर्दोष कायदे तयार करणे सहज शक्य होते. म्हणून संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचार विनिमय महत्त्वाचे असते.
प्रश्न ४ - खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय ?
उत्तर - (i) प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ संसदीय शासनपद्धतीतील कार्यकारी मंडळ आहे. कार्यकारी मंडळ म्हणून कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि कायदेमंडळाशी संबंधित जबाबदारीसुद्धा त्यांनाच पार पाडावी लागते. (ii) प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ सर्व कृती आणि धोरणांसाठी कायदेमंडळाला जबाबदार असतात. (iii) कायदेमंडळाला सोबत घेऊनच त्यांना संपूर्ण कारभार सांभाळावा लागतो. म्हणून संसदीय शासनपद्धतीला जबाबदार शासनपद्धती असे म्हटले जाते.
(२) अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर - (i) अध्यक्षीय शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. (ii) या शासनपद्धतीत कार्यकारी प्रमुख असलेला राष्ट्राध्यक्ष जनतेकडून थेट निवडला जातो. (iii) तसेच या शासनपद्धतीत कायदेमंडळ वं कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो.त्यामुळे
प्राः१५ - विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का असते? याबाबत तुमचे मत लिहा. भत्तर- (i) संसदीय शासनपद्धतीमध्ये विरोधी पक्षाला महत्त्वाचे स्थान
असते. शासन जेव्हा राज्य कारभार चालवित असते तेव्हा अनेक सार्वजनिक हितांच्या प्रश्नांवर त्यांना निर्णय घ्यावे लागतात. (ii) हे निर्णय घेत असताना शासनाने त्यांच्या हातातील अधिकारांचा दुरुपयोग करू नये, कोणतेही अवाजवी नियम नागरिकांवर लादू नये, या सर्व बाबींवर लक्ष देण्यासाठी सत्ता पक्षाशिवाय बाहेरचे कोणीतरी हवे असते. (iii) कायदे करताना, सार्वजनिक हिताचे कोणतेही निर्णय घेताना ते नागरिकांच्या खरच हिताचे आहेत की नाही हे पुन्हा तपासून पाहाण्याकरिता वरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते. (iv) तसेच योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकते. विरोधी पक्षामुळे कोणतेही निर्णय घेताना दोन्ही बाजूंचा सर्वतोपरी विचार केला जातो.
प्रार१ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) शासनपद्धतीचे प्रकार कोणते ?
उत्तर - संसदीय शासनपद्धती व अध्यक्षीय शासनपद्धती हे शासनपद्धतीचे प्रमुख दोन प्रकार आहेत.
(२) संसदीय शासनपद्धतीत कोणते मंडळ श्रेष्ठ असते ?
ऊ .- संसदीय शासनपद्धतीत संसद / कायदेमंडळ श्रेष्ठ असत.
(३) भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक आविष्कार कोणता होता?
उत्तर- संसदीय शासनपद्धती हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक अविष्कार होता.
प्रश्न २ - हे प्रश्न तुम्हालाही पडले आहेत काय?
(पा.पु.पृष्ठ.68)
(१) संसदीय शासन पद्धती म्हणजे काय?
उत्तर- (i) संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभार चालविण्याची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. (ii) लोकांनी ज्या पक्षाला जास्त संख्येने निवडून दिले आहे, त्यांच्यातील एक नेता प्रधानमंत्री होतो आणि इतरांची मंत्रिपदावर निवड केली जाते. (iii) प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ देशाचा राज्यकारभार चालवितात. या एकूणच प्रक्रियेला संसदीय शासनपद्धती असे म्हणतात. यात लोकांनीच निवडून दिलेले सर्व प्रतिनिधी राज्यकारभार चालवित असतात.
(२) भारताचे प्रधानमंत्री आहेत, पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत
उत्तर - (i) भारतात प्रधानमंत्री आहेत, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. कारण दोन्ही देशातील शासनपद्धती वेगळी आहे. भारतात संसदीय शासनपद्धती आहे, तर अमेरिकेत अध्यक्षीय शासनपद्धती आहे. (ii) संसदीय शासनपद्धतीत जनतेकडून निवडून दिलेल्या बहुमतातील पक्षाचा नेता प्रधानमंत्री पदावर जातो, तर अध्यक्षीय शासनपद्धतीत राष्ट्राध्यक्षांची जनतेकडून थेट निवड केली जाते. त्यामुळे भारतात प्रधानमंत्री, तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष आहेत.(३) संसदीय शासनपद्धती आणि अध्यक्षीय शासनपद्धती यात काय फरक आहे ?
उत्तर - (i) संसदीय शासनपद्धतीत जनतेकडून निवडून दिलेल्या बहुमतातील पक्षाचा नेता प्रधानमंत्री पदावर जातो, तर अध्यक्षीय शासनपद्धतीत राष्ट्राध्यक्षांची जनतेकडून थेट निवड केली जाते. (ii) संसदीय शासन पद्धतीत प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ राज्यकारभार चालवितात. यात कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या तीनही शाखा शासनाच्या अधिकारात येतात. (iii) अध्यक्षीय शासनपद्धतीत शासनसंस्थांच्या तीनही शाखा एकमेकांपासून स्वतंत्र असतात. मात्र त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात.
0 Comments