घौरवंश
■ गजनी आणि हेरातच्या दरम्यानच्या पर्वतीय प्रदेशात घौर हे लहान राज्य आहे.
■ इ.स. १०१० ला महमूद गजनीने घौरी साम्राज्यातील मुख्य किल्ला 'फीरोजकोह' जिंकला.
■ घौरीवंशातील (गादीवर आलेल्या) 'शंसबानी' हा वंश प्रसिद्ध होता.
■ I.S. 1110 महमूदने गझनीचा घौर शासक मुहम्मद बिन सूरी याचा पराभव केला.
■ गजनीशासक बहरामने घौरवंशी राजकुमार मलिक कुतुबुद्दीन हसनची हत्या केली. त्यामुळे हसनचा भाऊ सैफुद्दीन सुरीने गजनीवर आक्रमण केले पण बहरामकृत सैफुद्दीनचीही हत्या केली.
■ सैफुद्दीन सुरीच्या हत्येनंतर सुरीचा लहान भाऊ अल्लाउद्दीनने गजनीवर आक्रमण केले.
■ इ.स.११७३ ला अल्लाउद्दीन हसनच्या मृत्यूनंतर सैफुद्दीनचा पुतण्या गयासुद्दीन महमूद गजनी गादीवर रूढ झाला.
■ गयासुद्दीन महमूदने आपला लहान बंधू मुईनुफीन ऊर्फ महमूद घौरीला गजनी शासक म्हणून नियुक्त केले.
■ महम्मूद घौरीने भारतावर इ.स.११७५-१२०५ पर्यंत आक्रमणे केली.
■ घौरी आक्रमणावेळी पंजाब राजधानी लाहौरचे सत्ताधीश अरब होते.
■ तराईनची युद्धभूमी थानेश्वरपासून १४ मैल अंतरावर आहे.
■ तराईनच्या I युद्धात पृथ्वीराजचा भाऊ गोविंदराजने घौरीला जखमी केले होते.
■ तराईन । युद्धाने पृथ्वीराज चौहान भंटिडा किल्ल्याचा शासक बनला.• मोहम्मद घौरी कन्नौज युद्धात गुंतला असताना पृथ्वीराजचा भाऊ हरिराजने दिल्लीवर केलेले आक्रमण कुतुबुद्दीनने परतवून लावले होते.
■ इ.स. ११९५-९६ नंतर मोहम्मद घौरी मध्य- आशियात साम्राज्यविस्तारासाठी व्यस्त राहिला.
■ इ.स.११७८ मोहम्मद घौरीने अन्हिलवाडा (गुजरात) चा शासक भीमदेव दुसरा याच्या राजधानीवर आक्रमण केले त्यात घौरीचा पराभव झाला.
■ अन्हिलवाड्याचे दुसरे नाव 'पट्टन' हे होते.
■ अन्हिलवाड्यावर बघेला घराण्याची सत्ता होती.
इ.स.१२०३ ला मोहंम्मद घौरीचा भाऊ गयासुद्दीनचा मृत्यू झाला.
■ इ.स.१२०४ ला पंजाबच्या खोकरांनी घौरी विरुद्ध विद्रोह केला.
■ इ.स.१२०६ खोकरांचा पाडाव ऐबकाच्या मदतीने करून घौरी गझनीला परत जाताना जिल्हा झेलमधील घनबाद येथे खोकरांनी त्याची हत्या केली.कुतुबुद्दीन ऐबक: I.S. 1206-10
■ मोहम्मद घौरीचा कुतुबुद्दीन ऐबक हा दास होता.
■ निपुत्रिक मोहम्मद घौरीचा मृत्यू इ.स. १२०६ साली झाला.
• मोहम्मद धौरीचा कुतुबुद्दीन ऐबक हा विश्वासू गुलाम आणि सेनापती होता.
• मोहम्मद घौरीच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी गयासुद्दीन - धौरीने कुतुबुद्दीन ऐबकला दिल्लीचा सुलतान बनवले.
■ कुतुबुद्दीन ऐबक गुलाम वंशात जन्मलेला असल्याने त्याचा वंश दास वंश म्हणून ओळखतात.
• भारतात कुतुबुद्दीन द्वारा स्थापित सत्ता दास वंश नावाने ओळखली जाते.
• कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश आणि बलबन हे भारतातील तीन गुलाम सुलतान बनले.
कोण कोणाचा दास?
मालक
गुलाम
१) मोहम्मद घौरी
कुतुबुद्दीन ऐबक
२) कुतुबुद्दीन ऐबक
इल्तुतमिश
3) इल्तुतमिश
बल्बन
■ दास वंशालाच 'अफगाणवंश/पठाणवंश' असेही म्हणतात, परंतु ते सर्व तुर्क होते.
