१३
आपली सुरक्षा, आपले उपाय !
व्याकरण व भाषाभ्यास (शुद्धलेखन)
खालील उत्तारा वाचा, विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. (पा.पु.पृ.क्र ५२ वरील उतारा पाहावा.)
उत्तर- शाळा सुरू होऊन चार दिवस लोटले. अभ्यासक्रम सुरू करण्याअगोदर भगत सर वर्गातील मुलांना स्वच्छतेचे, नियमित शाळेत येण्याचे, अभ्यासाचे महत्त्व सांगत होते. मागील बाकावर बसलेल्या मुलांची चुळबुळ सुरू झाली. तेव्हा सरांनी विचारले, "शंकर, काय चालले तुमचे ?" मागे शंकर उठून उभा राहिला व म्हणाला, "सर, बाहेरून कसली तरी दुर्गंधी येतेय." वर्गातील बोलका व अतिउत्साही विशाल लगेच खिडकीच्या बाहेर डोकावून पाहत म्हणाला, "काही नाही हो सर. बाहेर नाला साफ करणारे आले आहेत. त्याचा वास येतोय." वर्गातील अनेकांनी नाकं दाबून धरली. काहींच्या तोंडातून 'शी' असे शब्द बाहेर पडले. भगत सर आताच स्वच्छतेचे महत्त्व सांगत होते व मुलांच्या अशा प्रतिक्रिया पाहून त्यांना वाईट वाटले. सर म्हणाले, "मुलांनो, आता पावसाळा सुरू होणार आहे. तेव्हा पाण्याने नाल्या तुंबू नयेत म्हणून ते नाल्या साफ करायला आले आहेत आणि तुम्हांला नाक मुरडायला काय झाले?"
प्रश्न १ - 'आपली सुरक्षा, आपले उपाय!' या उताऱ्यांचे प्रकटवाचन करा.
उत्तर - विद्यार्थ्यांनी या उताऱ्याचे स्पष्ट उच्चारात न अडखळता वाचन करावे.
चित्रांचे निरीक्षण करा. वाचा.
(१) गिझर - अंघोळीला जाताना अगोदर गिझरचे बटण बंद करावे व नंतर गिझरचे गरम पाणी सोडावे. वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला, तर वीजप्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो व विजेचा झटका बसू शकता.
(२) रोशणाई - लग्न, कौटुंबिक समारंभ वा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विजेची अनावश्यक रोशणाई टाळावी. रोशणाईसाठी लावलेल्या दिव्यातून वीजप्रवाह प्रवाहित होताना जर काही अडथळा आला तर आग लागण्याची शक्यता असते.
(३) विजेची वायर सतरंजी, कारपेट, गालिचा, यांखालून विजेची वायर जाऊ देऊ नये, कारण जर त्या आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाली तर वीजप्रवाह प्रवाहित होताना अडथळा येऊन आग लागू शकते.
(४) प्लग - विजेच्या एकाच बोर्डवर विजेवर चालणारी अनेक साधने व त्यांचे प्लग लावू नयेत. वीज प्रवाहावर दाब येऊन आग लागू शकते
(१) दीपाने पाहिला तसा प्रसंग तुम्ही कधी पाहिला आहे का ?
उत्तर दीपाने पाहिला तसा प्रसंग आम्ही पाहिला आहे. आमच्या शेजारच्या फर्निचरच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली होती.
(२) गॅसच्या टाकीचा स्फोट झाला होता म्हणजे नेमके काय झाले होते ?
उत्तर - गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे प्रचंड आवाज होऊन गॅसच्या टाकीला आग लागली होती व टाकीचे तुकडे उडाले होते.
(३) लोक पाण्याच्या बादल्या, घमेली का नेत होती?
उत्तर - लोक पाण्याच्या बादल्या, घमेली आग विझवायला नेत होते. विचार करा, सांगा.
(१) खालील विद्युन उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल?
उत्तर द्या
- (१) इस्त्री - वायरिंग नीट पाहूनच इस्त्री हाताळू.
