• दिवसभरातील खाल्ल्या जाणाऱ्या सर्व अन्नपदार्थांना एकत्रितपणे 'आहार' म्हणतात.
• वेगवेगळचा अन्नामध्ये पिष्टमय, प्रथिनयुक्त किंवा स्निग्ध पदार्थ, तसेच क्षार किंवा जीवनसत्त्वे कमी- अधिक प्रमाणात असतात.
• विविध अन्नघटक पुरेसे प्रमाणात मिळतील तसेच प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील असे अन्नपदार्थ समाविष्ट असणाऱ्या आहाराला 'संतुलित आहार' म्हणतात.
• प्रत्येक व्यक्तीचा आहार वयोमानावर तसेच रोज करत असलेल्या कामाच्या प्रकारावर अवलंबून असतो. वाढत्या वयातील मुलगा, मुलगी यांची अन्नाची गरज साधारणतः सारखीच असते.
• केवळ महागड्या अन्नपदार्थातून उत्तम पोषण होतेच असे नाही तर पोषक अन्नघटकांचा समावेश असणाऱ्या नेहमीच्या अन्नपदार्थांतूनही शरीराच्या गरजा भागून शरीर पुष्ट होण्यास मदत होते.
• अपुऱ्या आणि असंतुलित आहारामुळे कुपोषण होते. कुपोषित व्यक्तींच्या शरीराची योग्य वाढ झालेली नसते. अशी मुले रोगांशी सामना करू शकत नाहीत.
• काही अन्नघटकाच्या कमतरतेमुळे विकार जडतात. त्यांना अभावजन्य विकार किंवा त्रुटिजन्य विकार म्हणतात.
• जीवनसत्त्व हा आहारातील महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्यांच्या अभावामुळे अनेक विकार होतात.
• भारतात वेगवेगळचा भागात वेगळे अन्नपदार्थ खाल्ल्या जातात. काही पारंपारिक पद्धतीमुळे अन्नाची पौष्टीकता वाढते.
• अन्नपदार्थ जास्त काळ शिजविल्यामुळे त्यातील काही जीवनसत्त्वे नाश पावतात.
• योग्य आहार न घेतल्यास आजारपण येते. आजारात घ्यायच्या आहाराबाबत डॉक्टर मार्गदर्शनपर सल्ला देतात. आहारविषयक दिलेल्या सल्ल्याला 'आहारविषयक समुपदेशन' असे म्हणतात.
प्रश्न १ - आहार म्हणजे काय ?
उत्तर - दिवसभरातील खाल्ल्या जाणाऱ्या सर्व अन्नपदार्थांना एकत्रितपणे 'आहार' म्हणतात. उदा. आपल्या जेवणात भात, वरण, भाजी, भाकरी, पोळी, मांस, मासे असे अन्नपदार्थ असतात.
प्रश्न २ - जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे कोणकोणते विकार संभवतात
उत्तर - जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे निरनिराळे विकार जडतात.
(1) ए जीवनसत्त्व रातांधळेपणा हा विकार जडतो.
(ii) बी जीवनसत्त्व - (१) जीभ लाल होणे. (२) त्वचा खरखरीत होणे.
(iii) सी जीवनसत्त्व - हिरड्यांतून रक्त येणे.
(iv) डी जीवनसत्त्व
(१) पायाची हाडे वाळणे. (२) पाठील बाक येणे.
प्रश्न ३ - पुढील विधाने बरोबर की चूक ते सांगा.
(अ) लहान मुलांना बेताचा आहार पुरतो.
(आ) कष्ट करणाऱ्या स्त्रीचा आहार बेताचा असतो.
(इ) इडली पौष्टिक असते.
ई). सर्वांचा आहार एकसारखा असतो.
(3) महाग पौष्टिक पदार्थ असलेला आहारच संतुलित असतो.
उत्तर -
(a) वगळणे
चूक (इ) बरोबर (ई) चूक (उ) चूक
प्रश्न ४ - कुपोषण म्हणजे काय ? कुपोषणाचे परिणाम सांगा.
उत्तर - अपुऱ्या आणि असंतुलित आहारामुळे योग्य पोषण झालेले नसते. याला कुपोषण म्हणतात. कुपोषित आहारामुळे लहान मुलांवर खालील परिणाम झालेले दिसून येतात.
(i) शरीर अशक्त व हडकुळे झालेले असते. (ii) मुलांचे पोट पुढे आलेले असते. (iii) मुलांच्या चेहऱ्यावर तजेला नसतो. (iv) आहारात पिष्टमय आणि प्रथिनयुक्त पदार्थांच्या कमतरतेमुळे शरीराची योग्य वाढ झालेली नसते. (v) त्यामुळे ही मुले रोगांशी सामना करू शकत नाहीत.
प्रश्न ५ - थोडक्यात उत्तरे दया.
(अ) अन्नपदार्थांची पौष्टिकता वाढवणाऱ्या दोन कृती सांगा.