■ भारतात तुर्की साम्राज्याचा वास्तविक संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक हा होय.
■ भारतात दासवंश इ.स.१२०६-१२९० पर्यंत सत्तेवर होता.
कालखंड
गुलाम
इसवी सन १२०६ ते १२९०
खिलजी
इ.स. 1290 ते 1320
तुघलक
इ.स. 1320 ते 1414
सय्यद
इसवी सन १४१४ ते १४५१
लोदी
इ.स. 1451 ते 1526
कुतुबुद्दीन ऐबक जन्माने तुर्की होता.
■ ऐबकला निशापूरचा काझी फकरुद्दीनने दास रुपात खरेदी केले.■ काझीच्या मृत्यूनंतर ऐबकाला व्यापाऱ्यांकडून गजनीला शहाबुद्दीन मौहम्मद घौरीने विकत घेतले.
■ मोहम्मद घौरीने ऐबकाला 'अमिर ए - अखूर' (अस्तबल प्रमुख) म्हणून नेमले.
■ घौरी ऐबकाला 'चंद्रमुखी' या नावाने संबोधत असत.
■ पहिल्या आणि दुसऱ्या तराईनच्या युद्धात घौरीला कुतुबुद्दीनने मदत केली.
■ तराईनच्या ।। युद्धानंतर ऐबकास भारताचा गव्हर्नर नेमण्यात आले.
■ ऐबकाने दिल्लीच्या जवळ 'इंद्रप्रस्थ' ही राजधानी बनवली.
■ ऐबकाने गुजरातच्या भागातून सेना एकत्र करून राजपुतांचा पराभव केला.
■ ऐबकाने ताजुद्दीन एल्दौजच्या मुलीशी विवाह केला.
■ नासुरूद्दीन कुबाचाचा विवाह ऐबकाने आपल्या बहिणीशी लावला. तर ऐबकने आपल्या मुलीचा विवाह इल्तूतमिशशी लावला.
■ इ.स.१२०६ साली बुंदेलखंडाच्या विजयानंतर मोहम्मद घौरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने दिल्लीहून लाहोरला जाऊन सत्ता हातात घेतली.
■ घौरीच्या मृत्यूनंतर ३ महिन्यानी २४ जून १२०६ साली ऐबक भारताचा सत्ताधीश बनला त्याने सुलतान पदवी धारण न करता 'मलिक' अथवा 'सिपहसालार' ही पदवी धारण केली.
■ सत्तारूढ झाल्यानंतर गजनीच्या गयासुद्दीन मोहंम्मदकडे त्याने उपहार व दूत पाठवले.
■ इ.स.१२०८ साली गयासुद्दीन घौरीने ऐबकाला दिल्लीचा स्वतंत्र शासक म्हणून मान्यता दिली.
■ दिल्ली विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ इ.स.११९२ ला ऐबकाने कुबातूल इस्लाम मस्जिद बांधली.■ ऐबकाने कुतुबमिनार बांधण्यास प्रारंभ केला पण त्याची पूर्णतः इल्तुतमिश काळात झाली.
■ कुतुबमिनार ख्वाजा कुतुबुद्दीनच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुतुबुद्दीन ऐबकाने बांधला.
■ इ.स.१२०० कुतुबुद्दीन ऐबकाने अजमेर ठिकाणी मस्जिद बांधली. या वास्तुस अडीच दिवसांची झोपडी म्हणतात. (अडीच दिवसात बांधकाम केल्याने)
■ A.D. 1210 पोलो खेळताना
घोड्यावरून पडून ऐबकाचा मृत्यु लाहोर येथे झाला.
■ ऐबकाच्या दरबारातील प्रसिद्ध साहित्यिक हसन निजामी व फकरेमुरीद हे होते.
■ कुतुबुद्दीन ऐबक दानशूर असल्याने त्याला 'लाख बख्ख' (लाखो दन देणारा) म्हणतात.
आरामशाह (इ.स. 1210-11)
■ कुतुबुद्दीन ऐबकानंतर त्याचा पुत्र आरामशाह सत्तेवर आला.
आरामशाहाने लाहोरहून राज्य केले.
■ दिल्लीच्या तुर्की सरदारांनी ऐबकाचा जावई इल्तुतमिशला दिल्ली गादी स्वीकारण्याची विनंती केली.
■ इल्तुतमिश आणि आरामशाहा यांच्यात दिल्लीजवळ युद्ध होऊन आरामशाह कैद झाला.
ऐबक घराण्याची सत्ता इलबारी घराण्याच्या इल्तुत्मिशने ताब्यात घेतली.
0 Comments