1242 अल्लाउद्दीन मसूदशाह 1246
अल्लाउद्दीन मसूदशाह रूक्नुद्दीन फिरोजशाहाचा पुत्र तर इल्तुतमिशचा नातू होता.
■ ४० गनी तुर्की सरदारांनी नाइब-ए-मुमलिकत (साह्यक) पदावर कुतुबुद्दीन हसनला अल्लाउद्दीन मसुदशाहच्या दरबारात नेमले.
■ अल्लाउद्दीन मसूदशाहचा अमीर-ए-हाजिबपदी म्हणून बल्बनला तूर्की सरदारांनी नेमले.
■ मसुदशाहच्या काळात बंगाल-बिहार अवधचा सत्ताधीश तुगरखाँ हा बनला.
■ मसुदशाहविरुद्ध तुर्की बल्बन, नासिरुद्दीन मुहम्मद (इल्तुतमिशचा लहान मुलगा) व इल्तुतमिश पत्नी (नासिरुद्दीन मुहम्मदची आई) यांनी षडयंत्र रचुन मुहमदशाहला पदच्युत केले. (१२४६ इ.स.)
1246 नसिरुद्दीन महमूद 1266
■ नसिरुद्दीन महमूद हा इल्तुतमिशचा धाकटा मुलगा होता.
■ नासिरुद्दीन महमुदने सर्व सत्ता तुर्क सरदार बल्बनच्या हातात सोपवली.
■ 'कुराणा'च्या हस्तलिखित प्रती तयार करुन नासिरुद्दीन महमुद आपला उदरनिर्वाह करे.
■ बल्बन पुत्री ही नासिरुद्दीन महमुदची पत्नी होती. बल्बनला दरबारातून नासिरुद्दीन महमुदने निष्काशित केले.
■ बल्बनचे पद नासिरुद्दीन महमुदने इमादुद्दीन रैहानला दिले.
■ बल्बनने इमादुद्दीन रैहानाचा पराभव करुन पुन्हा दरबारात स्थान मिळविले.
■ बल्बनच्या दरबारातील प्रभावामुळे नासिरुद्दीन महमुदने दरबारातून स्वमाता मलिका-ए-जहाँला काढून टाकले.
■ नासिरुद्दीन महमुदच्या काळात मंगोल टोळ्यांनी आक्रमणे केली.
■ बल्बनचा भाऊ किशलुखाँ मुलतान-उचचा गव्हर्नर होता.
■ हलकू खान हा नासिर-उद्दीन महमूदच्या कारकिर्दीत खुरासानचा मंगोल शासक होता.■ नसिरुद्दीन महमुदचा हा बलबनचा प्रमुख होता.
■ नासिरुद्दीन महमुदचा मृत्यु दि.१८.०२.१२६६ ला झाला.
1266 सुलतान बलबान 1286
■ नासिरुद्दीन महमुदची कारकीर्द म्हणजेच मुख्य प्रधान बल्बनचीच कारकीर्द होय.
■ नासिरुद्दीन महमुद हा निपुत्रिक होता.
■ बल्बन 'इलबारी' वंशातील तुर्क होता. बल्बनचे मुळ नाव 'बहाउद्दीन' होते. बल्बन युवा अवस्थेत मंगोलकाकडून कैद होऊन बसरानिवासी ख्वाजा जमालुद्दीने त्यास गजनीत विकत घेतले.
■ ख्वाजाने बल्बनला इ.स.१२३२ ला दिल्लीत आणले व दिल्लीत बल्बनला शम्सुद्दीन अल्तुतमिशने विकत घेतले.
■ शम्सुद्दीन अल्तुतमशने बल्बनला 'खासबारदार' (वैयक्तिक चिटणीस) नेमले.
■ रजियाने बल्बनला अमीर-ए-शिकार (शिकारप्रमुख) पदी नेमले.
बल्बन रजियाचा विरोधक होता.
■ बहरामशाहने बल्बनला रेवा आणि हंसीचा जहागीरदार बनवले व 'अमीर-ए-आखूर' बनवले.
■ १२४५ इ.स. ला बल्बनने मंगोल टोळ्यांचा पराभव केला.