(२) गिझर - आधी गिझरचे बटन बंद करू मग पाणी सोडू.
(३) मोबाईल - मोबाईल चार्जिंगला लावला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करूनच फोन घेऊ.
शिक्षक व पालक यांच्या मदतीने समजून घ्या. (१) घरात आग कशाकशामुळे लागू शकत
उत्तर - सिलेंडरमधील गॅस चालूच ठेवला आणि नंतर आगपेटीची काडी जाळली तर घरात आग लागू शकते. फटाके घरात उडवताना किंवा बाहेरचा फटाका घरात घुसला तर आग लागू शकते. पेटलेली आगपेटीची काडी, उदबत्ती, मेणबत्ती पूर्णपणे न विझवता कुठेही घरात फेकली तर आग लागू शकते.
(२) आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा ?
उत्तर - आपल्या हाताला इजा होऊ नये किंवा चटका बसलेल्या जागेची आग होऊ नये म्हणून आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली धरावा.
(३) रेल्वेस्थानक, एसटी, स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बाटल्या भरून ठेवलेल्या दिसतात. त्या कशासाठी असतात ?
अत्तर - रेल्वेस्थानक, एसटी स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी आग लागलीच तर ती विझवण्यासाठी वाळूच्या बाटल्या भरून ठेवलेल्या असतात.
(४) अग्निशमन यंत्र कुठे कुठे बसवलेले तुम्ही पाहिले आहे ? त्या ठिकाणी
ते का बसवलेले असते ?
उत्तर- अग्निशमन यंत्र हॉस्पिटलस्मध्ये, फॅक्टरीमध्ये, मोठ्या हॉटेल्समध्ये,
चित्रपटगृहामध्ये, अॅटोमध्ये व ऑफिसेसमध्ये बसवलेले असते. अचानक आग लागलीच तर ती विझवायला त्याचा उपयोग होतो.
(५) गावाहून आल्यावर अगोदर घराची वारे-खिडक्या उघडाव्यात व नंतर विद्युत दिवा लावावा, असे का ?
उत्तर - घरात गॅस असतो. तो लिक होऊ शकतो. घरभर पसरू शकतो
गावाहून आल्यावर दारे-खिडक्या न उघडता विद्युत दिवा लावल्यास आग लागू शकते.
लक्षात ठेवा.
(१) खिडक्यांच्या पडद्याजवळ पेटती मेणबत्ती, उदबत्ती वा इतर गोष्टी ठेवू नयेत.
(२) आगीमुळे घरात खूप धूर झाला असेल तर घरातून रांगत रांगत बाहेर पडावे.
(३) विद्युत उपकरणांचा वापर करून झाल्यावर विद्युत बटण त्वरित बंद करावे.
(१) रात्री झोपताना रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना विजेचे दिवे वा इतर उपकरणे बंद ठेवावीत. त्यामुळे विजेची बचत होते.
(२) रुमाल वाळवणे घरातील लॅम्पशेडवर वा बल्बवर एखादा रुमाल वाळत घातला, ब्लब खूप गरम झाला, तर तो वाळत घातलेला रुमाल पेट घेऊ शकतो.
(३) डिपीपासून दूर राहावे - विद्युत मंडळाच्या डिपीतून अनेक घरांमध्ये वीज प्रवाह प्रवाहित केलेला असतो. त्या डिपीमध्ये वायरींचे जाळे दिसते. या डिपीपासून दूर राहावे. त्या वायरींना हात लावू नये.
(४) स्वयंपाकाची शेगडी, स्टोव्ह स्वयंपाकाची शेगडी, स्टोव्हजवळ जळाऊ वस्तू ठेवू नये. उदा. कपडे, काचेच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, कागद
(१) मोबाइल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून फोन घेणे.
(२) लायटर, काडेपेटी यांच्याशी न खेळणे
(३) विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे पाहणे.
(४) जुन्या, कुरतडलेल्या विजेच्या वायरी वेळीच बदलाव्यात.
0 Comments