Subscribe Us

वर्ग.5.विज्ञान.अन्नपचन



महत्त्वाचे मुद्देः

• शरीराच्या सर्व क्रिया होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात.

• अन्नाचे रूपांतर विद्राज्य घटकांत होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला 'अन्नपचन' असे म्हणतात.

• अन्नाचे पचन अन्ननलिकेमध्ये होते..

• तोड, प्रासिका, जठर, लहान व मोठे आतडे हे अन्ननलिकांचे भाग आहेत. यात क्रमाक्रमाने अन्नपचन क्रिया होते.

• अन्नपचन होण्यासाठी अन्ननलिकेतील या ठराविक भागांमध्ये ठराविक कामे होतात तर विशिष्ट ठिकाणी काही रस मिसळले जातात. या रसांना पाचक रस म्हणतात.

• वेगवेगळे पाचकरस तयार करणारी इंद्रिये आणि अन्ननलिका ही पोटातील आंतरिंद्रिये आहेत.

• पाचकरस मिसळलेल्या अन्नाचे विद्राव्य घटकांत रूपांतर होऊन हे घटक लहान आतड्याच्या भिंतीमधील रक्तवाहिन्यांतील रक्तात शोषले जातात. मिश्रणाचा उरलेला भाग मोठ्या आतड्यांत ढकलल्या जाऊन अलेले विद्राव्य घटक व पाणी मोठ्या आतड्यात शोषले जातात.

• न पचलेला निरूपयोगी भाग मलाच्या रूपात गुद्द्द्वारातून शरीराबाहेर टाकला जातो.

प्रश्न १

अन्नपचन म्हणजे काय ?

उत्तर- अन्नाचे रुपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे. या क्रियेला

अन्नपचन असे म्हणतात.

प्रश्न २ - अन्नात पाचकरस कोठे कोठे मिसळतात ?

उत्तर - अन्ननलिकेत अन्नपचन होण्यासाठी विशिष्ट ठिकाणी काही रस मिसळले जातात. ज्या अन्नपचनास मदत करणाऱ्या अशा रसांना पाचकरस म्हणतात. अन्ननलिकेतील पुढील भागांमध्ये

या पाचकरस अनुक्रमे मिसळतात.

(i) तोंडात - लाळेतील पाचकरस मिसळल्या जातो. (ii) जठरात अन्न घुसळले जाताना पाचकरस मिसळल्या जाऊन अन्नाचे पातळ खिरीसारखे मिश्रण तयार होते. (iii) यकृत आणि स्वादुपिंडात तयारा होणारे पाचकरस लहान आतड्यात येतात तेथे अन्नात मिसळतात्. (iv) लहान आतड्यातील पाचकरसही अन्न मिश्रणात मिसळतात. हे सर्व पाचकरस अन्नात मिसळून त्याचे

विद्राव्य घटकात रूपांतर होते.

प्रश्न ३ - अन्नपचन होताना पुढील ठिकाणी अन्नात कोणकोणते बदल होतात ?

तोंड, जठर, लहान आतडे.

उत्तर - अन्नपचन होण्यासाठी अन्ननलिकेत ठरावीक ठिकाणी ठराविक कामे होत

८ तसेच अन्नपचन होण्यासाठी विशिष्ट ठिकाणी काही रस मिसळले जातात. अन्नपचन होताना पुढील ठिकाणी अन्नात पुढीलप्रमाणे बदल होतात.

(i) तोंड - तोंडात अन्न दातांनी चावले जाऊन अन्नाचे बारीक तुकडे होतात व त्यांत लाळ मिसळते. त्याचा गोळा तयार होतो. जिभेने अन्न ग्रासिकेत ढकलले जाते.

(ii) जठर - ग्रासिकेतून अन्न जठरात ढकलले जाते. तिथे अन्न घुसळले जाऊन त्यात पाचकरसही मिसळला जातो. खाल्लेल्या अन्नाचे पातळ खिरीसारखे मिश्रण तयार होते.

(ii) लहान आतडे - यकृत व स्वादुपिंडातील पाचकरस लहान आतड्यात मिसळतात. तसेच लहान आतड्यातील पाचकरसही अन्न मिश्रणात मिसळून अन्नाचे विद्राव्य घटकांत रूपांतर होऊ लागते. हे घटक लहान आतड्याच्या भिंतीमधील रक्तवाहिन्यामधील रक्तात शोषले जातात व मिश्रणाचा उरलेला भाग मोठ्या आतड्यात ढकलल्या जातो.

प्रश्न ४ - पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते ठरवा.

(अ) अन्नपचनात अविद्राव्य घटकांचे विद्राव्य घटकांत रूपांतर होते.

(आ) जेवताना घास भराभर गिळावेत.

(इ) जठरात अन्न घुसळले जाऊन त्याचे खिरीसारखे पातळ मिश्रण होते.

(ई) अन्नपचनाच्या कामात लाळेची मदत होते.

(3) खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते.

(ऊ) पचनाची क्रिया जठरात सुरु होते.

(ए) न पचलेला भाग लहान आतड्यातून शरीराबाहेर टाकला जातो.

उत्तर - (A) बरोबर (Aa) डीफॉल्ट (E) बरोबर (E) बरोबर (U) डीफॉल्ट (U) डीफॉल्ट (A) डीफॉल्ट

प्रश्न ५ अन्ननलिकेचे भाग क्रमवार सांगा.