■ नासिरुद्दीन मुहम्मदाने बल्बनला मुख्य प्रधान नेमले व नायब-ए-मुगलिकत (साह्यक) बनवले.
■ बल्बन स्वतः ४० गणी सरदारांपैकी एक होता.
■ १२४९ इ.स. ला बल्बन मुलीशी सुलतान नासिरुद्दीन मुहम्मदाने विवाह केला.
■ बलबनला नसिरुद्दीन मुहम्मद यांना उलुग खान ही पदवी देण्यात आली. (इ.स. १२४९)
■ नासिरुद्दीन मुहम्मदचा मुख्य प्रधान म्हणून बल्बनने १२४९-५३ व १२५४-६६ या काळात कार्य केले तर रैहानने १२५३-५४ काळात कार्य केले.
■ नासिरुद्दीन मुहम्मदाच्या मृत्युनंतर बल्बनने सुलतान म्हणून राज्याभिषेक केला. (१२६६)
■ बल्बन सर्व प्रथम अल्तुतमिशद्वारा संघटित ४० गणी संघाचे पारिपत्य केले म्हणून गणींचा जन्मदाता अल्तमश तर नष्टकर्ता बल्बन ठरतो.सुलतान बल्बन समोरील मुख्य समस्या
• पंजाबच्या खोकरांचा उपद्रव मेवाती टोळ्यांचा दिल्लीत उपद्रव आर्थिक समस्या ४० गणींचे प्राबल्य मौलवींचे राज्यकारभारात हस्तक्षेप
• राजपुतांचे विद्रोह मंगोल आक्रमणे.
■ सुलतान बल्बनचे सैन्य संघटन होताच दिल्लीला उपद्रव देणाऱ्या मेवाती टोळ्यांचा व आक्रमकांचा पाडाव केला.
■ रुहेलखंडमधील विद्रोहांचे दमन करण्यासाठी बल्बनने प्रौढ जनतेची कत्तल केली.
■ गंगा-यमुनेच्या दुआब प्रदेशात बल्बनने दहशत निर्माण केली.
■ बंगालमध्ये बल्बनचा साहयक तुर्की तुगरील खाँ हा गव्हर्नर साह्यक शासन करत होता.
■ मंगोलांच्या आक्रमणामुळे तुगरीलखाँने स्वतंत्रता घोषित केली.
■ तुगरीलखाँ विरोधात बल्बनने अमीरखाँ व अलिप्तगीनला पाठवले पण तो तुगरीलला जाऊन मिळाला.
■ तुगरीलखाँ व अमीरखाँ विरुद्ध १२८० ला मलिक तरगीला पाठवण्यात आले.
■ बल्बनने तुगरील पाडावासाठी बंगाल राजधानी लखनौतीवर आक्रमण केले.
■ बल्बनचा सहाय्यक मलिक मुकद्दरने तुगरीलचा वध केला..
■ बल्बनपुत्र बुगराखाँग हा बल्बनसोबत बंगाल स्वारीत होता.
■ १३३६ पर्यंत बुगराखाँ व त्याचे उत्तराधिकारी बंगालचे शासक होते.
■ मंगोल आणि खोकरांचा पश्चिम सीमावर्ती भागातून होणारा विरोध थांबवण्यासाठी बल्बनने किल्ल्यांची दुरुस्ती केली.
■ पश्चिम सीमा रक्षणार्थ बल्बनने पश्चिम भागाचा सरदार म्हणून 'शेरखाँ' ला नियुक्त केले.
■ 'शेरखाँ' ने बल्बनची भीती लक्षात घेऊन आत्महत्या केली, त्यामुळे मंगोलखोरांनी पश्चिम भागावर १२७२ ला आक्रमण केले.
■ बल्बनने पश्चिम भागात मुलतान या ठिकाणी मंगोलाच्या विरोधासाठी सैन्य छावणी ठेवली
■ मुलतानचा प्रमुख म्हणून नेमलेला बल्बन राजपुत्र मुहम्मदची हत्या मंगोलांनी १२८६ ला केली. या मंगोल आक्रमणात कवि अमीर खुसरोला केद करण्यात आले.
