४
रोगजंतू आणि रोगप्रसार
महत्वाचे मुद्देः
सूक्ष्मजीव आकाराने लहान असून ते हवा, पाणी, माती, प्राण्यांची शरीरे इत्यादी ठिकाणी आढळतात.
एकाच वेळी अनेकांना झालेला रोग म्हणजे साथीचां रोग. उदा. हिवताप, टायफॉइड, कावीळ, कॉलरा,
• रोग्याच्या सहवासातून झालेला रोग म्हणजे संसर्गजन्य रोग. उदा. क्षय, घटसर्प.
पाण्यामार्फत रोगप्रसार - रोग्याच्या विष्ठेतून पाण्यात रोगजंतूंचा शिरकाव होऊन पाणी दूषित होते. - हया पाण्याच्या वापराने कावीळ, टायफॉइड, कॉलरा, पोलिओ, हगवण या रोगांचा प्रसार होतो.
अन्नामार्फत रोगप्रसार माश्या व धूळ यांद्वारे उघड्या अन्नपदार्थात रोगजंतूंचा शिरकाव, तसेच अस्वच्छ व्यक्तीकडून अन्नपदार्थ हाताळल्यास अन्नात रोगजंतू शिरतातः
• हवेमार्फत रोगप्रसार - रोग्याच्या धुंकल्याने, खोकलण्याने हवेत रोगजंतूंचा शिरकाव होतो. संपर्कात येणाऱ्या व्यक्तीस रोगाची लागण होते. उदा. क्षय, घटसर्प,
कीटकांमार्फत रोगप्रसार - त्वचेचे रोग म्हणतात. उदा. खरूज, नायटा. डासांप्रमाणेच इतर काही किटक, पिसू यांद्वारा रोगप्रसार होतो. उदा. हिवताप, प्लेग. स्पर्शावाटे इतरांपर्यंत पोचतात. या रोगांना संपर्कजन्य रोग म्हणतात.
प्रश्न १ - पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा.
(अ) रोगजंतू आकराने सूक्ष्म असतात.
(आ) आतड्याच्या रोगाचा प्रसार हवेवाटे होतो.
(इ) काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात.
(ई) सूक्ष्मजीव सर्वत्र असतात.
(3) सर्व सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात.
(ऊ) अस्वच्छ हातांनी अन्न हाताळल्यास रोगप्रसार होतो.
उत्तर - (अ) बरोबर, (आ) चूक, (इ) चूक, (ई) बरोबर, (3) चूक, (ऊ) बरोबर.
प्रश्न २ - काविळीची साथ कशी पसरते ?
उत्तर - आतड्याच्या रोग असलेल्या व्यक्तीच्या विष्ठेत रोगजंतू असतात. ही विष्ठा पाण्यात मिसळली गेल्यास रोगजंतूंचा शिरकाव पाण्यात होऊन पाणी दूषित होते. हे पाणी पिण्यासाठी, सरबत, बर्फ, फळांचा रस करणे अशा कामांसाठी वापरण्यात आल्यास. शरीरात रोगजंतूंचा शिरकाव होऊन रोगाची म्हणजेच कावीळीसारख्या रोगाची लागण होऊन साथ पसरते.
प्रश्न ३ - रोगप्रसार करणाऱ्या कीटकांची नावे लिहा.
उत्तर - डास, पिसू, ऊवा, माश्या इत्यादी किटकांमुळे रोगप्रसार होतो.
प्रश्न ४ - रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) घटसर्प रोगाचा प्रसार होतो.
(आ) हिवतापाचा प्रसार होतो.
(हवेवाटे / पाण्यावाटे / अन्नावाटे)L
(डासांमुळे / माश्यांमुळे / ढेकणांमुळे)
(इ) रोगास कारणीभूत ठरणाऱ्या सुक्ष्मजीवांना म्हणतात.
(सूक्ष्मजीव / रोगजंतू / किटक)
(ई) हा फुफ्फुसाचा रोग आहे.
(घटसर्प / क्षय / कावीळ)
उत्तर - (अ) हवेवाटे, (आ) डासांमुळे, (इ) रोगजंतू, (ई) क्षय.
प्रश्न ५ - खरूज, नायटा या रोगांचा प्रसार कसा होतो ?
उत्तर - (i) खरूज, नायटा यांसारखे त्वचेचे रोग स्पर्शावाटे इतरांपर्यंत पोचतात.
(ii) या रोगांची लागण झालेल्यांचे कपडे किंवा वस्तू इतरांनी वापरण्याने यांसरखे रोगहोतात
.प्रश्न ६ - जोड्या लावा.
पुढे आठ शब्द दिले आहेत. त्यांतून रोग आणि रोगप्रसाराचे कारण अशा चार जोड्या पुढील तक्त्यांत भरा.
दूषित पाणी, हिवताप, कॉलरा, हवा, स्पर्श, क्षय, डास, खरूज.
उत्तर -
आजार
रोगप्रसाराचे कारण
(i) हिवताप
डास
(ii) कॉलरा
दूषित पाणी
(iii) क्षय
हवा
(iv) खरूज
स्पर्श
प्रश्न ७ - पुढे काही रोगांची नावे दिली आहेत. त्यांचे पाण्यातून प्रसार होणारे आणि हवेतून प्रसार होणारे असे दोन गट करा.
टायफॉइड, कॉलरा, क्षय, कावीळ, गॅस्ट्रो, हगवण, घटसर्प.
उत्तर - (i) पाण्यातून प्रसार होणारे रोग - टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो, हगवण.
(ii) हवेतून प्रसार होणारे रोग - क्षय, घटसर्प.
