Subscribe Us

वर्ग.8.नागरिक शास्त्र. केंद्रीय कार्य कारी मंडळ



३. केंद्रीय कार्यकारी मंडळ

प्रश्न १ - योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा.

(१) भारतातील कार्यकारी सत्ता (राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती) यांच्याकडे असते.

उत्तर - भारतातील कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीकडे असते.

(२) राष्ट्रपतीचा कार्यकाल (तीन, चार, पाच) वर्षांचा असतो.

उत्तर - राष्ट्रपतीचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.

(३) मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात. (पक्षप्रमुख, प्रधानमंत्री, राष्ट्रपती)

उत्तर मंत्रिमंडळाचे नेतृत्व प्रधानमंत्री करतात.

प्रश्न २ - ओळखा आणि लिहा.

(१) राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव

उत्तर - राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव कार्यकारी मंडळ आहे.

(२) अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ हा या नावाने ओळखतात.

उत्तर - अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ शून्य प्रहर या नावाने ओळखतात.

प्रश्न ३ - पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.

(1) महाभियोग प्रक्रिया

उत्तर- (i) राष्ट्रपतींनी जर संविधानाचा भंग केला असेल, तर त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. संविधानाचे रक्षण करणे ही राष्ट्रपतींची जबाबदारी आहे. मात्र त्यांच्या हातून असे काही वर्तन घडले की ज्यामुळे संविधानाचा भंग झाला, तर त्यांना संसद पदावरून दूर करू शकते. या प्रक्रियेला 'महाभियोग' प्रक्रिया असे म्हणतात. (ii) कोणतेही एक सभागृह या संदर्भातील आरोप करू शकते आणि दुसरे सभागृह त्याची चौकशी करते. जर दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने (२/३) ठराव संमत झाला, तर राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यात येते.

(२) अविश्वास ठराव

उत्तर - (i) कोणतेही सरकार बहुमताशिवाय कार्य करू शकत नाही. ज्यावेळी त्यांना मिळालेले बहुमत काढून घेण्यात येते तेव्हा त्यांना सत्ता सोडावी लागते.• 

बहुमत काढून घेण्याच्या या प्रक्रियेला 'अविश्वास ठराव' असे म्हटले जाते. (ii) हा ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा दयावा लागतो. मंत्रिमंडळाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. 'आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही' असे म्हणून संसद सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडला तर ते मंत्रिमंडळ सत्त्तेवर राहू शकत नाही. हा ठराव बहुमताने संमत झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. एखादे मंत्रिमंडळ सत्ता चालविताना आपलीच मनमानी करीत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.

(3) जंबो बोर्ड

उत्तर जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे खूप मोठे मंत्रिमंडळ होय. पूर्वी मंत्रिमंडळाचा आकार हा खूप मोठा होता. तशीच पद्धत पडली होती. कालांतराने मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे, असे वाटायला लागले. त्यामुळे संविधानात तशी - दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये असे निश्चित करण्यात आले.

प्रश्न ४- थोडक्यात उत्तरे लिहा

(१) मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा.

उत्तर - (i) कायद्यांची निर्मिती करणे आणि त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. कायदे निर्माण करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा घडवून आणणे, ते संसदेच्या सभागृहातून मंजूर करवून घेणे. (ii) कायदे मंजूर झाले की त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. सर्व विभागाचे मंत्री त्या-त्या विभागासाठी योग्य ते

धोरण किंवा कायदा मंजूर करवून घेतात. त्यामुळे त्यांचे कार्य अधिक सोईस्कर होते.

(२) संसद मंत्रिमंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते ?

