Subscribe Us

वर्ग.6.मराठी.बलसागर भारत होवो

भावार्थ


माझा भारत देश शक्तिशाली होवो. साऱ्या जगात दिमाखाने शोभुनी राहो. माझ्या भारताची किर्ती सर्व जगात पसरावी.

हे प्रतिज्ञाचे कडे मी माझ्या मनगटात बांधले आहे. लोकांच्या सेवेसाठी आयुष्य दिले आहे. देशाच्या कल्याणासाठी आता माझे प्राण शिल्लक राहिले आहे. देशासाठी बलिदान द्यायला मी तत्पर आहे.

माझा देश मी ऐश्वर्यसंपन्न करीन. माझे अवघे जीवन त्यासाठी समर्पित करीन. या दाट काळोखाचा मी नाश करीन. देशबांधव अहो तुम्ही मदतीला या.

हातात हात गुंफून मनाशी मन जोडुन एकजुटीचा मंत्र ओठात जपून हे शुभ कार्य करायला बांधव हो तुम्ही या.

हातात तेजस्वि निशान घेऊया प्रियतम भारताची गौरव व गाणी गाऊ या. साऱ्या जगात पराक्रम गाजवू या आणि आपल्या मायभूमीला पूर्वीचे स्वतःचे मानाचे स्थान मिळवून देऊ या.

उठा उठा आपण प्रयत्नांची पराकाष्टा करूया मायभूमीसाठी दिव्य पुरुषार्थ संपादन करूया असे केले नाही तर आपले आयुष्य व्यर्थ ठरेल. आपल्या नशिबातच सूर्य सदैव तळपत राहो.

माझी मातृभूमी महान ठरेल. वैभवाने दिव्य दिमाखदार शोभेल. साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल तो सोन्याचा दिवस प्राप्त होवो.

Post a Comment

0 Comments