Subscribe Us

वर्ग 5 विज्ञान.मानवी शरीर आंतर इंद्रिये

 


सामान्य विज्ञान - इयत्ता पाचवी

मानवी शरीर - काही आंतरिंद्रिये

महत्त्वाचे मुद्देः

• शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिद्रिये म्हणतात.

(1) फुप्फुसे, हृदय छातीतील आंतरिंद्रिये

(11) अन्ननलिका, यकृत, आतडी, स्वादुपिंड पोटातील आंतरिंद्रिये

(iii) मेंदू - डोक्यातील आंतरिंद्रिय

• शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली आणि कामे सुरळितपणे होण्यासाठी या भागांच्या कामात ताळमेळ असावा लागतो. यालाच त्यांच्या कामातील सुसूत्रता म्हणतात.

• मेंदू शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्याचे नियंत्रण ठेवणे तसेच त्यांच्या कामात सुसूत्रता ठेवण्याचे कामही मेंदूस करतो.

• हृदय शरीरातील रक्त सतत नलिकांमधून पुढे जात असते त्यांना रक्तवाहिन्या म्हणतात. केसांसारख्या अतिशय लहान रक्तवाहिन्यांना केशवाहिन्या म्हणतात. शरिरात रक्त फिरते राहणे, याला रक्ताभिसरण म्हणतात.

• फुप्फुसे श्वासोच्छ्वासाचे कार्य करतात.

• क्ष-किरण क्ष-किरण म्हणजे एक्स-रे. हे तंत्र अवगत झाल्यापासून हाडे मोडणे, जठर अथवा

आतड्यातील बिघाड इत्यादींची माहिती कळते. सोनोग्राफीच्या तंत्राने शरीराच्या आतील भागाची स्पष्ट चित्रे पाहता येतात.

• या तंत्रांमुळे शरीरातील बिघाडांविषयी नेमकी माहिती मिळविता येत असल्यामुळे गरज असल्यास ऑपरेशन करून हे बिघाड दुरुस्त करता येतात.

प्रश्न १ - पुढील प्रश्नांची उत्तरे दया.

(अ) तुम्हाला माहीत असलेल्या आंतरिंद्रियांची नावे सांगा.

उत्तर - शरीराच्या आतील भागात असणाऱ्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

(1) छातीतील आंतरिंद्रिये फुप्फुस, हृदय (ii) पोटातील आंतरिंद्रिये - अन्ननलिका,

यकृत, आतडी, स्वादुपिंड (iii) डोक्यातील आंतरिंद्रिये - मेंदू

(आ) हृदयाला आंतरिंद्रिय का म्हणतात ?

उत्तर - शरीराच्या आतील भागात असणाऱ्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात. आंतर म्हणजे आतील भाग. हृदय हे छातीतील आंतरिंद्रिय आहे. छाती हा एक बरगड्यांचा पिंजरा असून या • पिंजऱ्यात हृदय असते. म्हणून हृदयाला आंतरिंद्रिय म्हणतात

प्रश्न २ - मेंदूचे कार्य कोणते ?

उत्तर - मेंदू हे डोक्याच्या कवटीत असलेले आंतरिंद्रिय आहे.

(i) शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्याचे नियंत्रण मेंदू करतो. त्यांच्या कामात सुसूत्रता ठेवण्याचे कामही मेंदू करतो. (ii) ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्या सभोवतालची माहिती मेंदूला मिळते. मेंदू विचार करणे, स्मरण ठेवणे, निर्णय घेणे ही कामे करतो व त्यानुसारच शरीराच्या वेगवेगळ्या भागांना आज्ञा पाठवतो. (iii) त्याचप्रमाणे मेंदूमुळेच बोलणे, धावणे, उड्या मारणे, खेळणे, पोहणे, मोटार चालवणे, इत्यादी कामे किंवा हालचाली करताना शरीराच्या अवयवांमध्ये सुसूत्रता असते.

प्रश्न ३ - फुप्फुसाचे कार्य कोणते ?

उत्तर - फुप्फुस हे छातीतील आंतरिंद्रिय आहे.

(i) नाकाने बाहेरची हवा फुप्फुसात घेणे म्हणजेच श्वास घेणे होय. हि क्रिया करतांना हवेतील ऑक्सीजन फुप्फुसांमध्ये रक्तात मिसळतो आणि त्याचवेळी रक्तातील कार्बन डायऑक्साइड फुप्फुसातील हवेत येतो. (ii) फुप्फुसांतील हवा नाकावाटे बाहेर सोडणे यालाच उच्छ्‌वास म्हणतात. या क्रियेत फुप्फुसांतील हवेबरोबर कार्बन डायऑक्साइड नाकावाटे शरीराबाहेर जातो. (iii) एकापाठोपाठ होणाऱ्या या दोन क्रियांना एकत्रितपणे 'श्वासोच्छ्वास' असे म्हणतात. ही क्रिया शरीरात सततच

सुरु असते. म्हणजेच फुप्फुस हे श्वासोच्छ्‌वासाचे महत्त्वाचे कार्य करते.

