Subscribe Us

वर्ग.7.इतिहास.शिव जन्म कालीन महाराष्ट्र भाग 2



कार्य - (i) संत एकनाथांनी लोकांना सांगितले की, परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही. त्यांनी स्वतःच्या आचरणाने ते दाखवून दिले. (ii) उच्चनीच भेदभाव न करता गोरगरिबांना व मागासलेल्या लोकांना जवळ करा. सर्व प्राणिमात्रांवर दया करा, असे संत एकनाथांचे विचार होते. (iii) त्यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणारांवर कडक टीका केली आहे.

(4) संत तुकाराम

उत्तर - माहिती - संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे होत. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची 'गाथा' ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. त्यांचा भक्तिला नीतीची जोड देण्यावर भर होता. समाजातील काही कर्मठ लोकांनी त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही, असा दावा करून त्यांनी तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले.

कार्य - (i) संत तुकारांनी रंजल्यागांजल्यामध्ये देवत्व पाहण्यास सांगितले. (ii) आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. (iii) त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. त्यांनी प्राणीमात्रांवर दया करणे, श्रीमंत व गरीब असा भेदभाव न करणे असे विचार सांगितले आहे.

प्रश्न ५ - दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते.

उत्तर - (i) शेती हा सामान्य जनतेचा मुख्य व्यवसाय होता. (ii) शेती ही मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पाऊस आला नाही, तर शेतात

पीक येत नसे. यामुळे धनधान्य वस्तूंचे भाव वाढत. पर्यायाने लोकांना अन्नधान्य मिळणे कठीण जाई. तसेच जनावरांना चारा A नव्हता. (iii) पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत होती. (iv) गावात राहणे लोकांना कठीण जात होते. अनेक लोक गाव सोडून जात होते. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येत होती. अशा दृष्काळाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे दृष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते.

• अतिरिक्त प्रश्नोत्तरे

प्रश्न १ - (अ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(१) अनेक गावे मिळून होत असे.

(२) संत चळवळीचे हे केंद्र होते.

(३) संत तुकारामांची अभंगरचना आणि आहे.

(४) रामदासस्वामींनी चे महत्त्व स्पष्ट केले.

उत्तर - (१) वरगणा (२) पंढरपूर (३) प्रसन्न, प्रासादिक (४) बलोपासने

(ब) योग्य जोड्या लावा.

'अ' गट

) संत ज्ञानेश्वर

'ब' गट

(a) बालोपासना

(२) संत नामदेव

(ब) अभंगवाणी

(३) संत एकनाथ

(a) भावार्थदीपिका

(4) संत तुकाराम

(ड) ग्रंथसाहिब व ग्रंथात हिंदी पदे

(५) संत रामदास

(इ) गौळणी, भारुडे प्रसिद्ध

उत्तर (1 – A), (2 – D), (33), (4 – B), (5 – A)

प्रश्न २ - शोधा म्हणजे सापडेल.

(१) कोकणच्या किनारपट्टीवर कोणत्या सागरी सत्ता होत्या ?

उत्तर - कोकणच्या किनारप‌ट्टीवर सिद्दी, पोर्तुगीज यांच्या सागरी सत्ता होत्या.

(२) संत ज्ञानेश्वरांनी कोणते ग्रंथ लिहिले ?

उत्तर - संत ज्ञानेश्वरांनी 'भावार्थदीपिका' म्हणजे 'ज्ञानेश्वरी' आणि 'अमृतानुभव' हे ग्रंथ लिहिले.

(३) संत एकनाथांच्या साहित्यात कोणते प्रकार आढळतात ?

उत्तर - संत एकनाथांच्या साहित्यात अभंग, गौळणी, भारुड इत्यादी प्रकार आढळतात.

(४) वतनदाराची कामे सांगा.

उत्तर - परंगण्यातील गावांवरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली, तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत.

प्रश्न ३ - लिहिते होऊ या.

(१) संतांच्या कार्यामुळे लोकजागृती कशी झाली ?

उत्तर - (i) अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. अशावेळेस समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न संतांनी केले. (ii) त्यांनी लोकांच्या मनात आपला प्रदेश, आपली भाषा, आपले साहित्य, आपली संस्कृती यांच्याविषयी अभिमान निर्माण केला. (iii) लोकांना समतेचा संदेश दिला. तसेच माणुसकी व मानवताधर्म शिकविला. त्याचप्रमाणे एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे अशाप्रकारच

कवण त्यांनी दिली. त्यांनी लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला शाप्रकारच्या संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली.

(२) महाराष्ट्रामध्ये इ.स. १६३० मध्ये दुष्काळ पडल्यामुळे लोकांची अवस्था कशी झाली ?

उत्तर - (i) इ.स. १६३० मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. मुळे लोक हवालदिल झाले होते. (ii) धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. या काळा बद्दलचे वर्णन असे केल्या गेले की, 'भाकरीच्या तुकड्यासाठी लोक न्तःला विकून घेण्यास तयार होते, पण घेणाराच कोणी नव्हता.' (iii) कुटुंबे ध्वस्त झाली होती. शेती व्यवसाय खचल्यामुळे धन धान्याची तीव्र टंचाई र्माण झालेली होती. आर्थिक व्यवहार खुंटल्यामुळे उद्योगधंदे संपुष्टात आले न. लोक देशोधडीला लागले होते. अशाप्रकारे या दुष्काळामुळे संपूर्ण कजीवनाची घडीच विस्कटून गेलेली होती.

(१) पश्चिम किनारप‌ट्टीवरील, गोव्यात आणि वसईत राज्य स्थापन करणारे-

उत्तर - पोर्तुगीज

(२) गावाच्या पाटलाच्या कामात मदत करणारा -

उत्तर - कुलकर्णी

(३) रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा असणारा अधिकारी -

उत्तर - वतनदार

४) संत चंळवळीचे दैवत -

उत्तर - विठ्ठल

(५) 'संस्कृत वाणी देवे गेली। तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली।' असे ठणकावून विचारणारे संत -

उत्तर - संत एकनाथ

(६) 'कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी ।।' असे म्हणणारे

उत्तर- संत सावता महाराज

प्रश्न २ - चला, चर्चा करू या

(१) वारकरी वारीला कोणत्या महिन्यात जातात ?

उत्तर - वारकरी वारीला चैत्र, आषाढ, कार्तिक आणि माघ महिन्यात जातात.

(२) वारीचे नियोजन कसे असते ?

उत्तर - वारीचे नियोजन करतांना मंदिरातील संस्थानातर्फे अनेक कार्यकर्ते व वारीला येणाऱ्या भक्तांसाठी अन्न, पाणी व निवाऱ्याची सोय करतात. तसेच तेथील नागरिकही यथाशक्य मदत करतात. अर्थात तेथील प्रत्येक नागरिक वारीला सहकार्य करतात. वारीतील भक्तांसाठी प्रवासाची व दवाखान्याची व्यवस्थाही केल्या जाते. पोलिसदलांतर्फे भक्तांच्या सुरक्षतेची व्यवस्थाही केल्या जाते. त्यासाठी शासना‌द्वारेही मदत केली जाते. वारीला येणाऱ्या भक्तांची गैरसोय होणार नाही याकडे संस्थानातील कार्यकर्त्यांचे सतत लक्ष असते. त्यांना मार्ग सांगण्यासाठी ठिकठिकाणी व्यक्तींची निवड केलेली असते.


Post a Comment

0 Comments