प्रश्न २- खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) जहागीर म्हणजे काय ?
उत्तर - जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क होय.
(२) शिवाजीमहाराजांनी कोणते किल्ले घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली ?
उत्तर - शिवाजीमहाराजांनी मुरुंबदेव, तोरणा, कोंढाणा पुरंदर हे किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.
(३) स्वराज्यस्थापनेच्या कार्यास कोणत्या सरदारांचा विरोध होता ?
उत्तर - स्वराज्यस्थापनेच्या कार्यास जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे व वाडीचे सावंत इत्यादी सरदारांचा विरोध होता.
(४) आदिलशाहाकडून शहाजीराजांना कोणता प्रदेश जहागीर म्हणून मिळाला ?
उत्तर - आदिलशाहाकडून शहाजीराजांना कर्नाटकात बंगळूर व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला.
(५) 'बारा मावळ' कशाला म्हणतात ?
उत्तर - शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच मावळ खोरे होय. यांना 'बारा मावळ' असेही म्हणतात.
प्रश्न ३ - सकारण लिहा. (१) बडी साहेबीणने अफजलखानास शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले.
उत्तर - (i) शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. (ii) जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता. (iii) कोकण किनारपट्टीवर स्वराज्यस्थापनेच्या कार्यास गती मिळाली. (iv) या सर्व गोष्टी हे आदिलशाहीस आव्हान होते.
यावेळी आदिलशाहाचा कारभार बडी साहेबीण पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे, असे तिला वाटत होते म्हणून तीने आदिलशाहितील अफजलखान या बलाढ्य व अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले.
(२) शिवाजीमहाराजांनी सिद्दी जौहरशी वाटाघाटीची बोलणी सुरू केली.
उत्तर - (i) शिवाजीमहाराजांनी आदिलशाही समोर मोठे आव्हान निर्माण केले. त्यावेळी आदिलशाहाने इ.स. १६६० मध्ये सिद्दी जौहर या कर्नुल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. त्यावेळी सिद्दी जौहरच्या मदतीला रूस्तुम-इ-जमान, बाजी घोरपडे आणि फाजलखान हे सुद्धा होते. (ii) अशा परिस्थितीत महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला. (iii) पन्हाळ्यास सिद्दीच्या सैनिकांचा पाच महिने वेढा चालू असल्यामुळे महाराजांना वेढ्यातून बाहेर पडणे कठीण झाले होते. त्यावेळी नेताजी पालकरने बाहेरून सिद्दीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. (iv) पण त्याचे सैन्य अगदी थोडे असल्यामुळे ते शक्य झाले नाही आणि सिद्दी वेढा उठवेल असे चिन्ह दिसत नसल्यामुळे, शिवाजीमहाराजांनी सिद्दी जौहरशी वाटाघाटीची बोलणी सुरू केली.
१ - नावे सांगा.
(१) सरदार लखुजीराजे जाधव यांची कन्या-
उत्तर - जिजाबाई
(२) जावळीचे मातब्बर सरदार -
उत्तर - चंद्रराव मोरे
(३) प्रतापगडावर ठार मारलेला शत्रू -
उत्तर - अफजलखान
उपक्रम
जिवा महाला, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे या शिवरायांच्या सहकाऱ्यांविषयी माहिती मिळवा.
उत्तर द्या
बाजीप्रभू देशपांडे
बाजीप्रभू देशपांडे हे शूर, धाडसी आणि चतुर होते. त्यांची शिवरायांवर अपार श्रद्धा होती. सिद्दी जौहरच्या वेढ्यात शिवरायांबरोबर बाजीप्रभू होते. ते शिवरायांना विशाळगडाकडे जाण्यास सांगून स्वतः शत्रूला घोडखिंडीत रोखून धरण्याचे सांगतात. कारण शत्रूचे सैन्य अफाट होते व त्यांच्यापुढे आपला निभाव लागणार नाही. हे बाजीप्रभूना माहित होते. त्यांनी शिवरायांना, तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा. असे सांगतात. बाजीप्रभूची स्वामिभक्ती बघून शिवराय गहिवरतात. बाजीप्रभूसारखा मोहरा इरेला घालणे शिवरायांच्या जिवावर येते. परंतु स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. ते बाजीप्रभूना प्रेमाने भेटतात आणि विशाळगडाकडे निघून जातात. बाजीप्रभू घोडखिंडीच्या तोंडाशी उभे राहतात. ते शत्रूशी झुंज देतात. ते आपल्या पराक्रमाची शर्थ करतात. पण खिंडीचे तोंड सोडत नाही. शिवराय विशाळगडावर पोहोचल्यावर तोफांचे आवाज ऐकून बाजीप्रभू आपले प्राण सोडतात. ही वार्ता शिवरायांना समजल्यावर त्यांना मोठे
दुःख होते. बाजीप्रभूसारख्या स्वामिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. म्हणून 'पावनखिंड' या नावाने ती इतिहासात अमर झाली.
