Subscribe Us

वर्ग.8.नागरिक शास्त्र. नोकर शाही



प्रश्न १ - पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.

(१) संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते.

उत्तर - वरील विधान बरोबर आहे. (ⅰ) संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते. शासनाची कामे विविध खात्यांकडून केली जातात. (ii) प्रत्येक खात्याचा एक मंत्री असतो. तो मंत्री त्या खात्याचा प्रमुख असतो. त्या खात्यांतर्गत चालणारी सर्व कामे संबंधित मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकांच्या कल्याणासाठी केली जातात.

(२) केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षे‌द्वारे उमेदवार निवडतात.

उत्तर - वरील विधान चूक आहे. (ⅰ) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी केंद्रीय

 आयोग नव्हे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग उमेदवारांची निवड करते. (ii) केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार निवडले जातात. (iii) तर महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडले जातात.

M

प्रश्न २ - पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) सनदी सेवांमध्ये राखीव जागांचे धोरण आहे.

उत्तर - कारण (i) सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक सनदी सेवेतील संधीपासून

वंचित राहू नये याकरिता सनदी सेवांमध्ये राखीव जागांचे धोरण ठेवण्यात आले आहे. (ii) या सेवांमध्ये समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी हा यामागचा उद्देश आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांगांना सामाजिक अथवा आर्थिक विषमतेमुळे सनदी सेवांपासून वंचित रहावे लागू नये याकरिता ही राखीव जागांची तरतूद करण्यात आली आहे.

(२) सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे. उत्तर - कारण (i) कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी त्यांच्या

धोरणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे याकरिता सनदी सेवकांनी त्यांची राजकीय मते बाजूला ठेवून काम करणे अपेक्षित आहे. (ii) त्यासाठी नोकरशाही राजकीयदृष्ट्या तटस्थ असली पाहिजे असे म्हणतात. निवडणूक हरल्यावर एखादा पक्ष सत्तेपासून दूर होतो आणि त्याच्या जागेवर दुसरा पक्ष सत्ता स्थापन करतो. अशा वेळी आधिच्या सरकारच्या धोरणांना सोडून नवीन धोरणांची अंमलबजावणी करावी लागते. (iii) सनदी सेवक याठिकाणी जर• 

आपली राजकीय मते मध्ये आणत राहिला तर त्याला त्याचे काम योग्य पद्धतीने करता येणार नाही. त्याला या सरकारची धोरणेही तितक्याच समर्थपणे राबवावयाची असतात. त्यामुळे त्याने राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे.

प्रश्न ३ - खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा

१) खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा.

उत्तर- (i) एखाद्या खात्याचा कारभार योग्य पद्धतीने चालण्यासाठी त्या खात्याचे मंत्री आणि सनदी सेवक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. या दोघांमध्ये योग्य समन्वय असेल तर त्या खात्याचा कारभार योग्य पद्धतीने चालेल अथवा त्यांच्यातील मतभेदांचा परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होऊ शकतो. (ii) खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेत असले तरी त्यासाठी आवश्यक ती माहिती सनदी सेवक पुरवितात. योजनांची आवश्यकता, त्यासाठी असलेली आर्थिक तरतूद यासारख्या बाबींची माहिती सनदी सेवकालाच अधिक असते. (iii) त्यामुळे त्याने मंत्र्याला योग्य माहिती देणे आणि दोघांच्याही समन्वयातून त्यावर कृती होणे योजनेच्या यशापयशासाठी आवश्यक असते. त्यामुळे या दोघांमधील संबंधांवर एखाद्या योजनेचे यश-अपयश अवलंबून असते.

(२) नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा...

उत्तर- (i) नोकरशाहीचा कार्यक्षम सहभाग असेल तरच समाजासाठी आखण्यात आलेले कायदे आणि धोरणांची योग्य अंमलबजावणी होऊ शकते. समाजाच्या हिताचे कायदे किंवा धोरण मंत्री तयार करीत असले तरी त्याची अंमलबजावणी नोकरशाहीच्यामार्फतच होते. (ii) त्यामुळे समाजाचे लोकशाहीकरणकरण्यात नोकरशाहीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या धोरणांमुळेच राज्यव्यवस्था टिकून राहू शकते. त्यांना स्थैर्य प्राप्त होऊ शकते. (iii) नोकरशाहीचे सहकार्य नसेल तर शासनाने कितीही चांगले धोरण आखले आणि ते नागरिकांपर्यंत पोहोचलेच नाही, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

प्रश्न ५ नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर (i) नोकरशाही ही कायमस्वरूपी कार्यरत असणारी यंत्रणा आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ बदलू शकते पण त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणारी नोकरशाही बदलत नाही. (ii) कर गोळा करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, सामाजिक सुरक्षितता प्रदान करणे यासारखी कामे नोकरशाही सातत्याने करीत असते. कोणतेही सरकार सत्तेवर आले तर त्यांच्या या कामात परिवर्तन होत नाही. (iii) नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते. पाणी पुरवठा,.स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषण नियंत्रण यासारख्या सार्वजनिक सेवा नोकरशाहीमुळे आपल्याला अखंडीतपणे मिळत असतात. (iv) समाजासाठी त्यांनाही राजकीयदृष्ट्या तटस्थ राहून धोरण राबवावे लागते. तसेच कोणत्याही योजनेच्या यशापयशाचे खापर नोकरशाहीवर फोडता येत नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या विभागाच्या मंत्र्याची मानली जाते.

