Subscribe Us

मेळघाट भ्रमंती 2

 *मेळघाट भ्रमंती -४*

*एकटी राहिलेली ब्रिटिश लेडी*

नाव माहीत नाही, पण ती दिसायला सुंदर अशी ब्रिटिश तरुणी होती. 

बाप जंगल खात्यात वरिष्ठ अधिकारी होता. 

पत्नी तिकडे इंग्लंडमध्येच निवर्तली होती की काय कोण जाणे, पण तो हिंदुस्तानात येताना या मुलीला सोबत घेऊन आला होता. 

यथावकाश ती मोठी होत गेली.

वयात आली. 

मग लग्न बिग्नं करावं की नाही?

आणि करावं तर कुणाशी? 

दरम्यान आपला हा देश तिला खूप आवडला होता. खास करून मेळघाट आवडला होता. इथली साधी भोळी व सरळ माणसे आवडली होती. त्यांचं जगणं आवडलं होतं. 

हे आवडणं इतकं हावी झालं, की तिनं मरेपर्यंत इथंच राहण्याचा निर्धार केला. 

पुढे वडील सेवेतून निवृत्त झाले.

मग म्हातारे झाले आणि त्यांचं निधन झालं. 

पण तिनं ना आपला मुक्काम हलवला ना लग्नं केलं. 

त्यानंतर कितीतरी वर्षे ती इथंच राहिली. 

विशेष म्हणजे तिचं वागणं, बोलणं, चालणं, पेहराव सगळं कसं शैलीदार आणि अत्यंत टापटिपीचं होतं. 

थोडीफार चित्रकलाही अवगत होती. 

ती रानोमाळ भटकायची.

राहायला स्वतंत्र बेंगलो होता. 

पदरी अनेक नोकर चाकर होते. 

या नोकरांना राहायला काही खोल्या बांधून दिलेल्या होत्या. 

त्यांनी शेवटपर्यंत तिची चाकरी केली. 

काळाची पाने उलटत गेली. 

अखेर ही बाई म्हातारी झाली आणि याच जागेत तिनं शेवटचा श्वास घेतला.

या घटनेला आता पन्नास वर्षे होत आहेत. 

या महिलेची आणखी एक सुरस तेवढीच रोचक कथा या भागात ऐकायला मिळते. (वेळ मिळाला तर लिहीन) 

ती ज्येष्ठ लोक सांगतात. 

फक्त ते तुम्हाला सापडले पाहिजेत आणि ऐकण्यासाठी हिंमत हवी. 

बाद द वे, ती जिथं राहत होती तो बेंगलो आजही तिची साक्ष देत उभा आहे. 

नोकरांची घरंही आहेत. 

पण हे भग्नावशेष आहेत आणि सध्या तिथं कुणीच राहत नाही. 

हे आपल्या मेळघाटात आहे.

*-अशोक मानकर*

Post a Comment

0 Comments