प्रश्न ७ मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती निवारण्यासाठी तुम्ही उपाय सुचवा.
आपत्ती
उपाययोजना
(1) आग
(i) आग लागलेल्या ठिकाणावर वाळू टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करावा.
(ii) घरी अग्निशामक नळकांडे असल्यास वापर करावा.
(iii) आगेचा लोळ जास्त असेल तर त्वरीत अग्निशामक दलाला १०१ या नंबरवर फोन करून बोलवावे.
(2) इमारत कोसळणे
(i) कोणतीही इमारत कोसळल्यास इमारतीच्या आत असणाऱ्या व्यक्तींनी टेबलासारख्या वस्तूखाली लपावे.
(ii) इमारतीत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे.
(3) अपघात
(iii) जखमी रुग्णास दवाखान्यात पाठविण्याची सोय करावी.
कुठलाही अपघात झाल्यास जखमी व्यक्तीस शक्य असेल तर प्रथमोपचार करावा. नंतर दवाखान्यात पाठविण्याची सोय करावी. व्यक्ती जास्त जखमी असेल तर ताबडतोब दवाखान्यात पाठवावे.
(4) पूर
नदीकाठच्या परिसरात किंवा घरात न थांबता उंच ठिकाणावर थांबावे.
(५) युद्धात
(i) युद्धकाळात सुरक्षित ठिकाणी जाऊन राहावे.
(ii) बॉम्बस्फोट, हल्ले होत असल्यास ते ठिकाण त्वरित सोडून दयावे.
(iii) ज्या संघटना मदत करीत असतील त्यांना संपर्क साधावा व मदत घ्यावी.
(i) बॉम्बस्फोट होणार आहे असे कळताच ते स्थान सोडून
सुरक्षित ठिकाणी जावे.
(6) बॉम्बस्फोट
(ii) बॉम्बस्फोटात जखमी रुग्णास लवकरात लवकर दवाखान्यात हलवावे.
(7) भूकंप
(i) भूकंपाच्या वेळी शांतपणे मोकळ्या जागेवर जावून थांबावे.
(ii) ते शक्य नसल्यास टेबलखाली लपून बसावे. (iii) यावेळी लिफ्टचा उपयोग करू नये
(8) महापूर
(i) उंच ठिकाणी जावून थांबावे.
ii) दुषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगापासून स्वतःला ( वाचविण्यासाठी स्वच्छ निर्जंतुकरण केलेले पाणी प्यावे,
(9) वादळ
(i) वादळाच्या ठिकाणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करावा.
(ii) सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबावे.
(iii) जखमी रुग्णास दवाखान्यात पाठविण्याची सोय करावी.
(10) त्सुनामी
(11) दुष्काळ
(i) त्सुनामीच्या वेळी जमिनीपासून उंच ठिकाणी किंवा उंच इमारतीत जावे.
(ii) समुद्रकिनारी जाण्याचे टाळावे.
(i) दुष्काळाच्या वेळी पाण्याचा जपून वापर करावा.
(ii) दुष्काळग्रस्त लोकांची मदत करावी.
(iii) दुष्काळ पडू नये ह्यासाठी पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची सोय करावी.
(12) दरड कोसळणे
(i) डोंगरउतारावर दरडी कोसळतात अशा वेळी आश्रयासाठी डोंगरपायथ्याशी थांबू नये.
(ii) शक्य असल्यास ते स्थळ सोडून दयावे.
उपक्रम :
तुमच्या शाळेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात करायच्या उपाययोजनांची माहिती तयार करा.
उत्तर - आमच्या शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगळी तुकडी तयार केलेली आहे. ज्यांचे इतर लहान तुकड्यांमध्ये विभाजन केलेले आहे. जसे- (i) आपत्तीच्या वेळी विद्यार्थ्यांना बाहेर काढणारी तुकडी. (ii) उरलेल्या विद्यार्थ्यांना शोध घेऊन त्यांना बाहेर आणणारी तुकडी. (iii) प्रथमोपचार करणारी तुकडी.
वरील तुकड्या आपत्तीच्या वेळी त्यांची ठराविक कार्य करतात.
याशिवाय नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लवकरात लवकर शाळा कशी रिकामी करावी याचे प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना दिले जाते. यासाठी प्रथम एक सायरन वाजतो. तसेच विद्यार्थी त्यांना सांगितलेल्या सुचनांनुसार शाळेतून बाहेर पडतात.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी रुग्णास कसे उचलून न्यावे. त्याला प्रथमोपचार कसा दयावा ह्या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांना देतो. यासाठी त्यांना विविध चलचित्रपटही दाखविले जातात. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःचे मनोबल सांभाळून आपला व इतरांची जीव कसा वाचविता येईल हे विद्यार्थ्यांना शिकविले जाते.
