(३) संसर्गजन्य रोग म्हणजे काय? ते उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर - क्षय, घटसर्प यांसारख्या रोगांची लागण झालेल्या रोग्याच्या सहवासात सतत असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा या रोगाची लागण होण्याची शक्यता असते. म्हणून अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. सहवासातून होणारा निकटचा संबंध म्हणजे संसर्ग होय.
प्रश्न ४ - शास्त्रीय कारणे लिहा.
(१) आपल्याला रोग होण्याची शक्यता असते.
कारण - रोगप्रसार होण्यासाठी हवा, पाणी, अन्न, काही कीटक कारणीभूत ठरतात. आपल्या
शरीरात रोगजंतूचा शिरकाव झाल्यास शरीरातील रोगजंतूंची संख्या वाढते म्हणूनच आपल्याला रोग होण्याची शक्यता असते.
(२) माश्या अन्नावर बसल्याने रोगजंतू अन्नात मिसळून अन्न दूषित होते.
कारण - माश्या आणि धूळ यांमुळे उघड्या अन्नपदार्थांत रोगजंतूंचा शिरकाव होत असतो. माश्या नेहमी घाणीवर बसतात. जर आतड्याचे रोग झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेवर माश्या बसल्या तर त्यातील रोगजंतू त्यांच्या शरीराला, पायाला चिकटतात. त्यामुळे अशा माश्या अन्नावर बसल्यामुळे • रोगजंतू अन्नात मिसळून अन्न दूषित होते.
(३) धूळ अन्नावर पडली असता अन्न दूषित होते.
कारण - सूक्ष्मजीवांच्या रूपातील अनेक रोगजंतू मातीत असतात. वाऱ्याबरोबर मातीचे सूक्ष्मकण धुळीच्या स्वरुपात हवेत सगळीकडे पसरतात. ही धूळ अन्नावर पडली असता अन्न दूषित होते.
(४) स्पर्शावाटे होणाऱ्या रोगांना संपर्कजन्य रोग असे म्हणतात.
कारण - संपर्क म्हणजेच स्पर्श. खरुज, नायटा यांसारखे त्वचेचे रोग स्पर्शावाटे इतरांपर्यंत पोचतात. अशा रोगांची लागण झालेल्या व्यक्तीचे कपडे किंवा कुठलीही वस्तु दुसऱ्या एखादया व्यक्तीने वापरल्यास तिलासुद्धा हा रोग होऊ शकतो. म्हणून स्पर्शावाटे होणाऱ्या रोगांना संपर्कजन्य रोग असे म्हणतात.
प्रश्न ५ - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) बाजारातील उघडे पदार्थ खाल्ल्याने बहुतेकदा जुलाबाची लागण झाल्याचे का आढळून येते ?
उत्तर - (i) माश्या व धूळ यांद्वारा नेहमीच उघड्या अन्नपदार्थांत रोगजंतूंचा शिरकाव होतो. घाणीवर बसल्यामुळे माश्यांच्या पायाला घाण चिकटून अन्न दूषित होते तर धूळीतील रोगजंतूंमुळे अन्न दूषित होते. (ii) बाजारात असे अन्नपदार्थ आचारी, बाढपी, विक्रेते यांच्याकडून हाताळले जातात. (iii) अशा व्यक्तींना आतड्याचे रोग झाले असतील किंवा शौचास जाऊन आल्यानंतरहात स्वच्छ धुतले नसतील तर त्यांच्या हातांवर आणि नखांमध्ये रोगजंतू असण्याची शक्यता असते. (iv) अशा प्रकारच्या रोगी किंवा अस्वच्छ व्यक्तींनी अन्नपदार्थ हाताळल्यास त्यांत रोगजंतू शिरतात. म्हणूनच बाजारातील उघडे पदार्थ खाल्ल्याने बहुतेकदा जुलाबाची लागण झाल्याचे आढळून येते.
