५. राज्यशासन
प्रश्न १ - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते.
(a) मुंबई
(ब) नागपूर
M
(a) पुणे
(d) औरंगाबाद
उत्तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते
(२) राज्यपालांची नियुक्ती कडून होते.
(a) मुख्यमंत्री
(b) पंतप्रधान
(a) अध्यक्ष
(ड) सरन्यायाधीश
स्तर राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती कडून होते.
(३) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार यांना असतो.
(a) मुख्यमंत्री
(b) राज्यपाल
(a) अध्यक्ष
(ड) सभापती
उत्तर- राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार राज्यपालांना असतो.
न २- तक्ता पूर्ण करा
a क्र.
सभागृहे
कार्यकाळ
५
सदस्य संख्या
निवडणुकीचे स्वरूप
प्रमुख
१.
विधानसभा
२८८
सार्वत्रिक निवडणुका
मुख्यमंत्री
२.
विधान परिषद 5
७८
दर दोन वर्षांनी
सभापती
प्रश्न ३ - टिपा लिहा.
(१) राज्यपाल
उत्तर - (i) विधिमंडळाचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार राज्यपालांना
असतो. केंद्रीय पातळीवर ज्याप्रमाणे राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटकराज्य पातळीवर राज्यपालांची भूमिका असते. (ii) राष्ट्रपती हे स्वतः राज्यपालांची नियुक्ती करतात. विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेल्या विधेयकाचे राज्यपालांच्या स्वाक्षरीशिवाय कायद्यात रूपांतरण होऊ शकत नाही. (iii) विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसतानाही जर एखादा कायदा काढण्याची गरज भासली तर तसा अध्यादेश राज्यपाल काढू शकतात.
(२) मुख्यमंत्र्यांची कार्ये
उत्तर - मुख्यमंत्र्यांची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. (i) प्रधानमंत्री ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व करतात, त्याप्रमाणे मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात. आपल्या राज्यातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाला सोबत घेऊन प्रयत्न करीत असतात. (ii) मंत्रिमंडळाची स्थापना करणे, खातेवाटप करणे, खात्यांमध्ये परस्पर समन्वय साधला जातो की नाही, हे पाहाणे आणि सर्वांच्या सहकार्याने नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. (iii) सर्व खात्यांमधील वाद दूर करून त्यच्याकडून राज्याच्या हिताचे काम करवून घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते.•
(२) संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली ?
उत्तर- (i) भारतासारखा मोठा भौगोलिक विस्तार असलेल्या देशाचा कारभार एका ठिकाणाहून चालविणे कठीण असल्याने संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली. (ii) भारताची लोकसंख्या अधिक आहे. भाषा, धर्म, चालीरिती व प्रादेशिक स्वरूपही भिन्न आहे. त्यामुळे एकाच केंद्रीय ठिकाणावरून संपूर्ण देशाचे कामकाज पाहाणे शक्य नव्हते. (iii) ही बाब विचारात घेऊन संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला. घटकराज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर करण्यात आली.
(३) खातेवाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो ?
उत्तर - (i) विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा मुख्यमंत्री निवडला जातो. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची स्थापना करतो. (ii) ही स्थापना झाल्यावर खातेवाटपाची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांवर असते. खातेवाटप करत असताना मंत्र्यांचा राजकीय अनुभव, त्यांचे प्रशासकीय कौशल्य, त्यांची लोकमताची जाण आणि नेतृत्व या सर्व बाबींचा विचार मुख्यमंत्र्यांना करावा लागतो.
प्रश्न १ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड केली जाते?
उत्तर - विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता
प्रश्न ४ - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) विधानसभेच्या अध्यक्षाचे कार्य स्पष्ट करा.
उत्तर- (i) विधानसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेचे कामकाज चालते. (ii) सभागृहाचे कामकाज शिस्तीत पार पाडण्याकरिता अध्यक्ष प्रयत्नरत असतात. त्यासाठी कार्यक्रमपत्रिका तयार करणे, कामकाजाची रूपक्षा ठरविण यासारखी जबाबदारी अध्यक्ष पार पाडीत असतात. याशिवाय नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याचा अधिकारही अध्यक्षांना असतो.मुख्यमंत्री म्हापूर निवडला जातो.
(२) मुंबई येथे कोणते अधिवेशन होते ?
मुंबई येथे अर्थसंकल्पाविषयीचे आणि पावसाळी अधिवेशन होते.
(३) मुख्यमंत्र्याचे कोणते काय आव्हानात्मक असते?
उत्तर- बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. मुख्यमंत्र्याचे हे काम आव्हानात्मक असते
0 Comments