प्रश्न ४ - हृदय कोणते कार्य करते ?

उत्तर- हृदय हे छातीतील महत्त्वाचे आंतरिंद्रिय आहे.

(i) शरिरात रक्ताभिसरणाचे कार्य हृदय करत असते. या क्रियेत हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे आणि त्यांच्याकडून परत हृदयाकडे अशी रक्ताची ने-आण सतत सुरु असते. (ii) रक्तवाहिन्या व केशवाहिन्या यांद्वारे रक्त शरीरात सतत वाहत असते. रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हृदय पंपाप्रमाणे काम करत असते. (iii) त्यासाठी हृदयाचे सतत एकापाठोपाठ आकुंचन आणि प्रसरण होत असते. या क्रियेमुळेच आपल्याला हृदयाचे ठोके जाणवतात. (iv) आपल्या शरीरातील सर्व अवयवांना हृदयाद्वारे रक्त पुरवठा होतो व त्यामुळेच आपले शरीर सतत कार्यरत असते.

प्रश्न ५ - श्वास आणि उच्छ्‌वास यांतील फरक सांगा.

उत्तर द्या

श्वास

(1) नाकाने बाहेरची हवा फुफ्फुसांत घेणे म्हणजे श्वास घेणे होय.

(ii) या क्रियेत हवेतील ऑक्सिजन फुग्फुसांमध्ये रक्तात मिसळतो. त्याचवेळी रक्तामधील कार्बन डायऑक्साइड फुप्फुसांतील हवेत येतो.

उसासा

(i) नाकावाटे फुप्फुसातील हवा बाहेर सोडणे याला उच्छ्वास म्हणतात.


(ii) या क्रियेत फुप्फुसांतील हवेबरोबर कार्बन डायऑक्साइड नाकावाटे शरीरा बाहेर जातो.वाल्लविद्या परीक्षेची गुरुकिल्ली (भाग-२)

प्रश्न ६ - मी कोण ?

(अ) शरीरात रक्त सतत फिरते ठेवण्याचे काम करतो.

उत्तर: हृदय

(आ) हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळवण्याचे काम करतो. उत्तर फुप्फुस

(इ) शरीरात सुसूत्रता ठेवण्याचे काम करतो. उत्तर - मेंदू

• पाठातील उपप्रश्न •

(१) ज्याप्रमाणे आपल्या छातीमध्ये फुफ्फुसे आहेत, त्याचप्रमाणे कुत्रा, मांजर, बैल या प्राण्यांच्या छातीमध्येही फुप्फुसे आहेत की नाहीत हे तुम्ही कसे ठरवाल ?

उत्तर- कुत्रा, मांजर, बैल हे प्राणी स्वस्थ बसलेले असताना त्यांची छाती खालीवर होत असताना आपल्याला दिसते. यावरून माणसाप्रमाणे कुत्रा, मांजर, बैल या प्राण्यांच्या छातीमध्येही फुप्फुसे असतात, हे समजते.

(२) आपण झोपलो असतानाही आपले हृदय का चालू असते ?

उत्तर - रक्ताभिसरण क्रिया शरीरात सतत चालू राहणे गरजेचे असते. म्हणून आपण झोपलो असतानाही आपले हृदय चालू असते.

(३) दारे-खिडक्या बंद असलेल्या खोलीत अस्वस्थ का वाँटू लागते

उत्तर - दारे-खिडक्या बंद असलेल्या खोलीत शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत तत नाही. त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू लागत

(४) श्वासोच्छ्वास जलद केव्हा होतो ?

रित उत्तर - अतिश्रम झाले किंवा भीती निर्माण झाली, की आपला श्वास जलद होतो. या परिस्थितीत शरीराला अधिक ऑक्सिजनची गरज भासते व ती जलद श्वसनाने भागवली जाते.

(१) शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना काय म्हणतात?

(२) शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्याचे नियंत्रण कोण करते?

(३) श्वास आत घेण्याच्या क्रियेत कोणता वायू शरीरात घेतला जातो?

(४) हल्लीच्या काळात शरीरातील अवयवांची चित्रे घेण्यास कोणत्या तंत्राचा सर्वांत जास्त उपयोग होतो 

(५) शरीरातील रक्त शुद्धिकरण्याची प्रक्रिया कोठे घडते?