उत्तर - अन्ननलिकेमध्ये अन्नाचे पचन होते. अन्ननलिकेच्या पुढील भागांमध्ये क्रमाक्रमाने अन्नपचन होते. (i) तोंड (ii) ग्रासिका (iii) जठर (iv) लहान आतडे (v) मोठे आतडे प्रश्न ६ - जोड्या लावा.

(१) तोंड

(अ) विद्राव्य पदार्थांचे शोषण

(२) जठर

(ब) अन्नाचा गोळा बनवणे

(३) लहान आतडे

(क) पाण्याचे शोषण

(४) मोठे आतडे

(ड) अन्न घुसळणे

उत्तरः (१) बी, (२) – डी, (३) – ए (४) – केबालविद्या परीक्षेची गुरुकिल्ली (भाग-२)

प्रश्न १ - पचनाचे काम नीट झाले नाही, तर कोणते त्रास होतील ?

उत्तर - पचनाचे काम नीट झाले नाही, तर अन्नाचा शरीरास योग्य उपयोग होणार नाही. तसेच पोटाचे त्रास होतील.

प्रश्न २ - भाकरी, पोळी न चावता आणि घाईघाईने गिळल्यास काय तोटे होतील ?

उत्तर - भाकरी, पोळी न चावता गिळल्यास तिचे पूर्ण पचन होणार नाही.

(१) अन्नातील पोषक तत्त्वे कशाद्वारे शरीराच्या सर्व भागा

(२) अन्नाचे पचन शरीर त कोठे होते?

(३) अन्नपचनास मदत करणाऱ्या रसांना काय म्हणतात?

(४) आपल्या अन्ननलिकेत कोणत्या दोन प्रकारचे आतडे आहेत ?

(५) आपल्या शरीरात पाचकरस कोठे कोठे आढळतात?

उत्तर - (१) रक्ता‌द्वारे (२) अन्ननलिकेमध्ये (३) पाचकरस (४) लहान आतडे व मोठे

आतडे (५) लाळेत, यकृत आणि स्वादुपिंड.

प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(१) खाल्लेले अन्न जसेच्या तसे

मिसळू शकत नाही.

(२) अन्नाचे पचन मध्ये होते.

(३) अन्नपचनास मदत करणाऱ्या रसांना म्हणतात.

(४) अन्न पुढे जठरात ढकलले जाते.

(५) यकृत आणि स्वादुपिंडात तयार होणारे पाचकरस आतड्यात येतात.

(६) उरलेले विद्राव्य घटक आणि पाणी आतड्यात शोषले जाते.

उत्तर - (१) रक्तात (२) अन्ननलिकेमध्ये (३) पाचकरस (४) ग्रासिकेतून (५) लहान

(६) मोठ्या

(प्रत्येकी १ गुण)

प्रश्न २ - प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) शरीराच्या सर्व क्रिया होण्यासाठी आवश्यक असणारे घटक कशातून मिळतात ?

उत्तर - शरीराच्या सर्व क्रिया होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात.

(२) अन्नपचनाच्या क्रियेला सुरुवात कोठून होते ?

उत्तर - तोंडात अन्न घातल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते.

(३) तोंडात तयार झालेल्या अन्नाचा गोळा ग्रासिकेत कशाने ढकलला जातो ?

उत्तर - तोंडात तयार झालेल्या अन्नाचा गोळा जिभेने ग्रासिकेत ढकलला जातो.

(४) लहान आतड्यात अन्नाचे कशात रूपांतर होऊ लागते ?

उत्तर - लहान आतड्यात अन्नाचे विद्राव्य घटकांत रूपांतर होऊ लागते.

(५) न पचलेल्या निरूपयोगी भागाचे काय होते ?

उत्तर - न पचलेला निरूपयोगी भाग मलाच्या रूपात गुद्वारातून शरीराबाहेर टाकला जातो.

प्रश्न ३ - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

(प्रत्येकी २ गुण)

(१) अन्ननलिकेची रचना कशी असते ?

उत्तर - अन्ननालिकेचे तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे असे भाग असतात. काही ठिकाणी अन्ननलिका लहान नळीसारखी दिसते. तर काही ठिकाणी पिशवीसारखी फुगलेली

दिसते. अशा प्रकारे अन्ननलिकेची रचना असते.

(२) मोठ्या आतड्यात अन्नपचन क्रिया कशाप्रकारे होते?

उत्तर - लहान आतड्यातील उरलेला मिश्रणाचा भाग मोठ्या आतड्यात ढकलला जातो. उरलेले विद्राव्य घटक आणि पाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या आतड्यात शोषले जाते.

(३) अन्नपचनाच्या क्रियेतील ग्रासिकेचे कार्य स्पष्ट करा.

उत्तर - तोंडापासून पचनक्रियेला सुरुवात होते. त्यानंतर तोंडात तयार झालेला अन्नाचा गोळा

जिभेच्या मदतीने ग्रासिकेत ढकलल्या जातो. ग्रासिकेत कुठल्याही प्रकारचा अन्नपचनास मदत करणारा पाचकरस मिसळत नाही. ग्रासिकेतून अन्न पुढे जठरात ढकलले जाते.


Post a Comment

0 Comments