प्रश्न २ - पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) वसाहतवाद
उत्तर - (ⅰ) वसाहतवाद म्हणजे आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामथ्याच्या बळावर एखादा भूतदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे होय वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार होये(ii) दुसऱ्या प्रदेशात वा देशात वसती केल्यानंतर तो संपूर्ण प्रदेश व्यापणे अथवा त्या प्रदेशातील लोकांत आपला संघटित गट करून आपले वर्चस्व प्रस्थापिणे, ही पुढची प्रक्रिया होय. या प्रक्रियेला वसाहतवादी प्रवृत्ती म्हणतात. यूरोपीय देशांच्या याच वसाहतवादीं प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. (iv) वसाहतवाद म्हणजे एखादया राज्याच्या लोकांद्वारे दुसऱ्या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे होय. जमिनीचे, खनिजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश असतो..
(२) साम्राज्यवाद
उत्तर - (i) साम्राज्यवाद म्हणजे विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे होय. (ii) साम्राज्यवादात एखादा बलाढ्य देश किंवा राष्ट्र दुसऱ्या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली
आणतो. (iii) साम्राज्यवादासाठी बहुधा लष्करी बळाचा वापर केला जातो. नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे. (iv) आशिया व आफ्रिका खंडांतील अनेक राष्ट्र युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली..
(३) प्रबोधनयुग
उत्तर - ( युरोपातील मध्ययुगाच्या अखेरच्या कालखंड़ाला अर्थात इ.स. १३ वे शतक ते १६ वे शृतक प्रबोधन युग असे म्हणतात. (ii) युरोपात या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे . आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणून या काळाला 'प्रबोधनयुग' असे म्हणतात. (iii) प्रबोधनयुगात युरोपात कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान या क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. (iv) प्रबोधनाने मानवतावादाला आणि जीवनाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना दिली
(४) भांडवलशाही
उत्तर - (i) ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्रे खाजगी भांडवलदारांच्या हातात असतात, ती अर्थव्यवस्था 'भांडवलशाही अर्थव्यवस्था' म्हणून ओळखली जाते. (ii) देशकालपरत्वे या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात काही फरक आढळून येतात. (iii) या अर्थव्यवस्थेत भांडवल मजूर यांच्या सहकार्याने वस्तूचे उत्पादन करून उद्योक नफा मिळवितो. (iv) औद्योगिक क्रांतिनंतर भांडवलशाही
अर्थव्यवस्थेचा उदय युरोपीय देशात झाला. प्रश्न ३ - पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला,
(1) भारतातील अत्यंत समृद्ध उत्तर - कारण ( अशा बंगाल प्रांतात इ. इ.स. १७५६
साली सिराज उद्दौला हा नवाबपदी आला. (ii) मुघल बादशाहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी गैरवापर करत. (ii) इग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारल्यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. (iv) रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. १०० इ.स. १७५७ मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. त्यावेळी मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरले नाही. त्यामुळे प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला.
(२) युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
उत्तर - कारण (i) इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुकर्वांनी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले. (ii) या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात. (iii) हे व्यापारी मार्ग तुर्वांनी बंट केले. त्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा
शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
(३) युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
उत्तर - कारण (i) नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात होऊन अनेक व्यापारी पुढे आले. (ii) परंतु एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नसल्यामुळे अनेक
व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार सुरू केला. (iii) या व्यापारातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. (iv) पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असल्यामुळे या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
प्रश्न ४ - पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
दर्यावर्दी
काम
बार्थोलोम्यू डायस
आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहचला.
ख्रिस्तोफर कोलंबस
अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहचला.
वास्को द गामा
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहचला.
प्रश्न १ - नावे सांगा.
(१) प्रबोधनकाळातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मानले जाणारे व्यक्ती.
उत्तर - लिओनार्दो द विंची.
(२) केप ऑफ गुड होपपर्यंत पोहचणारा खलाशी.
उत्तर - बार्थोलोम्यू डायस.
(३) हैदर अलीच्या मृत्यूनंतर म्हैसूरच्या गादीवर आलेला उत्तराधिकारी.
उत्तर - टिपू सुलतान.४) अयोध्येचा नवाब.
उत्तर - शुजा उदौला.
प्रश्न २- खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे सांगा.
(१) छपाई यंत्राचा शोध कोणी व केव्हा लावला ?
उत्तर - इ. स. १४५० च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला.
(२) कोणती युद्धे 'कर्नाटक युद्धे' म्हणून ओळखली जातात ?
उत्तर - भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याने त्यांच्यात तीन युद्धे झाली ती 'कर्नाटक युद्धे' म्हणून ओळखली जातात.
(३) लिओनादों-द- विंची याच्या कोणत्या चित्राकृती अजरामर ठरल्या ?
उत्तर - लिओनार्दो-द-विंची यांच्या 'मोनालिसा' व 'द लास्ट सपर' या चित्राकृती अजरामर ठरल्य
प्रश्न २- खालील घटना कालानुक्रमे लिहा.
(१) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती.
(२) इंग्रजांनी सिंधवर ताबा मिळवला.
(३) फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अंन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव करून प्रजासत्ताकाची स्थापना केली.
(४) जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला.
(५) ऑट्टोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकले.
उत्तर (४) जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला.
(५) ऑटोमन तुकौनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून घेतले.
(१) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती.
(३) फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव करून प्रजासत्ताकाची स्थापना केली.
(२) इंग्रजांनी सिंधवर ताबा मिळवला.
एन ३ पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
(१) बंगालचा नवाब
सिराज उदौला.
(२) मीर जाफरचा जावई मीर कासीम.
(३) पंजाबचा सत्ताधीश रणजितसिंह.
(४) मैसूरचा सत्ताधीश
दलीपसिंग
तर चुकीची जोडी
मैसूरचा सत्ताधीश दलीपसिंग
दुरुस्त जोडी मैसूरचा सत्ताधीश - टिपू सुलतान
0 Comments