प्रश्न १ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) नोकरशाही म्हणून ओळखली जाणारी प्रशासकीय यंत्रणा कोणती ?

उत्तर- शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा 'नोकरशाही' म्हणून ओळखली जाते.

(२) अनामिकता म्हणजे काय?

उत्तर- अनामिकता म्हणजे एखादया धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप अनामक ठेवणे होय.

(३) भारतातील नोकरशाहीची रचना कशी आहे?

उत्तर - भारतातील नोकरशाहीची रचना अतिशय व्यापक व गुंतागुंतीची आहे.

(४) संसदीय लोकशाहीत कोणावर प्रशासनाची जबाबदारी असते?

उत्तर - संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते.

तुमच्या परिसरातील सनदी सेवेत कार्यरत असणाऱ्या एखाद्‌या अधिकाऱ्याची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा व मुलाखत घ्या.

पोलिस विभागातील 'उपविभागीय पोलिस अधिकारी' यांची मुलाखत.

(१) या सेवेत आपण कसे आलात?

उत्तर- सैन्यात दाखल न होता जनतेची सेवा करायची असेल तर सनदी सेवेसारखा दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या

माध्यमातून परीक्षा देऊन सनदी सेवेत दाखल झालो. (२) या विभागात कार्यरत असताना कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे लागते?

उत्तर - कोणत्याही सनदी सेवेत कार्यरत राहिले, तर थेट संपर्क नागरिकांशी, त्यांच्या समस्यांशी येतो. त्यामुळे त्यांच्या समस्या योग्य पद्धतीने हाताळणे महत्त्वाचे असते. पोलिस विभागात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता योग्य ते प्रयत्न करावे लागतात. नागरिकांना न दुखावता त्यांचे प्रश्न हाताळावे लागतात.

(३) कामाचे स्वरूप कसे असते ?

उत्तर - पोलिस विभागात कार्यरत असताना वेळेच बंधन नसते. कामाच्या ठिकाणी अधिकाधिक वेळ दयावा लागतो. सण-वार यापैकी कोणत्याही वेळात घरच्यांना वेळ देता येत नाही. उलट या दिवसांत जास्त काम करावे लागते.

तुमच्या परिसरातील सनदी सेवेत कार्यरत असणाऱ्या एखाद्‌या अधिकाऱ्याची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा व मुलाखत घ्या.

पोलिस विभागातील 'उपविभागीय पोलिस अधिकारी' यांची मुलाखत.

(१) या सेवेत आपण कसे आलात?

उत्तर- सैन्यात दाखल न होता जनतेची सेवा करायची असेल तर सनदी सेवेसारखा दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या

माध्यमातून परीक्षा देऊन सनदी सेवेत दाखल झालो. (२) या विभागात कार्यरत असताना कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे लागते?

उत्तर - कोणत्याही सनदी सेवेत कार्यरत राहिले, तर थेट संपर्क नागरिकांशी, त्यांच्या समस्यांशी येतो. त्यामुळे त्यांच्या समस्या योग्य पद्धतीने हाताळणे महत्त्वाचे असते. पोलिस विभागात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता योग्य ते प्रयत्न करावे लागतात. नागरिकांना न दुखावता त्यांचे प्रश्न हाताळावे लागतात.

(३) कामाचे स्वरूप कसे असते ?

उत्तर - पोलिस विभागात कार्यरत असताना वेळेच बंधन नसते. कामाच्या ठिकाणी अधिकाधिक वेळ दयावा लागतो. सण-वार यापैकी कोणत्याही वेळात घरच्यांना वेळ देता येत नाही. उलट या दिवसांत जास्त काम करावे लागते.

तहसीलदाराची मुलाखत.

(१) तहसीलदार या पदाकडे आपण कसे वळलात?

उत्तर - देशाची सेवा करायची असेल, तर सनदी सेवांना पर्याय नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून तहसीलदार पदाच्या जाहिराती निघाल्या होत्या तेव्हा ती परीक्षा दिली व या पदासाठी निवड झाली.

(२) या अंतर्गत कोणकोणत्या कामांचा समावेश होतो ?

उत्तर - या पदांतर्गत ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत आणि त्या गरजूंपर्यंत पोहोचत आहेत की नाही, हे या विभागांतर्गत पाहिले जाते.

(३) तहसील कार्यालयात काही विभागही असतात काय ?

उत्तर - होय, तहसील कार्यालयात कृषी, ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण यासारख्या विविध विभागांचा समावेश असतो. या विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. कृषीच्या योजना शेतकरी, तर महिला बालकल्याणाच्या योजना महिला व बालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी या विभागांची असते. तर या योजना व्यवस्थित राबविल्या जात

आहेत, की नाही हे तहसीलदारांना पहावे लागते.

(४) इतर कोणत्या कामांचा समावेश असतो ?

उत्तर - विभागांतर्गत रेतीघाट येत असतील, तर त्यांचा लिलाव करणे, रेती चोरी होत असेल तर त्यावर कारवाई करणे, त्यांच्याकडून महसूल गोळा करणे, पावसाळ्याच्या दिवसांत आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात सहभागी होण

Post a Comment

0 Comments