Subscribe Us

वर्ग.5.विज्ञान.घटक आहार भाग दोन



 प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(प्रत्येकी १ गुण)

(१) अन्नपदार्थ रंगाने, रूपाने तसेच चवीने एकमेकांपासून असतात.

(२) वयस्कर माणसाचा आहार असतो.

(३) काही अन्नघटकाच्या कमतरतेमुळे जडतात.

(४) रातांधळेपणा जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो.

(५) आपले वय, कामाचे स्वरुप यांनुसार आपण घेतो.

(६) जेव्हा धान्य अंकुरते तेव्हा त्यातील जीवनसत्त्वाचे प्रमाण

उत्तर - (१) भिन्न (२) बेताचा (३) विकार (४) ए (५) आहार (६) वाढते

प्रश्न २ - योग्य जोड्या जुळवा.

(प्रत्येकी १ गुण)

'अ' गट

'ब' गट

(१) पिष्टमय पदार्थ

(अ) पालेभाज्या

(२) प्रथिने

(ब) गहू

(3) स्निग्ध पदार्थ

(a) मांस

(४) क्षार

(ड) करडई

उत्तर - (1) B, (2) A, (3) D, (4) - A.

प्रश्न ३ - प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(प्रत्येकी १ गुण)

(१) कोणत्या पदार्थांमध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते ?

उत्तर - तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांमध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते.

(२) संतुलित आहाराचे दुसरे नाव काय ?

उत्तर - संतुलित आहार म्हणजेच चौरस आहार.

(३) व्यक्तीच्या आहाराचे प्रमाण कशावर अवलंबून असते ?

उत्तर - व्यक्तीच्या आहाराचे प्रमाण तिच्या कामाच्या स्वरूपावर तसेच वयोमानावर

अवलंबून असते.

(४) महागड्या पदार्थांशिवाय आपल्या शरीराला आवश्यक असणारे अन्नघटक कशातून मिळतात ?

उत्तर - महागड्या पदार्थांशिवाय वेगवेगळी फळे, पालेभाज्या, शेंगदाणे, फुटाणे, डाळी,(५) पदार्थ आंबवल्यामुळे काय होते ?

उत्त्तर - पदार्थ आंबवल्यामुळे अन्नातील जीवनसत्त्वाची वाढ होते, त्यामुळे त्यांची पौष्टिकता वाढते.

प्रश्न ४ - व्याख्या लिहा.

(प्रत्येकी २ गुण)

(१) अभावजन्य विकार किंवा त्रुटिजन्य विकार- काही अन्नघटकाच्या कमतरतेमुळे विकार जडतात. त्यांना अभावजन्य विकार किंवा त्रुटिजन्य विकार म्हणतात.

(२) रातांधळेपणा - काही जणांना दिवसा स्पष्ट दिसते. अंधूक प्रकाशात मात्र त्यांना भोवतालच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. याला 'रातांधळेपणा' म्हणतात.

(३) आहारविषयक समुपदेशन - काही विशिष्ट आजारांत स्वतंत्र आहारतज्ज्ञ तसेच तज्ज्ञ डॉक्टर आजारांत कोणता आहार घ्यावा यासाठी आहार विषयक सल्ला देतात. त्याला 'आहारविषयक समुपदेशन' असे म्हणतात.

प्रश्न ५ - शास्त्रीय कारणे लिहा.

(प्रत्येकी २ गुण)

(१) वयस्कर माणसाचा आहार बेताचा असतो.

उत्तर - वयस्कर माणसे कष्टाची कामे फारशी करत नाहीत. त्यांच्यां शरीराची वाढही थांबलेली असते म्हणजेच त्यांची ऊर्जागरज कमी असते. म्हणून वयस्कर माणसाचा आहार बेताचा असतो.


(२) कुपोषित मुले रोगांशी सामना करू शकत नाही.

उत्तर - कुपोषित मुलांच्या आहारात पिष्टमययुक्त आणि प्रथिनयुक्त पदार्थांची कमतरता असते. त्यामुळे या मुलांच्या शरीराची योग्य वाढ झालेली नसते. त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते. म्हणून कुपोषित मुले रोगांचा सामना करू शकते नाहीत.

प्रश्न ६ - टीपा लिहा.