(२) क्षयरोग्यांना 'वाटेल तिथे धुंकू नका' असा सल्ला का दिला जातो ? उत्तर - (i) क्षयरोग हा हवेमार्फत पसरणारा रोग आहे. क्षयरोग्याच्या धुंकीत या रोगाचे जंतू असतात. (ii) अशी रोगी व्यक्ती कुठेही धुंकल्यास अथवा खोकलल्यास या रोगजंतूंचा शिरकाव हवेत होऊन ते हवेत पसरतात. (iii) आसपास असणाऱ्या इतर व्यक्तींनाही बराच काळ राहीलेल्याने क्षयरोगाची लागण झाल्याचे बरेचदा दिसून येते. (iv) म्हणून क्षयरोगाचा प्रसार टाळण्यासाठी किंवा या रोगजंतूंच्या पसरण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना टाळण्यासाठीच क्षयरोग्यांना 'वाटेल तिथे धुंकू नका' असा सल्ला दिला जातो.
(३) हिवतापाची लागण कशी होते हे थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर - (i) हिवताप हा किटकामार्फत प्रसार होऊन झालेला रोग आहे. अॅनॉफिलीस जातीच्या डासाची मादी चावल्यामुळे हिवतापाची लागण होत असते. (ii) हिवताप असलेल्या रोग्यास जर हा डास चावला तर रोग्याच्च्या रक्तामध्ये असणारे रोगजंतू त्या रक्तामार्फत डासाच्या शरीरात शिरतात. (iii) हाच डास जर दुसऱ्या एखादया व्यक्तीला चावला तर या डासामार्फत हिवतापाचे रोगजंतू त्या व्यक्तीच्या शरीरात शिरतात अशाप्रकारे हिवतापाची लागण होते.उपक्रम
(१) बागेजवळ, बसस्थानकाजवळ विक्रीसाठी ठेवलेल्या खादचपदार्थांची यादी करा. हे पदार्थ कसे हाताळले जातात. याचे निरीक्षण करा. त्यांची झाकलेल्या व न झाकलेल्या अशा दोन गटांत विभागणी करा.
उत्तर- (i) बागेजवळ, बसस्थानकाजवळ अनेक पदार्थ, खादद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात. या खादद्यपदार्थात अन्नपदार्थ, फळे / फळांचा रस, कुल्फी / आईस्क्रीम / आईसगोला / बिस्कीट अशा प्रकारच्या पदार्थाचा समावेश असतो. जसे भेळ, पाणीपुरी, चाट, गोडपदार्थात जिलेबी, पेठा, दाण्यांच्या पापड्या याशिवाय समोसे, कचोऱ्या, पकोडे, दहीवडे, मिल्कशेक, ऊसाचा रस असे अनेक पदार्थ असतात.
(ii) हे अन्नपदार्थ प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेने हाताळल्या जात नाहीत. अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व्यक्ती, हाताळणाऱ्या व्यक्तीसुद्धा बहुतांशी अस्वच्छच आढळतात. अन्नपदार्थ तयार करण्याची भांडी, प्लेट्स, ग्लासेस, चमचे इत्यादी वस्तू फक्त पाण्याने धुतल्या जातात किंवा नुसत्याच पुसल्या जातात. अशा वस्तू मिळण्याच्या जागा किंवा रस्त्यावरच असल्यामुळे तिथेच अन्न तयार करणे व खरकटी भांडी धुणे असे एकाच ठिकाणी सुरु असते. ती जागा स्वच्छ करण्यास वेळ मिळत नसल्यामुळे किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून माश्या, किटक या पदार्थांवर सतत घोंगावत असल्यास तसेच रस्त्यावरची धूळ, वाहनांतील धूर या पदार्थांवर बसून अन्न दूषित होते यासाठी अन्न झाकून ठेवणे आवश्यकच असते. या ठिकाणी पिण्यासाठी देण्यात येणारे पाणी, वापरण्यात येणारा बर्फ हे सुद्धा प्रदूषित असण्याची शक्यता असते.
झाकलेले अन्नपदार्थ
न झाकलेले अन्नपदार्थ
आईस्क्रिम, बिस्कीट, भेळ, पेढा इत्यादी.
