*गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी शाळा*
*शाळेच्या पट संख्येत 20 टक्के ने वाढ*.
*जिल्हा परिषद म ऊ प्रा शाळा आंबोडा.पंचायत समिती नांदुरा जिल्हा बुलडाणा*
*हजार बर्क गिरे लाख आंधियां उठे*
*वो फुल खिल के रहेंगे जो खिलने वाले है*
*कॉन्व्हेन्ट चे प्रस्त असताना जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आंबोडा येथे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत पट संख्येत 20 टक्के पर्यंत वाढ झाली.येथे वर्ग 1 ते 8 चे वर्ग असून मागील काही वर्षात शाळेचा पट अत्यंत कमी होत होता. सातत्याने विद्यार्थी संख्या घटत होती या गंभीर समस्येवर येथे कार्यरत असलेले शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत आणि गावातील शिक्षण प्रेमी यांनी विचार मंथन करीत जिल्हा परिषद शाळा वाचविण्यात मोठा पुढाकार घेतला. या वर्षी विद्यार्थी संख्या तब्बल 20 टक्के ने वाढत शालेय पट हा 145 + पर्यंत आला.मागील वर्षी 120 पट असताना सामूहिक प्रयत्नातून पट संख्या वाढली*
*येथे कार्यरत असलेल्या शिक्षणाची शैक्षणिक पात्रता*.
1.*श्री शि दे कुटे* बी ए बी एड.
2.*मंगला घनोकार* एम ए. डी एड
3.*रश्मी जैन*.बी ए. डी एड
4.*श्री प्रेमचंद राठोड*. डी एड राज्य आदर्श शिक्षक.
5.*धनराज सातपुतळे*. बी ए बी एड.
6 *सविता तायडे*. एम ए .डी एड.
7 *डॉ किशोर वानखेडे*.*पीएच. डी, सेट, नेट, बी.एड,एम. ए. इतिहास, राज्यशास्त्र,समाज शास्त्र,शिक्षण शास्त्र,शैक्षणिक संप्रेषण,अर्थशास्त्र, डीएसएम, सी पी सी टी*
*नांदुरा पंचायत समितीचे गट विकास बी बी हिवाळे साहेब गट शिक्षणाधिकारी आदरणीय प्रधान साहेब.केंद्रप्रमुख श्री बाठे साहेब तथा जिल्हा स्तरावरील अधिकारी वर्ग यांनी सातत्याने नैतिक पाठबळ,मार्गदर्शन करताना शाळेच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले*
*शाळेची वैशिष्ट्ये*
* *ग्राम पंचायत ने प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे . क्रीडांगणात सौर उर्जेवर चालणारा मोठा कॅमेरा बसवितांना शाळा सुरक्षा बाबत ठोस पाऊल उचलले त्याच प्रमाणे शाळेला एका बाजूने संरक्षक भिंत बांधली*
* *शाळा स्तरावर 4 कॉम्प्युटर,3 प्रोजेक्टर असून त्या मार्फत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करताना नियमितपने अध्यापन केले जाते*
* *शाळेतील सर्व विद्यार्थांना RO चे शुद्ध पाणी दिले जाते.गाव स्तरावर ही RO उपलब्ध आहे*
* *विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना विद्यार्थी हीत सर्वात आधी जोपासले*
* *लोक सहभागातून मागील वर्षी शाळेच्या प्रथम दर्शनी भागाची रंग रांगोटी करीत शाळेला बोलके स्वरूप दिले केवळ 15 मिनिटात शाळा विकासा साठी 50 हजार रुपये शिक्षक,ग्रामस्थांचे सहभागातून जमा झाले*
* *गावातील उच्च शिक्षित पालक, माजी विद्यार्थी मेळावे आयोजित करून शाळेच्या विकासात त्यांचा सहभाग घेतला*
* *शालेय अभ्यासक्रम बरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा ,विविध स्पर्धा परीक्षा,आणापान ,वन भोजन,शैक्षणिक सहल,बाल आनंद मेळावा,पर्यटन,तथा मूल्य संवर्धन पर उपक्रम राबविले सोबतच शाळा स्तरावर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीस सातत्याने प्रोत्साहन दिले. सांस्कृतिक कार्यक्रम कोरीयोग्राफर म्हणून तायडे मॅडम डॉ किशोर वानखेडे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.वाहतूक सुरक्षा सप्ताह बाबत जिल्हा क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्तम अभिनय सादर केला श्री कुटे सर, जैन मॅडम, धनोकर मॅडम यांनी ही महत्त्वाचे योगदान दिले*
* *श्री प्रेमचंद राठोड यांनी व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे 50 हजाराचे बक्षीस शाळेस दिले डॉ किशोर वानखेडे यांनी पूर्णतः नादुरुस्त असलेली खोली स्व खर्चातून दुरुस्त केली आणि त्या खोलीस किल्ल्याचे रूप दिले.तर श्री धनराज सातपुतळे यांनी गावातील अनाथ असहाय मुलांना दत्तक घेत त्यांच्या शैक्षणिक खर्च उचलला*
* *अध्यापन होत असतानाच गाव स्तरावर मोहल्ला अभ्यासगट स्थापन करून सुटीचे कालावधीत ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले*
* *शाळा स्तरावर सेल्फी वुईथ सक्सेस,todays challenge भविष्यवेधी शिक्षण वाचन उपक्रम नुसार नियमित वृत्त पत्र वाचन,सह शालेय पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्याचा आर्थिक पाया पक्का व्हावा यासाठी बचत बँक हे उपक्रम नियमित राबविले जातात.विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य पर बक्षिसे दिली जातात*
*शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवचरण भोंगे,उपाध्यक्ष योगिता संतोष बगाडे,शिक्षण तज्ज्ञ दिगंबर बावस्कर, तथा आजी माजी सदस्य ,गावाचे माननीय सरपंचा सौ वासनकर ताई, उपसरपंच ,नाजिम शाह,माजी सरपंच एकनाथ मापारी ग्राम स्तर अधिकारी श्री देशमुख यांचे सोबत सर्व आदरणीय सदस्य गण ,गावातील शिक्षण प्रेमी यांनी शिक्षकांच्या कार्यावर विश्वास ठेवून विद्यार्थी हिताय सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. याचा योग्य तो परिणाम झाला आणि शासन आणि प्रशासनात आम्बोडा शाळेबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली.त्यामुळे अधिकारी वर्गाचे ही सातत्याने मोलाचे सहकार्य मिळाले*
*शिक्षकांची मेहनत,गाव कऱ्यांची उत्तम साथ,अधिकारी वर्गाचे पाठबळ प्रेरणा यामुळे आज अनेक शाळांचा पट कमी होत असताना आम्बोडा शाळेत मात्र मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दाखल होत आहेत. वर्ग पहिली प्रमाणेच वर्ग 2 ते 8 मध्ये कॉन्व्हेन्ट मधील विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. जिल्हा परिषद शाळांत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते आणि हा विश्वास या शाळेने सार्थ ठरविताना पट कमी होत आलेल्या शाळेने पुन्हा नवं संजीवनी मिळवीत क्रांतीच घडवली*
म्हणूनच या शाळेच्या बाबतीत
*अब हवाये ही करेगी रोशनी का फैसला*
*जिस दिये मे जान होगी वो ही दिया रह जायेगा* ही उक्ती योग्य ठरते
*शब्दांकन*
*डॉ किशोर मारोतीराव वानखेडे*
0 Comments