Subscribe Us

वर्ग 7.इतिहास धार्मिक समन्वय




धार्मिक समन्वय



प्रश्न १ - परस्परसंबंध शोधून लिहा.

(१) श्री बसवेश्वर : कर्नाटक, मीराबाई : मेवाड

(२) रामानंद : उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू : बंगाल

(3) चक्रधर: महाराष्ट्र, शंकरदेव: आसाम

प्रश्न २ - खालील तक्ता पूर्ण करा.

प्रसारक

ग्रंथ

(१) भक्ती चळवळ

बसवेश्वर

कायकवे कैलास

(२) महानुभाव पंथ

चक्रधरस्वामी

लीळाचरित्र

(3) शीख धर्म

गुरुनानक

गुरुग्रंथसाहेब

भक्ती चळवळीचे प्रसारक - दक्षिण भारतात रामानुज, उत्तर भारतात संत रामानंद, बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू, गुजरातमध्ये संत नरसी मेहता, संत मीराबाई, संत कबीर.

महानुभाव पंथाचे प्रसारक - श्रीगोविंदप्रभू, म्हाइंभट

टीप : विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे

प्रश्न ३ - लिहिते व्हा.

(१) संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले.

उत्तर - (i) संत कबीर यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्वर मानले. (ii) सर्व मानव एक आहे अशी त्यांनी शिकवण दिली. (iii) संत कबीरांनी जातिभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाही. त्यांना हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कंट्टर लोकांना कडक शब्दांत फटकारले. या सर्व बाबींमुळे संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले.

(२) संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम

उत्तर - (i) संत बसवेश्वरांनी कर्नाटकात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. (ii) त्यांनी जातिभेदाविरुद्ध भूमिका घेऊन श्रमाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले.

(iii) त्यांनी आपल्या चळवळीत स्त्रियांनाही सहभागी केले. (iv) 'अनुभवमंटप' या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे 'स्त्री-पुरुष' सहभागी होऊ लागले. (v) त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचनसाहित्याच्या माध्यमातून दिली. साधे आणि निर्मळ जीवन जगावे.

अशा प्रकारचा त्यांचा संदेश होता. या त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा

परिणाम झाला.

(३) शेख निझामुद्दीन अवलिया हे एक थोर (शीख, सुफी, वारकरी) संत होते.

(४) नायनार हे होते. (विष्णूभक्त, शिवभक्त, हनुमानभक्त)

(५) अळवार हे होते. (शिवभक्त, विष्णूभक्त, कृष्णभक्त)

उत्तर - (१) सूरदास (२) ग्रंथसाहिब (३) सुफी (४) शिवभक्त (५) विष्णूभक्त

(ब) योग्य जोड्या लावा.

'अ' गट (लेखक)

'ब' गट (ग्रंथ)

(१) मन्मथ स्वामी

(a) रामचरितमानस

(२) तुलसीदास

(ब) सूत्रपाठ

(३) केशोबास

(a) सर्वोच्च रहस्य

(d) सूरसागर

उत्तर – (1 – A), (2 – A), (3 – B)

प्रश्न २ - खालील प्रश्नांची एका वाक्यांत उत्तरे लिहा.

(१) संत मीराबाईंनी आपल्या भक्तिगीतांतून कोणता संदेश दिला

उत्तर - संत मीराबाईंनी आपल्या भक्तिगीतांतून भक्ती, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश दिला.

(२) सुफी साधूची कोणती श्रद्धा होती ?

उत्तर - परमेश्वर प्रेममय आहे आणि प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत हचता येते.

(३) दक्षिण भारतात कोणी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला ?

उत्तर - दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला.

गुरु गोविंद सिंग

त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या 'गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथात समाविष्ट आहे. कार्य - (i) संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्व जाती-जमातींमधील - वी-पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. (ii) त्यांनी रागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. तसेच त्यांनी पंढरपूर थेि विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली.

(२) संत ज्ञानेश्वर

उत्तर – माहिती - संत ज्ञानेश्वरांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही. आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथ, सोपानदेव हे बंधू असून मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी समाधी घेतली होती. ते वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत.

कार्य - (i) संत ज्ञानेश्वरांनी 'भगवद्‌गीता' या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा 'भावार्थदीपिका' अर्थात 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव' या ग्रंथाची रचना केली. (ii) त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगांतून नक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. (iii) सामान्य लोकांना आचरता येईल, असा - आचारधर्म सांगितला. (iv) वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली.

(३) संत एकनाथ

उत्तर – माहिती - संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक रहान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यामध्ये भारुड, गौळणी, अभंग यांचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चेत्र रेखाटले आहे. ते लोकशिक्षक होते.


(४) संत कबीरांनी कोणत्या गोष्टींना महत्त्व दिले नाही ?

उत्तर - संत कबीरांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही.

प्रश्न ३ - पाठात शोधून लिहा.

(१) गुरूनानकांनी कोणती शिकवण दिली ?

उत्तर - (i) जो सर्वांना समत्वाने वागवील आणि भ्रष्ट जगात निर्मळ राहील

तोच खरा धर्म होय. (ii) त्याचप्रमाणे सर्वांनी सारखेपणाने वागावे, शुद्ध आचरण

ठेवावे. परमेश्वर एकच आहे. 'शुद्ध आचरणाने त्याची प्राप्ती होते.' अशी

गुरूनानकांनी शिकवण दिली.

(२) महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या प्रमुख रचना स्पष्ट करा.

उत्तर - महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या प्रमुख रचना पुढीलप्रमाणे आहेत. (i) म्हाइंभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा 'लीळाचरित्र' या ग्रंथाची रचना झाली. (ii) आद्य मराठी कवयित्री महदंबा यांचे 'धवळे', केशोबास यांनी संपादित केलेले 'सूत्रपाठ' आणि 'दृष्टांतपाठ' हे ग्रंथ • आहेत. (ii) दामोदर पंडितांचे 'वच्छाहरण', भास्करभट्ट बोरीकर यांचा 'शिशुपालवध', नरेंद्रांचे 'रुक्मिणीस्वयंवर' या रचना आहेत.

(३) संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग लोकांना जवळचा का वाटला ?

उत्तर - (i) संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता. (ii) या भक्ती चळवळीमध्ये सर्व स्त्री-पुरुषांना प्रवेश होता. तसेच संतांनी लोकभाषेतून आपले विचार मांडले. त्यामुळे ते विचार सर्वसामान्य लोकांना अधिक जवळचे वाटले आणि तसेच भारतीय संस्कृतीची जडणघडण होण्यात

भक्तिमार्गाचा फार मोठा वाटा होता. 'त्यामुळे संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग लोकांना जवळचा वाटला.

प्रश्न १ - नावे सांगा.

(१) उत्तर भारतात भक्तीचे महत्त्व सांगणारे संत.

उत्तर - संत रामानंद

(२)' बंगालमध्ये कृष्णभक्तीचे महत्त्व सांगणारे संत.

उत्तर - चैतन्य महाप्रभू

(3) मेवाड घराण्याचे संत.

उत्तर - संत मीराबाई

(४) लिंगायत विचारधारेचे प्रसारक

उत्तर - बसवेश्वर

वर्ग कार्य / गृहपाठ

प्रश्न १ - गटात न बसणारा पर्याय लिहा.

(१) श्री गोविंदप्रभू, गुरु नानक, चक्रधर स्वामी, म्हैंभट

उत्तर - गुरुनानक

(२) संत एकनाथ, संत तुकाराम, संत मीराबाई, शेख निझामुद्दीन अवलिया.

उत्तर - शेख निझामुद्दीन अवलिया

.


Post a Comment

0 Comments