जिलेबी, समोसा, कचोरी, फळे, पकोडे इत्यादी.
२) 'गप्पी मासे पाळा व हिवताप टाळा' असे का म्हटले जाते, याची माहिती घ्या.
उत्तर - हिवतापाची लागण ही अॅनॉफिलीस जातीच्या डासाच्या मादीने चावल्यामुळे होत असते. डासांची पैदास ही नेहमीच साचलेले पाणी, तलाव, डबकी, विहरी या ठिकाणी होत असते. डासांशिवाय इतरही किटक या साचलेल्या अस्वच्छ पाण्यात वाढत असतात. या पाण्यामध्ये डासांची हजारोनी अंडी असतात. यांचा संपूर्ण नायनाट करणे जरी शक्य नसले तरी त्यांचे प्रमाण कमी करणे शक्य आहे. पाण्यात जर किटकनाशक फवारे, औषधे, पाऊडर यांचा उपयोग केल्यास ते पाणी कोणाच्याही पिण्यास अथवा वापरण्यास चालणार नाही. त्यासाठी स्वस्त, सोपा, सहज शक्य होणारा तसेच परिणामकारक योग्य उपाय म्हणजे गप्पी मासे पाळणे होय. गप्पी मासे हे छोट्यासामान्य
प्रकारच्या मासोळ्या असून त्या सहज कुठेही सापडू / मिळू शकतात. तज्ज्ञांच्या मते हे मासे साचलेल्या अशा दूषित पाण्यात सोडल्यास ते त्यातील डासांची व किटकांची अंडी, अळचा इत्यादी खाऊन पाणी स्वच्छ करतात. हे गप्पी मासे पाळल्यामुळे पाणी दूषित होण्यापासून तर वाचतेच त्यासोबतच डासांचाही नायानट होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक गावात, शहरात ठिकठिकाणी 'गप्पी मासे पाळा व हिवताप टाळा' असे लिहिलेले दिसून येते. यातूनच जनजागृती होऊन परीसर स्वच्छ होतो व रोगप्रसार होण्याची शक्यता कमी होते.
प्रश्न १ - रिकाम्या जागा भरा.
(१) शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्याचे नियंत्रण करतो.
(२) अन्नाचे पचन मध्ये होते.
(३) जेव्हा धान्य अंकुरते तेव्हा त्यातील जीवनसत्त्वाचे प्रमाण
(४) घटसर्प हा रोग आहे.
(५) सूक्ष्मजीव आहेत.
प्रश्न २ - योग्य जोड्या लावा.
'अ' गट
'ब' गट
(५)
(१) छातीतील आंतरिंद्रिय
(अ) गहू
(२) पिष्टमय पदार्थ
(ब) पालेभाज्या
(३) क्षार
(४) हिवतापं
(d) फुफ्फुस
(५) क्षय
(इ) हवा
प्रश्न ३ - पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा.
(१) सूक्ष्मजीव सर्वत्र असतात.
(२) सर्वांचा आहार एकसारखा असतो.
(३) पचनाची क्रिया जठरात सुरू होते.
(४) हृदय आणि फुफ्फुसे बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात,
(५) यकृत, मेंदू आपली ज्ञानेंद्रिये आहेत.
५)प्रश्न ४ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) रोगप्रसार होण्याला कारणीभूत घटक कोणता?
(२). भात शिजतांना त्यातील पाणी काढून का फेकू नये?
(३) अन्नपचन म्हणजे काय?
(४) तुम्हांला माहीत असलेल्या आंतरिंद्रियांची नावे सांगा.
(५) हिवतापाची लागण कशामुळे होते?
प्रश्न ५ - कारणे लिहा.
(१) आपल्याला हृदयाचे ठोके जाणवतात.
(२) शिजणाऱ्या पदार्थांतील पाणी काढू नये.
(३) वयस्कर माणसाचा आहार बेताचा असतो.
(४) स्पर्शावाटे होणाऱ्या रोगांना संपर्कजन्य रोग असे म्हणतात.
0 Comments