उत्तर (१) आंतरिंद्रिये (२) मेंदू (३) ऑक्सिजन (४) सोनोग्राफी (५) 

प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(१) सहजसोप्या वाटणाऱ्या कामांमध्येही गरज असतेच.

(२) शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्याचे

मेंदू करतो.

(३) रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पूढे ढकलण्यासाठी पंपाप्रमाणे काम करत असते

(४) छाती हा एक पिंजरा आहे.

(५) क्ष-किरण शरीरावर प्रमाणात पडण्याचे टाळणे चांगले,

उत्तर (१) सुसूत्रतेची (२) नियंत्रण (३) हृदय (४) बरगड्यांचा (५) जास्त

प्रश्न २ - योग्य जोड्या जुळवा.

'अ' गट

'ब' गट

(१) छातीतील आंतरिंद्रिय

(अ) मेंदू

(२) पोटातील आंतरिंद्रिय

(ब) बरगड्यांचा पिंजरा

(३) डोक्यातील आंदुरिंद्रिय

(a) यकृत

उत्तरः (१) ड, (२) अ, (३) अ.

(d) फुफ्फुस

प्रश्न ३ - सत्य किंवा असत्य ते ठरवा.

(१) हृदय, फुप्फुस, मेंदू, यकृत ही आपली ज्ञानेंद्रिये आहेत.

(२) श्वास सोडणे म्हणजे नाकाने बाहेरची हवा फुप्फुसांत घेणे.

(३) हृदय आणि फुप्फुसे बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात.

(४) मेंदू सर्व शरीरक्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे तसेच त्यांच्यामध्ये सुसुत्रता ठेवण्याचे काम

करतो.

(५) शरीराच्या सर्व भागांपर्यत रक्ताची ने-आण फुफ्फुसांद्वारे होते.

उत्तर (१) असत्य (२) असत्य (३) खरे (४) खरे (५) खोटे

प्रश्न ४ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) आंतरिंद्रिये म्हणजे काय ?

उत्तर - शरीराच्या आतील भागात असणाऱ्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

(२) पोटामध्ये असलेली आंतरिंद्रिये कोणती ?

उत्तर अन्ननलिका, यकृत, आतडी, स्वादुपिंड ही पोटामध्ये असलेली आंतरिंद्रिये आहेत

(३) आपल्या सभोवतालची माहिती कोणामार्फत मेंदूस मिळत असते ?

उत्तर - आपल्या सभोवतालची माहिती ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूस मिळत असते.

(४) रक्तवाहिन्या म्हणजे काय ?

उत्तर - आपल्या शरीरातील रक्त सतत नलिकांमधून पुढे पुढे जात असते. या नलिकांना रक्तवाहिन्या म्हणतात.

(५) केशवाहिन्या म्हणजे काय ?

उत्तर - केसांसारख्या अतिशय लहान रक्तवाहिन्यांना केशवाहिन्या म्हणतात.

(६) स्क्रीनिंग कशाला म्हणतात ?

उत्तर - फिल्मवर एक्स-रे फोटो न काढता पडदयावर उमटलेल्या चित्रांवरूनही डॉक्टर माहिती पुण) मिळवू शकतात. या तंत्राला स्क्रीनिंग म्हणतात,

प्रश्न ५ - कारणे लिहा.

(प्रत्येकी २ गुण)

(१) बोलणे, धावणे, उड्या मारणे अशा कामांमधील ताळमेळ मेंदूमुळेच ठेवला जातो.

कारण - आपल्या सभोवतालची माहिती ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूस मिळते. विचार करणे, स्मरण

ठेवणे, निर्णय घेणे ही कामे मेंदू करतो. त्यानुसार मेंदू शरीराच्या वेगवेगळ्या भागांना आज्ञा पाठवतो. म्हणूनच बोलणे, धावणे, उड्या मारणे अशा कामांमधील ताळमेळ मेंदूमुळेच ठेवला जातो.

(२) आपल्याला हृदयाचे ठोके जाणवतात.

कारण - रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हृदय पंपाप्रमाणे काम करत असते. गुण त्यासाठी हृदयाचे सतत एकापाठोपाठ आकुंचन आणि प्रसरण होत राहते. त्यामुळेच आपल्याला हृदयाचे ठोके जाणवतात.

प्रश्न ६ - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा

(१) अवयावांच्या कामातील सुसूत्रता म्हणजे काय ? शरीराच्या अवयवांमध्ये ती कशी

दिसून येते ?

उत्तर - शरीराचे अवयव आणि त्यांच्या कार्यात सुसूत्रता ठेवण्याचे काम मेंदू करतो. रक्त 

(क्तवाहिन्या यांच्या कामांमध्ये सुसूत्रता ठेवण्याचे काम हृदय करतो. तसेच श्वासोच्छासामध्ये सुसूत्रता डेवण्याचे काम फुप्फुसे करते. अशाप्रकारे शरीरातील अवयवांमध्ये सुसूत्रता दिसून येते.