प्रश्न ८ - दोन-दोन नावे सांगा.
(अ) पाण्यामार्फत पसरणारे रोग.
(आ) हवेमार्फत पसरणारे रोग.
(इ) कीटकांमार्फत पसरणारे रोग.
(ई) स्पर्शाने पसरणारे रोग.
उत्तर - (i) कावीळ, (ii) हगवण.
उत्तर - (i) क्षय, (ii) घटसर्प.
उत्तर – (i) उष्माघात, (ii) प्लेग.
उत्तर - (i) खरूज, (ii) नायटा
.१ - तुम्हांला माहीत असलेल्या पाच रोगांची नावे सांगा.
उत्तर - टायफॉइड, क्षय, घटसर्प, पोलिओ, डांग्या खोकला.
प्रश्न २- साथीच्या तीन रोगांची नावे सांगा.
उत्तर - कॉलरा, कावीळ, हिवताप हे साथीचे रोग आहेत.
प्रश्न ३ - फुफ्फुसाच्या दोन रोगांची नावे सांगा.
उत्तर -
i) क्षय
(ii) न्यूमोनिया हे फुफ्फुसाचे रोग आहेत.
प्रश्न ४ - काविळीचा प्रसार अन्नपदार्थांतून होतो का ?
उत्तर - सामान्यतः काविळीचा प्रसार अन्नपदार्थांतून न होता पाण्यामार्फत होतो.
प्रश्न ५ - ढेकणापासून रोगप्रसार होतो का ?
उत्तर - ढेकणापासून रोगप्रसार होत नाही.
प्रश्न ६ - हत्तीरोग कोणत्या कीटकामुळे होतो ?
उत्तर - हत्तीरोग क्यूलेक्स नावाच्या डासांमुळे होतो.
(१) सूक्ष्मजीव कशातून पाहता येतात?
(२) क्षय, घटसर्प हे कोणत्या प्रकारचे रोग आहेत ?
(३) घटसर्प हा रोग शरीरातील कोणत्या अवयवात आढळतो?
(४) त्वचेचे रोग कसे पसरतात?
(५) डासांशिवाय इतर कीटकांमुळेही रोगप्रसार होतो काय?
उत्तर - (१) सूक्ष्मदर्शीतून (२) संसर्गजन्य रोग (३) घशामध्ये (४) स्पर्शावाट (५) होय.
(२) म्हणजे सहवासातून होणारा निकटचा संबंध.
(३) माश्या आणि यावाटे उघड्या अन्नपदार्थार्थांत रोगजंतूंचा शिरकाव होतो.
(४) फुफ्फुसाच्या इतर रोगांचा प्रसारही मार्फत होतो.
(५) घटसर्प हा रोग आहे.
(६) आकाराने सूक्ष्म असलेल्या जीवांना म्हणतात.
उत्तर - (१) सजीव, (२) संसर्ग, (३) धूळ, (४) हवे, (५) घशाच्चा, (६) सूक्ष्मजीव.
(प्रत्येकी १ गुण)
प्रश्न २ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) सूक्ष्मजीव कोठे आढळतात ?
उत्तर - हवा, पाणी, माती, प्राण्यांची शरीरे अशा सर्व ठिकाणी सूक्ष्मजीवे आढळतात.
(२) रोगाची साथ होणे म्हणजे काय ?
उत्तर - एकाच वेळी एखादा रोग अनेकांना होणे म्हणजे रोगाची साथ होणे होय.
(३) रोगप्रसार होण्याला कारणीभूत घटक कोणते ?
उत्तर - रोगप्रसार होण्याला हवा, पाणी, अन्न, काही कीटक हे कारणीभूत आहेत.
(४) आतड्याचे रोग कोणते ?
उत्तर - टायफॉइड, कॉलरा, जुलाब हे आतड्याचे रोग आहेत.
(५) क्षयरोगाचे जंतू कशात असतात ?
उत्तर - क्षयरोगाच्या धुंकीत क्षयरोगाचे जंतू असतात.
(६) हिवतापाची लागण कशामुळे होते ?
उत्तर - हिवतापाची लागण अॅनॉफेलिस जातीच्या डासाची मादी चावल्यामुळे होते.
(७) रोगप्रसार करणाऱ्या दोन कीटकांची नावे लिहा ?
उत्तर - डास, पिसू हे रोगप्रसार करणारे कीटक आहेत.
प्रश्न ३ - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे दया.
(प्रत्येकी २ गुण)
(१) रोगप्रसाराबाबत पूर्वी कोणता चूकीचा समज होता ?
उत्तर - पूर्वी एखादया रोगाची लागण झाल्यास तो रोग देवीच्या प्रकोपामुळे, भूतबाधेमुळे किंवा जादूटोण्यामुळे झाला आहे अशी समजूत होत असे. त्यावर उपचार म्हणून मंत्र-तंत्र आणि अघोरी उपाय केले जात असत. शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे हा समज चूकीचा आहे असे सिद्ध होते.
(२) सूक्ष्मजीवांबद्दल थोडक्यात माहिती लिहा ?
उत्तर - (i) सूक्ष्मजीव आकाराने फारच लहान म्हणजेच सूक्ष्म आकाराचे असतात. (ii) नुसत्या डोळयांनी ते दिसू शकत नाही. सूक्ष्मदर्शाच्या साहाय्याने ते दिसू शकतात. आकाराने फारच सूक्ष्म असल्याने त्याला सूक्ष्मजीव हे नाव मिळाले. (iii) सूक्ष्मजीव सजीव असून ते हवा, पाणी, माती, प्राण्यांची शरीरे अशा सर्व ठिकाणी आढळतात. (iv) काही सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात
0 Comments