विभाग (A)
रचनात्मक मूल्यांकन
◇ तोंडी प्रश्न
(१) महापूर का येतो ते सांगा.
(२) जंगलात आपोआपच लागणाऱ्या आगेस काय म्हणतात ?
(३) आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या एका संस्थेचे नाव सांगा.
(४) शाळेत लागणारी आग कशी विझवाल ?
(५) सर्वच प्रकारचे साप विषारी असतात का ?
उत्तर - (१) अतिवृष्टीमुळे (२) वणवा (३) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
संस्था (४) अग्निशामक नळकांड्याचा उपयोग करून किंवा वाळू टाकून (५) नाही.
विभाग (ब)
संकलित मूल्यमापन
प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(प्रत्येकी १ गुण)
(१) भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उत्सर्जन होते.
(२) ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे.
(३) पसरण्याचा वेग प्रचंड असतो.
(४) १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यातील परिसरात तीव्र भूकंप झाला.
(५) साप चावल्यास जखमेच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे.
उत्तर द्या
(१) ऊर्जेचे (२) महापूर (३) वणवा (४) किल्लारी (५) वरच्या. प्रश्न २ - सांगा मी कोणाशी जोडी लावू ?
(प्रत्येकी १ गुण)
'अ' गट
'ब' गट
(१) महापूर
(अ) वीजपुरवठा खंडित होतो
(२) वादळ
(a) हवा प्रदूषित होते
(३) वणवा
(इ) नदीच्या प्रवाहाची दिशा बदलते
(४) भूकंप
(ई) जमिनीची धूप होते.
उत्तर - (1) - E, (2) A, (3) A, (4) - E.
प्रश्न ३ - नावे लिहा. (प्रत्येकी दोन)
(१) मानवनिर्मित आपत्ती
बॉम्बस्फोट, युद्धे
(प्रत्येकी २ गुण)
(२) नैसर्गिक आपत्ती
भूकंप, त्सुनामी
(३) विषारी सापांच्या जाती
नाग, मण्यार
प्रश्न ४ - खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.
(१) भाजलेल्या जागेवर तेलकट मलम लावावा.
(२) कुत्रा चावल्यास अँटिरेबीज इंजेक्शन घ्यावे.
(३) ढगफुटीमुळे डोंगरउतारावर दरडी कोसळतात.
(४) आपत्तीच्या वेळी मदत केंद्राचा आसरा घेवू नये.
(५) वादळामुळे दळणवळण यंत्रणा खंडित होते.
उत्तर (१) चूक (२) बरोबर (३) बरोबर (४) चूक (५) बरोबर (प्रत्येकी १ गुण)
प्रश्न ५ - काय होईल ते सांगा.
(१) कुत्रा चावल्यास -
उत्तर कुत्रा चावल्यास माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होते.
(२) शाळेत प्रथमोपचार कक्षाची सोय केल्यास
होईल. उत्तर - विद्यार्थ्यांना कुठलाही अपघात झाला तर प्रथमोपचार करण्याची सोय उपलब्ध
प्रश्न ६ - असे का म्हणतात ? (कारणे दया)
(प्रत्येकी २ गुण)
(१) महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे.
उत्तर - पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते. तसेच मोठ्या शहरामध्ये पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडल्याने गटारे तुडुंब भरून पाणी रस्त्यावर पसरते प्रसंगी घरामध्येही शिरते ही परिस्थिती जवळपास दरवर्षीच उद्भवते म्हणून महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे असे म्हणतात.
(२) प्रखर उन्हामध्ये जास्तवेळ काम केल्याने उष्माघात होतो.
उत्तर - प्रखर उन्हामध्ये जास्त वेळ काम केल्याने उष्माघात होतो कारण जास्त वेळ उन्हात काम केल्याने शरीरातील पाण्याचे व क्षारांचे प्रमाण अत्यंत कमी होते.
प्रश्न ७ खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
(प्रत्येकी २ गुण)
(१) सर्पदंश झाल्यास प्रथमोपचाराची गरज का असते ?
उत्तर सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तामध्ये विष पसरण्याची शक्यता असते म्हणून विष पसरू नये याची काळजी घेण्यासाठी प्रथमोपचाराची गरज असते. जखम पाण्याने धुवून जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधून तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
(२) महापूराचे दुष्परिणाम लिहा.
उत्तर - महापूराचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत
(i) मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते.
(ii) जमिनीची धूप होते.
(iii) पिकांचे अमाप नुकसान होते.
0 Comments