उत्तर - भारतात वेगवेगळया भागांत वेगवेगळे अन्नपदार्थ खाल्ले जातात. काही पारंपारिक पद्धतीमुळे अन्नपदार्थाची पौष्टिकता वाढते.
(i) हरभरा, मूग, मटकी अशा कडधान्यांना मोड आणून केलेल्या उसळी खातो. मोड येताना धान्यामधील जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते. (ii) तांदूळ आणि उडीद डाळीचा भरडा आंबवून इडली, डोसा, आंबोळी असे पदार्थ तयार केले जातात. आंबवल्यामुळे अशा अन्नातील जीवनसत्त्वाची वाढ होऊन त्याची पौष्टिकता वाढते.
(आ) अन्नपदार्थांची पौष्टिकता कशामुळे कमी होते ?
उत्तर - (i) अन्नपदार्थ जास्त काळ शिजवल्यास. (ii) शिजलेल्या पदार्थांतील पाणी काढून
टाकल्यामुळे अन्नपदार्थांची पौष्टिकता कमी होते.
प्रश्न ६ - व्याख्या दया.
संतुलित आहार - शरीराला लागणारे सर्व अन्नघटक पुरेसे मिळतील तसेच व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील असे निरनिराळे अन्नपदार्थ आहारात असायला हवेत. अशा आहाराला 'संतुलित आहार' किंवा चौरस आहार म्हणतात.
प्रश्न 7 - कारणे सांगा.
(अ) वाढत्या वयातील मुलामुलींना जास्त आहाराची गरज असते.
कारण - वाढत्या वयातील मुलामुलींची वाढ झपाट्याने होत असते. त्यासाठी ऊर्जागरज अधिक प्रमाणात पाहीजे असते. ही ऊर्जागरज जास्त आहारातून पूर्ण होते. म्हणून वाढत्या वयातील मुलामुलींना सारख्याच प्रमाणात जास्त आहाराची गरज असते.
(आ) शिजणाऱ्या पदार्थातील पाणी काढू नये.
कारण - अन्न शिजताना त्यातील उपयुक्त अन्नघटक पाण्यात विरघळतात. शिजताना त्यातील पाणी काढल्यास उपयुक्त घटकसुद्धा कमी होतात व अन्नाची पौष्टिकता कमी होते. म्हणून शिजणाऱ्या पदार्थातील पाणी काढू नये.
इ) बैठे काम करणाऱ्यांपेक्षा कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तींचा आहार जास्त असतो.
उत्तर - व्यक्तीच्या आहाराचे प्रमाण तिच्या कामाच्या स्वरुपावर अवलंबून असते. कष्टाची कामे करणाऱ्या व्यक्तीची ऊर्जागरंज ही बैठे काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त असते. ही ऊर्जागरज अधिक आहारातून पूर्ण होत असते. म्हणून बैठे काम करणाऱ्यापेक्षा कष्टाची कामे करणाऱ्या व्यक्तीचा आहार जास्त असतो.
(ई) मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी खाव्या.
उत्तर - मोड येताना धान्यांमधील जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्नाची पौष्टिकता वाढते. म्हणून मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी खाव्या.
प्रश्न १ - चहा, फुटाणे चॉकलेट यांचा आहारात समावेश होतो का ?
उत्तर - दोन वेळचे जेवण म्हणजेच आहार आहे असे अनेकांना वाटते. तथापि इतर वेळी खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थात पाचही अन्नघटक समाविष्ट असल्याने चहा, फुटाणे, चॉकलेट यांसारख्या सर्व खादचपदार्थांचा आहारात समावेश होतो.
प्रश्न २ - बैठे काम करणाऱ्या पुरुषापेक्षा कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रीला अधिक आहाराची गरज का असते ?
उत्तर - बैठे काम करणाऱ्या पुरुषापेक्षा कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रीची शारिरीक हालचाल अधिक असते. म्हणून तीला जास्त ऊर्जेची गरज असते व ही गरज अधिक आहारातून पूर्ण होते. म्हणून बैठे काम करणाऱ्या पुरुषापेक्षा कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रीला अधिक आहाराची गरज असते.
प्रश्न ३ - 'नेहमी ताजे अन्न खावे' असे का म्हणतात ?
उत्तर - शरीरस्वास्थाच्या दृष्टीने नेहमी ताजे अन्नच खाणे चांगले परंतु क्वचित एखादया वेळेला स्वयंपाक जास्त झाल्यास अन्न उरते. तेव्हा शिळे झालेले अन्न टाकू नये. पदार्थ खराब झाल्यास असे अन्न खाऊ नये.
प्रश्न ४ - भात शिजताना त्यातील पाणी काढून फेकावे का ?
उत्तर - भात शिजताना त्यातील पाणी फेकू नये कारण पाण्यात भातातील पौष्टीक पदार्थ विरघळलेले असतात.
0 Comments