४० गणी गटांचा पाडाव व बल्बन
अल्तुतमिशद्वारा ४० कर्तृत्त्ववान तुर्की दास सरदारांच संघटन, बल्बन ४० पैकी १ होता. सरदारांचे षडयंत्र बल्बनला माहीत होते, म्हणून दरबारात तरुण तुर्कदासांना त्याने पदे दिली, स्वःअनुयायी नियुक्त, शुद्ध तुर्क रक्तातील व्यक्तींनाच पदे दिली. कनिष्ठ वंशीय पदच्युत केले. ४० सरदारांच्या जहागिरी जप्त, श्रेष्ठ सरदारांत फाटाफूट व साध्या गुन्ह्याकरिता जबरी शिक्षा केल्या उदा. मलिक बल्बकला अपमानास्पद वागणूक, हैबत खाँची सामाजिक अप्रतिष्ठा केली. अवध प्रांताध्यक्ष अमीनखाँला अयोध्याद्वारावर फाशी दिली. शेरखाँ सनकारास विष देवून मारण्यात आले.
■ बल्बन हा प्रथम सुलतान की ज्याने गुप्तचर प्रणाली अस्तित्त्वात् आणून प्रत्येक प्रशासनाच्या विभागात हेर नियुक्त केले.
■ अल्तमशद्वारा, सरदारांना प्रदान अनुदानीत जमिनीचा ताबा बल्बनने पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.
बल्बनचा सेनाप्रमुख 'इमाद-उल-मुल्क' हा होता.
■ सुलतान काळात सुरक्षा / संरक्षण मंत्र्यास दीवाण-
बलबन चा राजपद तत्व
साम्राज्य टिकवायचे असेल तर राजाबद्दल प्रजेच्या मनात आदर आणि दरारा निर्माण झाला पाहिजे म्हणून बल्बनने 'जिल्ली इल्लाह' (ईश्वराचे प्रतिबिंब) उपाधी धारण केली. बल्बनने दैवी राजसत्तेच्या तत्त्वाचा 'Divine Right of the king' चा पुरस्कार केला.
मुख्य तत्त्व - राजसत्ता स्वेच्छाचारी व अनियंत्रित असे. राजपद श्रेष्ठ कुलातील व्यक्तीलाच प्राप्त होते. बल्बन स्वतःला तरुण दैवी पुरुष व
शासक अफरोशियाब' चा वंशज माने. • राजाज्ञा बंधनकारक आहे. सम्राट प्रतिष्ठा टिकवण्यासाठी उच्च पोषाख परिधान केला. निम्न व्यक्तिंच्या भेटी त्याने टाळल्या. मदिरा-पान-संगीताचा त्याग व सिजदा आणि पायबोस प्रथा प्रारंभ केली.■ सिजदा म्हणजे साष्टांग दंडवत करुन नमस्कार करणे तर पायबोस म्हणजे सम्राटाच्या चरणाचे चुंबन घेणे होय. या प्रथा बल्बनने सम्राट प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सुरू केल्या.
■ बल्बनने इराणी सण नौरोज प्रारंभ केला. ■ बल्बनने सरदार मुख्य प्रधान व सुलतान म्हणून
४० वर्षे राज्य केले. (इ.स.१२४४-८६).
■ बल्बनपुत्र मोहम्मदचा मृत्यु १२८५ ला मंगोलाविरुद्ध लढताना लाहोर येथे झाला.
■ बल्बनने ज्येष्ठ पुत्र मोहम्मदच्या मृत्युनंतर कनिष्ठ पुत्र बुगराखाँच्या हातात राज्य कारभार दिला.
■ बल्बनने उत्तराधिकारी म्हणून नातू खुसरावशाह (मोहम्मदचा मुलगा) यास नेमले.
• बल्बनचा मृत्यु इ.स. १२८६ ला झाला. बल्बनने दरबारात सय्यद मोइनउद्दीन, फरीद्दीनमसूद, शेख बदरुद्दीन गजनबी आणि सिफीमौला या फकिरांना आश्रय दिला.
■ बलबन हा सुन्नी पंथ होता.