उत्तर- (i) चर्चा, विचार-विनिमय, प्रश्नोत्तरे आणि अविश्वास प्रस्ताव यांसारख्या विविध मार्गांनी संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. (ii) मंत्रिमंडळाला कोणतेही धोरण किंवा कायद्याची अंमलबजावणी करायची असल्यास त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणावी लागते. अशा वेळेस अनेकदा काही मुद्द्यांवरून मतभेद होताना दिसतात. सभासदांचे समाधान न झाल्यास ते सभा त्यागही करतात. (iii) अधिवेशन काळातील दुपारी १२ चा वेळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो, यावेळी सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणता येते. याशिवाय मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे अविश्वास ठराव. सरकारचे एखादे धोरण सदस्यांना खटकणारे असले तर ते सरकारवर अविश्वास ठराव आणू शकते. असे झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा ट्यावा लागतो.

प्रश्न १ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख कोण असते ?

उत्तर - राष्ट्रपती संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात.

(२) प्रधानमंत्री मंत्री निवडतांना कोणत्या बाबींचा विचार करतात?

उत्तर - प्रधानमंत्री मंत्री निवडताना प्रशासकीय अनुभव, राज्यकारभाराचे कौशल्य,• 

कार्यक्षमता, विषयातील तज्ज्ञता यांचाही विचार करतात.

(३) कोणत्या विषयांवर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण/कार्याची दिशा ठरवावी लागते?

उत्तर - शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण / कार्याची दिशा ठरवावी लागते.

(४) शून्य प्रहर म्हणजे काय?

उत्तर - अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ म्हणजे शून्य प्रहर होय.

वर्ग कार्य / गृहपाठ

* करून पहा.

(पा.पु. पृष्ठ.76)

१. राष्ट्रपतींना दिल्या जाणाऱ्या शपथेचा मसुदा मिळवा. शिक्षकांच्या मदतीने त्यातील आशय समजून घ्या. उत्तर - सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या

पदाच्या कार्याची शपथ घेतात.

मी देवाची शपथ घेतो की मी श्रद्धापूर्वक भारताच्या राष्ट्रपती पदाची जवाबदारी सांभाळील तसेच आपल्या पूर्ण जबाबदारीने संविधान आणि कायद्याचे परिरक्षण, संरक्षण आणि प्रतिरक्षण करील. मी भारताच्या नागरिकांची सेवा आणि त्यांच्या कल्याणासाठी अविरत प्रयत्न करील.

उपक्रम

(१) जर तुम्ही प्रधानमंत्री झालात, तर कोणत्या कामांना प्रथम प्राधान्य दयाल, त्याची प्राधान्यक्रमानुसार यादी करून वर्गात सादरीकरण करा.

उत्तर- जर मी प्रधानमंत्री झाले/झालो तर देशाच्या बाह्य आणि अंतर्गत

सुरक्षाव्यवस्थेकडे प्राधान्याने लक्ष देईल. देशाची आणि देशवासीयांची सुरक्षीतता हे माझे प्रथम कर्तव्य राहील.

बाह्य शत्रूपासून देश सुरक्षित रहावा यासाठी सैन्यदलाचे सामर्थ्य वाढविण्यावर भर देईल, तसेच अंतर्गत नक्षलवाद, आतंकवाद आणि भ्रष्टाचार यांसारख्या समस्या सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात येतील.

सैन्यदलाच्या सक्षमीकरणासह पोलिस विभागातील समस्या सोडविण्यावर भर देण्यात येईल, त्यामुळे त्यांचे वैयक्तिक प्रश्न सुटून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यावर त्यांना लक्ष केंद्रीत करता येईल.

काही कायदे अधिक कडक करण्याचा प्रयत्न करील. जसे महिला, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधातील कायदे अधिक कडक करण्यात येतील. ग्रामीण भागावर आधारित रोजगारनिर्मितीवर भर देईल. कारण रोजगार मिळाला तर गुन्हेगारी कमी होते.

लोकप्रतिनिधी (आमदार खासदार) म्हणून निवडून येण्यासाठी जसे कोणतेही राजकीय पाठबळ आज आवश्यक आहे, तसे न ठेवता शिक्षणाची अट ठेवील.

Post a Comment

0 Comments