(२) रक्ताभिसरण म्हणजे काय ?

पुण उत्तर - हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे आणि तेथून परत हृदयाकडे अशी रक्ताची -आण सतत सुरु असते. याला रक्ताभिसरण असे म्हणतात.

श्न ७- खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

(प्रत्येकी ४ गुण)

(१) भांड्यात झाकून ठेवलेले पाणी पेल्यात घेऊन ते पिणे, या कामात कोणकोणत्या इंद्रियांची मदत होते ? त्यात सुसूत्रता नसल्यास काय होईल.

उत्तर - (i) भांड्यात झाकून ठेवलेले पाणी पेल्यात घेऊन ते पिणे या कामात डोळे, हात, तोंड

या इंद्रियांची मदत होते. यांमध्ये सुसूत्रता ठेवण्याचे काम मेंदू करते. (ii) यात सुसूत्रता नसल्यास पाणं तोंडात न जाता इतरत्र सांडेल.

(२) क्ष-किरणांच्या मदतीने कोणती माहिती मिळणे शक्य झाले ? इतर वैदयकीय तंत्रांचा काय उपयोग होतो ?

उत्तर - (i) क्ष-किरणांच्या म्हणजेच एक्स-रेच्या मदतीने शरीरातील आंतरिद्रियांचे फोट काढण्याचे तंत्र अवगत झाले. (ii) तेव्हापासून हाडे मोडणे, जठर अथवा आतड्यातील बिघाट इत्यादींबद्दल माहिती मिळणे शक्य झाले. (iii) सोनोग्राफीच्या तंत्राने टी. व्ही सारख्या यंत्राच्य पडद्यावर शरीराच्या आतील भागाची स्पष्ट चित्रे पाहता येत्तात. (iv) इतर अनेक तंत्रांमुळे

आंतरिंद्रियांविषयी तसेच शरीराच्या इतर भागातील बिघाडांविषयी नेमकी माहिती मिळविता येते

गरज असल्यास ऑपरेशन करून असे बिघाड दुरुस्तही करता येत्तात.

(३) शांतपणे बसलेली व्यक्ती आणि मेहनतीचे काम करणारी व्यक्ती यांच्य श्वासोच्छ्वासाच्या गतीत काय फरक राहील? का ?

उत्तर - (i) शांतपणे बसलेली व्यक्ती सामान्य गतीने श्वासोच्छ्वास करेल तर मेहनतीचे का करणारी व्यक्ती जलद गतीने श्वासोच्छ्‌वास करेल. (ii) मेहनत करताना शरीराला अधिव ऑक्सिजनची आवश्यकता असते. ही गरज जलद श्वासोच्छ्वासाने भागवली जाते. त्यापेक्षा शांतप बसलेली व्यक्ती कुठलेही श्रम करत नसल्यामुळे सामान्य गतीने श्वासोच्छ्वास करते.

• उपक्रम

(१) डॉक्टरांच्या स्टेथोस्कोपच्या साहाय्याने तुमच्या हृदयाचे ठोके एका मिनिटांत कि पडतात ते मोजा. मनगटावर बोटे ठेवून नाडीचे एक मिनिटांत किती ठोके पडतात

मोजा.

- (i) एका मिनिटांत हृदयाचे ७२ ठोके पडतात.

(ii) एका मिनिटांत नाडीचे ७२ ठोके पडतात.

उत्तर द्या

(२) तुम्ही एखादया दवाखान्यात किंवा इस्पितळात कधी गेलात. तर कोणकोणत

यंत्रांच्या साहाय्याने तपासण्या केल्या जातात. त्यांची नावे व माहिती जाणून घ्या

उत्तर - (१) एक्स-रे मशीन, शरीराच्या आतील हाडे, जठर अथवा आतड्यातील बिघपाच्च शोधण्याकरीत आतील भागाचे फोटो काढले जातात. (२) सोनोग्राफी यंत्र :- आंतरिद्रियांच्या बिघांडांची माहिती मिळविण्यासाठी टि. साच्च

सारख्या यंत्राच्या पडदयावर शरीराच्या आतील भागाची स्पष्ट चित्रे पाहता येतात.

(३) बी.पी. अॅपराटस: ब्लड प्रेशर मोजण्याकरीता.

(४) सी.टी. स्कॅन :- डोक्याची तपासणी करण्याकरीता.

(५) इ.सी.जी :- हृदयाची हालचाल मोजण्याकरीता



Post a Comment

0 Comments