(प्रत्येकी २ गुण)

(१) भारतीय आहार-आपल्या देशात वेगवेगळया प्रांतात वेगवेगळे अन्न खाल्ले जाते. जसे दक्षिणेकडे इडली, दोसा. महाराष्ट्रात झुणकाभाकर, वरणभात तर उत्तरेकडे आलूपराठा, छोलेभटुरे हे लोकांच्या आवडीचे पदार्थ आहेत.

भारतीय आहारातील अन्नपदार्थ तयार करण्याच्या काही पद्धतींमुळे अन्नाची पौष्टिकता वाढते जसे कडधान्यांना मोड आणणे, पदार्थ आंबवणे इ.

(२) अन्न शिजविताना घ्यावयाची काळजी अन्न शिजविताना पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. (i) अन्नपदार्थ खूप वेळ शिजत ठेवू नये. (ii) शिजलेल्या पदार्थांतील पाणी काढून फेकू नये.

प्रश्न ७ - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे दया.

(प्रत्येकी ४ गुण)

(१) निव्वळ पौष्टिक पदार्थ खाण्याने शरीराच्या सर्व गरजा का भागत नाही ? त्यासाठी कसा आहार घ्यावा ?

उत्तर - (i) महागड्या पौष्टिक पदार्थांतून शरीराच्या सर्व गरजा भागत नाही. कारण शरीराला आवश्यक सर्व अन्नघटक मिळत नाही. (ii) वेगवेगळी फळे, पालेभाज्या, शेंगदाणे, फुटाणे, डाळी

कडधान्याच्या उसळी यांतूनही आवश्यक असणा' अन्नघटक मिळतात. (iii) शरीराच्या सर्व अन्नगरजा भागतात. (iv) शरीराची चांगली वाढ होते. (v) त्यांचा आहारात समावेश केल्यास शरीर पुष्ट होण्यास मदत होते.

(२) जीवनसत्त्व 'ए', 'बी', 'सी', 'डी' यांच्या अभावामुळे होणाऱ्या विकारांवर

उपाययोजना म्हणून काय करावे. उत्तर - जीवनसत्त्वांच्या अभावामुळे निरनिराळे विकार जडतात. त्यावर उपाययोजना म्हणून

पुढील उपाय आहेत.

(i) 'ए' जीवनसत्त्व - आहारात पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, आणि दूध यांचा समावेश करावा. (ii) 'बी' जीवनसत्त्व - आहारात डाळी, पालेभाज्या, दूध यांचा समावेश करावा. (iii)'सी' जीवनसत्त्व - आहारात आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करावा. (iv) 'डी' जीवनसत्त्व - दूध, शार्कलिव्हर ऑईल आणि कॉडलिव्हर ऑईल यांचा समावेश आहारात करावा. कोवळचा सूर्यप्रकाशात बसावे.त्यामुळे शरीराची योग्य वाढ होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढते. जमा झालेल्या माहितीवरून आपला आहार संतुलित आहे असे दिसते.

(२) वृत्तपत्रांतील कुपोषणाच्या बातम्यांचे संकलन करा. कुपोषित होण्याची कारणे लक्षात घ्या.

उत्तर - कुपोषणाबाबतच्या बातम्यांचे संकलन विदयार्थांनी स्वतः वर्तमानपत्र वाचून करावे.

अपुऱ्या आणि असंतुलित आहारामुळे योग्य पोषण न होणे याला कुपोषण म्हणतात. कुपोषणाची

काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. (i) अन्नाबद्दल अज्ञान - शरीराच्या योग्य पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नाचा प्रकार, दर्जा, प्रमाण याविषयी योग्य ज्ञान असणे किंवा अपुरे ज्ञान नसणे हे कुपोषणाचे प्रमुख कारण

आहे.

(ii) चुकीच्या अन्नप्रक्रिया - अन्न खूप जास्त वेळ शिजविणे. तांदूळ अधिक सडणे, अन्न शिजवितांना त्यातील पाणी काढू फेकणे यासर्व प्रक्रियांमध्ये अन्नातील पोषक घटक निघून जातात व त्याची पोषण क्षमता कमी होते.

(iii) गरिबी - बहुतांश ठिकाणी गरीबी हे कुपोषणाचे महत्त्वाचे कारण आहे. कारण आर्थिक परिस्थितीमुळे दोन वेळेचे अन्न विकत घेणे हेच शक्य होत नसल्यामुळे, शरीरास योग्य पोषक, संतुलित आहार घेणे संभव नसते.


Post a Comment

0 Comments