Subscribe Us

आपत्ती व्यवस्थापन.विषय विज्ञान वर्ग 6 भाग एक



सांगा पाहू. (विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक क्र. २६ चा संदर्भ घ्यावा.)

(१) चित्रात तुम्हाला कोणते प्रसंग दिसतात ?

(P.P.C. क्रमांक 26)

उत्तर - भूकंप, दुष्काळ, महापूर, आग लागणे, त्सुनामी, ज्वालामुखी, दरड कोसळणे हे प्रसंग चित्रात दिसत आहेत.

(२) या प्रसंगात तुम्ही काय केले असते ?

उत्तर - असे प्रसंग उद्भवले असता आपण आवश्यक ती दक्षता घेतली असती व काही उपाययोजना केल्या असत्या.

(३) तुम्ही स्वतः कधी हे प्रसंग अनुभवले आहेत काय ?

उत्तर ह्याचे उत्तर विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभवावरून लिहावे.

(४) तुमच्या वर्गात सध्या किती विद्यार्थी आहेत ?

उत्तर - माझ्या वर्गात सध्या ४० विद्यार्थी आहेत.

(५) सध्या आहेत त्यापेक्षा पाचपट विद्यार्थी एकाच वर्गात बसले तर काय होईल ?

उत्तर - गर्दी वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास जागा मिळणार नाही. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे काही विद्यार्थी बेशुद्धदेखील होऊ शकतात 

(६) अत्यंत गर्दीच्या ठिकाणी तुम्हांला कोणती दुर्घटना घडू शकेल असे वाटते ? उत्तर - अत्यंत गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी, बॉम्बस्फोट अशा घटना घडू शकतात.

(७) हे प्रसंग का उद्भवतात ?

उत्तर असे प्रसंग निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे उद्भवतात. ज्यामुळे जीवित, आर्थिक व सामाजिक हानी होते.

जरा डोके चालवा.

(१) शाळेत येतांना किंवा शाळेत असताना तुमच्यावर कोणकोणत्या आपत्ती येऊ शकतात ?

उत्तर - शाळेत येतांना किंवा शाळेत असताना आपल्यावर पुढील आपत्ती येऊ शकतात जसे - (i) अपघात होणे. (ii) अचानक मुसळधार पाऊस आल्यास पूर येणे. (iii) शाळेत विजेचा झटका लागणे. (iv) शाळेत आग लागणे इत्यादी.

(२) या आपत्तींचे निवारण करण्यासाठी काय करावे असे तुम्हांला वाटते ?

उत्तर - (i) प्रत्येक शाळेत प्रथमोपचार कक्ष असावा ज्यामुळे शाळेत कुठलीही आपत्ती आल्यास तात्पुरता उपचार करता येईल. (ii) प्रत्येक शाळेमध्ये पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशी व्यवस्था असावी त्यामुळे शाळेच्या आवारात पाणी भरण्याची शक्यता कमी होईल. (iii) वाहनांमध्ये तसेच शाळामध्ये अग्निशामक यंत्र असावे. (iv) वर्गातील विजेचे बोर्ड वेळोवेळी पाहणी करून दुरूस्त करीत राहावे.

( ३) आपत्ती कशामुळे येतात ? कशा असतात ?

उत्तर - (i) अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. (ii) भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी. (iii) जंगलांना अचानक लागणारी आग. (iv) वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशांत लोकांनी गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता. (v) बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. (vi) पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. (vii) दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यांतून बाँबस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी.

(४) आग, भूकंप, रासायनिक वायू गळती, वादळ, महापूर, त्सुनामी, बाँबस्फोट, इमारत कोसळणे, मोटार अपघात, युद्धे, वणवा या आपत्तींचे मानवनिर्मित व नैसर्गिक

आपत्ती असे वर्गीकरण करा.

उत्तर -

मानवनिर्मित आपत्ती

आग, रासायनिक वायू गळती, बाँबस्फोट, इमारत कोसळणे, मोटार अपघात, युद्धे

नैसर्गिक आपत्ती

भूकंप, वादळ, महापूर, त्सुनामी, पूर, दरड कोसळणे, वणवा

प्रश्न १ - आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा. (अ) पोलीस नियंत्रण कक्ष

(आ) अग्निशामक यंत्रणा (ई) देशपातळीवरील एकच आपत्कालीन नंबर १००, (आ) - १०१, (इ) १०२, (ई) - १०८. (इ) रुग्णवाहिका उत्तर - (अ) प्रश्न २ - तात्काळ काय उपाय कराल ?