■ बल्बनने शिकारीसाठी दिल्ली सभोवारचा ४० मैल । प्रदेश राखीव ठेवला.
बुलबन - अल्तमश तुलना
• दोघेही गुलाम होते.
• आरामशाहच्या नाकर्तेपणामुळे अल्तमश सुलतान तर नासिरुद्दीन महमुद निपुत्रीक म्हणून बल्बन सुलतानपदी आला.
• अल्तमशला प्रशासन अनुभव नाही तर बल्बनला २० वर्षाचा अनुभव होता.
• सुलतानपदी आल्यानंतर दोघांपुढे समस्या समान.
• अल्तमश उत्तम सेनापती होता म्हणून साम्राज्य विस्तार शक्य झाला.
• बल्बनची सर्व शक्ती मंगोलाविरुद्ध खर्च झाली. • आंतरिक विरोधासाठी अल्तमशने ४० गणीचे संघटन केले तर बल्बनने आंतरिक विरोध
मोडण्याकरिता ४० गणीचे पारिपत्य केले.
• बल्बनसारख्या उत्तम प्रशासकाच्या तुलनेत अल्तमश दुर्बल ठरतो.
• सीमा रक्षणासाठी अल्तमशपेक्षा बल्बन श्रेष्ठ होता.कैकुबड (इ.स. १२८७-१२९०)
■ धर्मनिरपेक्ष राज्याचा पहिला संस्थापक सुलतान बल्बन होय.
■ बल्बनने मृत्युपुर्व स्वःपुत्र मोहम्मदचा मुलगा कैखुसरोला उत्तराधिकारी बनवले पण दिल्लीचा कोतवाल फखरुद्दीनने कैखुसरोची (रोहटक) हत्या करुन बल्बनचा नातू कैकूबादला (बुखरा खाँचा मुलगा) सुलतान म्हणून नेमला.
■ कैकुबादचे मुळ नांव मइज्जुद्दीन होते त्याचा जन्म इ.स.१२७० ला झाला.
■ फकरुद्दीन कोतवाल स्वार्थासाठी युवा सुलतान वैकुबादला मदिरा व मिनाक्षीच्या सहवासात व्यस्त केले.
■ कैकुबादच्या काळात सर्व सत्ता फकरुद्दीन कोतवालाचा जावई निजामुद्दीनच्या हातात केंद्रीत होती.
■ कैकुबाद काळातील अराजकामुळे मंगोलांनी तैमुरखाँ नेतृत्त्वाखाली भारतावर आक्रमण केले
■ तैमूरखाँचा पराभव पंजाबचा सरदार मलिक बफवकने केला.
■ दिल्लीतून लखनौतीला जाऊन शासन करणारा बल्बन पुत्र बुगराखाँने स्वपुत्र कैकूबाद विरुद्ध अयोध्याजवळ घागरा ठिकाणी सैन्य छावणी ठोकली.
■ घागरा ठिकाणी बुगराखाँ व कैकुबाद यांच्यात युद्ध न होता समझोता झाला. (इ.स. १२८८)
■ कोतवाल फकरुद्दीनचा जावई निजामुद्दीनवर विष प्रयोग करुन कैकूबादने बुलंद शहराची जहागिर जलालुद्दीन फिरोजला दिली.
■ जलालुद्दिन खिलजी हा खिलजींचा नेता होता तर खिलजी आणि तुर्की सरदारांत वितुष्ट होते.
• तुर्की सरदारांनी कैकुबादला पक्षाघाताचा आजार जडताच कैकुबाद पुत्र कायुमार्सला सुलतान बनवले.
जलालुद्दीन फिरोज खिलजी व त्याच्या साह्यकाने कायुमार्सचे अपहरण करुन कैकूबादची हत्या केली व त्याचे शव यमुना नदीत फेकून दिले.
■ कैकुबादच्या हत्येनंतर जलालुद्दीन फिरोज खिलजीने दि.१३-०६-१२९० ला किलुघराई ठिकाणी स्वतःला सुलतान म्हणून घोषित केले. दास व वंश सत्ता नष्ट करुन खिलजी सत्ता स्थापन केली.
0 Comments