Subscribe Us

वर्ग 8.इतिहास.असहकार चळवळ

 ७. असहकार चळवळ


प्रश्न १ - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(१) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात या देशातून केली.

(a) भारत

(ब) इंग्लंड

(a) दक्षिण आफ्रिका

(d) म्यानमार

उत्तर - गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केली.

(२) शेतकऱ्यांनी जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली.

(अ) गोरखपूर

(b) खेडा

(क) सोलापूर

(d) अमरावती

उत्तर - शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली.

३) जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या या किताबाचा त्याग केला.

(अ) प्रभु

(b) सर

(a) राव बहादूर

(ड) रावसाहेब'

उत्तर - जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला.

प्रश्न २ - पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर १९०६ च्या आदेशान्वये कोणती बंधने घातली गेली?

उत्तर - दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर १९०६च्या आदेशान्वये ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती.

(२) गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला ?

उत्तर- गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह चंपारण्यात केला.

(३) 'जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता?

उत्तर - जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी जनरल डायर हा होता.

प्रश्न ३ - पुढील प्रश्नांची उत्तरे २५ ते ३० शब्दांत लिहा.

(१) सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करा.

उत्तर - (i) सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे होय. (ii) सत्याग्रहाचे मुख्य उद्दिष्ट हे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तनकरणे होय. (iii) सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये, अशी गांधीजींची शिकवण होती.

(२) स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली?

उत्तर - सरकारची अडवणूक करण्याकरिता निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या मनात आली. त्याकरिता राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत १९२२ मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली.

प्रश्न ४- पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला.

उत्तर - कारण (i) रौलट कायद्याने कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. (ii) या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे रौलट कायदयाला भारतीय जनतेने विरोध केला.

(२) गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली.

उत्तर - कारण (i) फेब्रुवारी १९२२ मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा येथे शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. (ii) त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह २२ पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. त्यामुळे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली.

(३) भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला.

उत्तर - कारण (i) माँटेग्यू-चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा

असमाधानकारक असल्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता. (ii) या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने १९२७ मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. (iii) या सात सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय

सदस्य नव्हता. म्हणून भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. (४) भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली.

उत्तर - कारण (i) सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. (ii) खिलाफतीच्या प्रश्नावरून जर हिंदू- मुस्लीम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली, तर सरकार निश्चितच वठणीवर येईल, असे गांधीजींना वाटू लागले. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. म्हणून भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली.

प्रश्न १ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे सांगा.

(१) सत्याग्रहाचे उद्दिष्ट कोणते ?

उत्तर - अन्याय करणाऱ्या व्यक्तीला सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उ‌द्दिष्ट होते.

२) मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

( उत्तरे - मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले.

Post a Comment

0 Comments