(अ)

कुत्रा चावला

उत्तर - (i) जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशिअम परमँगनेटच्या पाण्याने धुवावी.

(ii) जखमेवर कोरडे कापड ठेवावे.

(iii) डॉक्टरांकडे जावून अँटिरेबीज इंजेक्शन घ्यावे.

(a) खरडलेले / रक्तस्त्राव

उत्तर (i) त्या व्यक्तीस आराम वाटेल अशा पद्धतीने बसवावे अथवा झोपवावे.

(ii) रक्तस्त्राव होणारा अवयव पाण्याने स्वच्छ करावा व तो हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा.

(इ) भाजणे / पोळणे

उत्तर - (i) जखमा धुवून घ्याव्या व निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कापड भिजवून जखमा पुसून घ्याव्या.

(ii) कोरड्या ड्रेसिंगने जखमा झाकाव्या.

(e) सर्पदंश

उत्तर- (i) जखम पाण्याने धुवून घ्यावी.

(ii) दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे.

(iii) लवकरच डॉक्टरांना दाखवावे.

(उ) उष्माघात

उत्तर - (i) रुग्णाचे शरीर थंड पाण्याने पुसावे.

(ii) मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवावे.

(iii) पिण्यास भरपूर पाणी, सरबतासारखी पेये दयावी.

(iv) उलटी झाली असल्यास मान एका बाजूस करून पोटावर उताणे झोपवावे.

(v) तातडीने डॉक्टरांकडे दाखवावे.

प्रश्न ३ - असे का घडते ?

(अ) महापूर

उत्तर - महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते. तेव्हा पुराचे संकट ओढवते. अतिवृष्टी झाली की मोठ्या शहरातील पाणी निचरा व्यवस्था अपुरी पडते त्यामुळे ही आपदा येत असते.

(आ) जंगलांना आग

उत्तर आगीलाच वणवा म्हणतात. जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग होय. झाडांच्या पानांमध्ये घर्षण झाल्यामुळे जंगलांना आग लागते.

(इ) इमारत कोसळणे/दरडी कोसळणे

उत्तर - भूकंपाच्या धक्क्यामुळे इमारती कोसळतात तसेच डोंगरी माथ्यावरची मातीघसरून दरडी कोसळतात. कधी कधी अतिवृष्टीमुळेही या घटना घडतात. ढगफुटीमुळेही दरडी कोसळतात.

(ई) वादळ

उत्तर - हवेत निर्माण होणारे कमी-अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात.

(३) भूकंप

उत्तर - भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेव्हा भूकंप लाटा येतात. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात यालाच भूकंप म्हणतात.

प्रश्न ४ खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

(अ) आपत्ती म्हणजे काय ?

उत्तर - अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात.

(आ) आपत्तींचे प्रकार कोणते ?

त्तर आपत्तींचे प्रामुख्याने दोन प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

(i) मानवनिर्मित आपत्ती

(ii) नैसर्गिक आपत्ती

(इ) आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ?

उत्तर - आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.

(ई) आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते ?

उत्तर आपत्ती टाळण्यासाठी योग्य असे व्यवस्थापन करणे. आपत्तींना तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ एकत्रित करणे.

प्रश्न ५ सर्पमित्र कसे काम करतात ?

उत्तर - सर्पमित्र हा समाजसेवक आहे. तो सापालाही इजा होऊ देत नाही व सापापासून लोकांचा बचाव करतो. साप पकडण्यासाठी सर्पमित्राला खूप आत्मविश्वास असावा लागतो. सापाला पाहूनच तो विषारी आहे किंवा नाही ते सर्पमित्राला कळते. ते काठीच्या साहाय्याने सापाला पकडतात. सापाच्या एकूण २००० जाती असून फक्त ५ जाती विषारी आहेत. सापाचा आवाज फुत्कार किंवा शिट्टी मारल्यासारखा असतो. (सर्पमित्र असणारे श्री रूपचंद रामाजी वैद्य यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे.)

प्रश्न ६ - प्रथमोपचार पेटीत कोणकोणते साहित्य असते, त्याची माहिती घ्या.

उत्तर - टिंचरआयोडिन, कैची, चिकटपट्टी, बॅन्डेज, कापूस, डेटॉल, बेटाडिन लिक्विड, बोरोप्लस, स्पीरिट इत्यादी इअरबड, वॉटरप्रुफपट्टी, थर्मामीटर, साबण, सेफ्टीपीन, टॉर्च, नेपकिन, O.R.S. पॅकेट.



Post a Comment

0 Comments