५. सामाजिक आणि धार्मिक ज्ञान
प्रश्न १ - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे)
(१) रामकृष्ण मिशनची स्थापना ... यांनी केली.
उत्तर – रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली.
(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना .... यांनी केली.
उत्तर - मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली.३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना यांनी केली
उत्तर - डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.प्रश्न ३ - पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या.
उत्तर - कारण (i) इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. (ii) तसेच पाश्चिमात्य विचार, संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली. (iii) भारतीय समाजाचे मागासलेपण त्यांच्याअंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातिभेद, उच्च-निचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे, या वी जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. (iv) देश प्रगतिपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्त्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या.
(२) महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.
उत्तर - कारण (i) ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला, त्या काळात
भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. (ii) त्याकाळात विधवा स्त्रियांवर अनेक बंधने होती. त्यांची स्थिती या प्रचलित बंधनामुळे अतिशय वाईट झाली होती. (iii) विधवांना केशवपन, धार्मिक विधीत सहभागी न होणे, रंगीत वस्त्र व अलंकार घालण्यास बंदी अशा अनेक बंधनांनी त्यांना जखडले होते. (iv) स्त्रिचे सौंदर्य केसांमुळे असते. त्यामुळे विधवांचे केशवपन करून त्यांना विद्रुप करण्याची प्रथा होती. ही केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.
प्रश्न ४ - टिपा लिहा.
(१) रामकृष्ण मिशन
उत्तर - (i) इ.स. १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. (ii) रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्ये केली. तसेच दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्रीशिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रांतही कार्य केले व आजही करत आहे. (iii) स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. त्यांनी इ. स. १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले (iv) त्यांनी भारतातील तरुणांना 'उठा, जागे व्हाव ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा संदेश दिला.
(२) सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा.
उत्तर - (i) समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका, निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले.r (ii) भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील पहिल्या शिक्षिकेने म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण देण्याचे व्रत शेवटपर्यंत चालूच ठेवले. (iii) शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी व अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करण्यासाठी स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. (iv) त्यांनी ज्योतिरावांबरोबर बालहत्या प्रतिबंधक गृह समर्थपणे चालवले. (v) केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. (vi) पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दृष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठविले
प्रश्न १ - खालील प्रश्नांची एका शब्दांत तोंडी उत्तरे सांगा.
(१) मुलींची पहिली शाळा काढण्याचे ठिकाण(३) 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'ची स्थापना करणारे.
उत्तर - डॉ. केशव बळीराम हेडगेवार.
(४) प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष.
उत्तर - डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर.
प्रश्न १ - जरा विचार करा.
(P.P.C.Cr. 23)
(१) समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर ?
उत्तर - समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर स्त्रियांची परिस्थिती दयनीयच असती. त्यांचे 'चूल आणि मूल' एवढेच विश्व राहिले असते. त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली नसती. स्त्रियांना आपले अधिकार, हक्क, स्वातंत्र याबद्दल माहिती नसती. त्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली नसती.
(२) वर्तमानकाळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते परिवर्तन घडून आले आहे ?
उत्तर - (i) वर्तमानकाळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे स्त्री-पुरुष समानता निर्माण झाली. (ii) स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली. (iii) त्यांना मतदानाचा हक्क मिळाला, (iv) त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, त्यांना न्यायालयात दाद मागता येण्याची संधी मिळाली.
(३) आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का? जर होय; तर कोणते प्रयत्न करायला हवेत ?
उत्तर - आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे मला वाटते. त्यासाठी खालील प्रयत्न करायला हवेत..(i) स्त्री-शिक्षणासाठी घरगुती शाळा चालविण्याचा उपक्रम राबवायला पाहिजे,
(ii) निरक्षर स्त्रियांसाठी दुपारच्या वेळी साक्षर स्त्रियांनी साक्षरतेचे वर्ग चालवायला पाहिजे. (iii) ज्या भागात स्त्री शिक्षणाचा अजिबात विकास झाला नाही अशा दुर्गम भागात सामाजिक संघटनेद्वारे प्राथमिक शिक्षणाचे वर्ग चालवावे.
0 Comments