शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
• संकलित मूल्यमापन
• लेखी परीक्षा (उद्देश, लहान उत्तर, लांब उत्तर)
स्वत:चा अभ्यास
प्रश्न १ - खालील तक्ता पूर्ण करा.
गाव / मौजा
कसबा
परगणा
कशास म्हणतात
कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला
परगण्याच्या मुख्य ठिकाणाला
अनेक गावांना
अधिकृत
पाटील
शेटे महाजन
देशमुख व देशपांडे
उदाहरण
पंढरपूर, वडगाव
इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा
पुणे परगणा
प्रश्न २ - म्हणजे काय ?
(१) बुद्रुक
उत्तर - बुद्रुक म्हणजे मूळ गाव होय.
(२) बलुतं
उत्तर - गावात कारागीर जी सेवा देत असत, त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. त्यास बलुतं असे म्हणतात.
(३) जन्मभूमी
उत्तर - वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायंची सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय.
प्रश्न ३ - शोधून लिहा.
(१) कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक
उत्तर - सिद्दी
(२) अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार
उत्तर - संत ज्ञानेश्वर
(३) संत तुकारामांची गावे -
उत्तर - देहू
(4) भारुडाचे संगीतकार
उत्तर - संत एकनाथ
(५) बलोपासनेचे महत्त्व सांगणारे
उत्तर - रामदास स्वामी
(६) स्त्री संतांची नावे
उत्तर - संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई
प्रश्न ४ - तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा.
(१) संत नामदेव
उत्तर - माहिती - संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. त्यांची अभंगरचना प्रसिद्ध• कोहिनूर इतिहास व नागरिकशास्त्र - VII
आहे. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या 'गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथात समाविष्ट आहे.
कार्य - (i) संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्व जाती-जमातींमधील स्त्री-पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. (ii) त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. तसेच त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली.
(२) संत ज्ञानेश्वर
उत्तर - माहिती संत ज्ञानेश्वरांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही. आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथ, सोपानदेव हे बंधू असून मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी समाधी घेतली होती. ते वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत.
कार्य - (i) संत ज्ञानेश्वरांनी 'भगवद्गीता' या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा 'भावार्थदीपिका' अर्थात 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी 'अमृतानुभव' या ग्रंथाची रचना केली. (ii) त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगांतून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. (iii) सामान्य लोकांना आचरता येईल, असा आचारधर्म सांगितला. (iv) वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली.
(३) संत एकनाथ
उत्तर - माहिती - संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यामध्ये भारुड, गौळणी, अभंग यांचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. ते लोकशिक्षक होते.
0 Comments