Subscribe Us

नैसर्गिक संसाधने.

 आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे दया.



(१) पक्षी कोठे आहेत ?

उत्तर पक्षी आकाशात उडत आहे.

(२) गाई कोठे चरत आहेत ?

उत्तर गाई मैदानात चरत आहेत.

(३) रस्ता, झाडे कोठे आहेत ?

उत्तर रस्ता, झाडे जमिनीवर आहेत.

(४) नदी कोठून कोठे वाहात आहे ?

उत्तर नदी पर्वतावरून वाहत वाहत गावातून वाहत जात आहे.

(५) विमान कोठे आहे ?

उत्तर विमान आकाशात आहे अर्थात वातावरणात आहे.

(६) मासे कुठे दिसत आहेत ?

उत्तर मासे पाण्यात अर्थात जलावरणात दिसत आहेत.

(७) होडी कशावर तरंगत आहे ?

उत्तर होडी पाण्यावर तरंगत आहे.

थोडे आठवा

वातावरणाचे पाच थर कोणते ?

उत्तर तपाबंर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर, बाह्यांबर हे वातावरणाचे पाच थर आहेत.

जरा डोके चालवा.

पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते ?

उत्तर (i) हवेतील विविध वायू व इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. (ii) हवा नसती तर ऑक्सिजन नसता, जो आपणास श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयोगी आहे, म्हणून हवा नसती तर जीवसृष्टीच नसती.

माहिती मिळवा.

समुद्र, महासागराचे पाणी खारट असून सुद्धा उपयुक्त कसे आहे ?

उत्तर - (i) समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे पिण्यायोग्य नसते. मात्र त्या खारट पाण्यापासून मीठ तयार होते. (ii) मीठाशिवाय अन्नास चव नसते. तसेच समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे अधिकतम वाफ तयार होते व त्या वाफेने ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडतो. पावसामुळे आपणास पाणी उपलब्ध होते.

जमीन कशाची बनलेली असते ?

उत्तर जमीन दगड, माती, मोठे खडक यांनी बनलेली असते,

(२) तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते ?

हे उत्तर आपणास जमिनीवर दगड, माती, खडक, पाणी व सजीव दिसतात.

(३) मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले आहे ?

उत्तर - मानवाने जमिनीवर जमिनीतून खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायूचा शोध लावला आहे व त्याचा उपयोग केला आहे. तसेच शेती, निवासस्थाने, रस्ते तयार केले आहेत.

(४) जमिनीत खोल खड्डा खणला, तर तुम्हांला त्यात काय आढळते ?

उत्तर - जमिनीत खोल खड्डा खणल्यास आपण मोठे दगड, खनिज, माती व पाणीआढळते.

(५) जमीन सर्वत्र सपाट असते का ?

उत्तर- जमीन सर्वत्र सपाट नसते. ती कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा स्वरूपात पाहता येते.

(६) मानव जमीन निर्माण करतो का ?

उत्तर नाही.

जमीन हे नैसर्गिक संसाधन आहे.

जरा डोके चालवा.

(१) मृदेमधील विविध घटक कोणते ? त्यांचे जैविक व अजैविक असे वर्गीकरण करा. उत्तर - खडे, वाळू, माती, सूक्ष्मजीव, कृमी, कीटक या घटकांनी मृदा तयार होते. जैविक घटक - सूक्ष्मजीव, कृमी, कीटक. अजैविक घटक खडे, वाळू, माती.

(अ) ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.

उत्तर - (i) ओझोन थर सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक किरणांना शोषून घेतो. (ii) म्हणून सर्व सजीव सृष्टीचे त्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते. म्हणून ओझोन पृथ्वीचे संरक्षक कवच आहे असे म्हणतात.


Post a Comment

0 Comments