तानाजी मालुसरे
तानाजी मालुसरे आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. तो कोकणात महाडजवळ उमरठे गावचा राहणारा. अंगाने धिप्पाड, बुद्धीने चलाख आणि शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती. तो स्वतःच्या मुलाचे रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शोलारमामासोबत शिवरायांकडे आला होता. शिवरायांनी त्याला आपण कोंढाण्याच्या कामगिरीवर असल्याने रायबाच्या लग्नाला येऊ शकणार नसल्याचे सांगितले. तानाजीने ही कामगिरी स्वतः स्वीकारली.
कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार उदेभान हा कडक शिस्तीचा होता. गडाच्या दोन्ही दरवाजांवर पक्का बंदोबस्त होता. तानाजीने गडाची पाहणी केली. गडाच्या पश्चिमेला उंच उंच कडा असल्याने तेथे पहारा नव्हता. तानाजीने चढून गडावर प्रवेश करायचा व धाकट्या भावाने सूर्याजीने कल्याण दरवाजा गाठायचा असा बेत आखला.
रात्रीच्या अंधारात तानाजी व काही मावळे कडा चढले. व सूर्याजीने कल्याण दरवाजा गाठला. उदेभानला याची खबर लागली. त्याचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. उदेभान व तानाजी यांची झुंज सुरू झाली. हे दोघेही धारातीर्थी पडले.
इकडे सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून पळणाऱ्या मावळ्यांना थांबवले. घनघोर लढाई झाली व मावळ्यांनी गड सर केला. तानाजीसारखा शूर धारातीर्थी पडला. ही बातमी कळल्यावर शिवराय व जिजाबाई यांना खूप हळहळले व म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला' ही घटना १६७० मध्ये घडली. तेव्हापासून कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाले
प्रकल्प
तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे वर्णन करा.
प्रकल्पाचे नाव - तुम्ही पाहिलेल्या एखादया किल्ल्याची माहिती मिळवा.
प्रकल्पाचा प्रकार - सर्वेक्षणात्मक प्रकल्प
उद्दिष्ट्ये - डोंगरी किल्ल्यांची माहिती मिळविणे.
साहित्य - विषयाशी संबंधित पुस्तके, एक कोरी वही, पेन, चित्रे, कात्री, डिंक इत्यादी.
निवेदन - ऐतिहासिक वास्तूंमध्ये डोंगरी किल्ले अधिक महत्त्वपूर्ण होते. या किल्ल्यांची माहिती मिळविण्यासाठी हा प्रकल्प करण्यात आला आहे.
कृती -
(i) विषयाशी संबंधित पुस्तके वाचली.
(ii) त्यातील डोंगरी किल्ल्याची माहिती एका कोऱ्या वहित लिहिली.
(iii) त्या माहितीच्या बाजूला त्यासंबंधित चित्रे चिटकविली.
(iv) तयार झालेली माहिती सादरीकरणासाठी दिली.
सादरीकरण
नाणेघाटाचा जीवधन किल्ला
नाणेघाटाच्या वर असलेला जीवधन किल्ला जुन्नरच्या उत्तरेला २७ किलोमीटर अंतरावर आहे. नाणेघाट चढल्यानंतर उजवीकडे हा किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. तेथेच सरळसोट वांदारलिंगी सुळका आहे. हा सुळका १३० मीटर उंच व खडा पारशी सुळका आहे.
जीवधन किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी घाटघर हे एक टुमदार गाव आहे
हा किल्ला उजवीकडे ठेवत मोकळ्या पायवाटेने चालल्यानंतर खऱ्या अथनि किल्ल्यावर आल्यासारखे वाटते. त्यानंतर कातळ पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो. या पायऱ्या बऱ्याच उंच आहेत. काही ठिकाणी सुरूंग लावून पायऱ्या तोडल्यामुळे त्याठिकाणी खोबण्या खोदलेल्या दिसतात. काही वेळातचं पहिले भग्न प्रवेशद्वार स्वागत करतांना दिसते. त्याच्या डावीकडे एक निवासी गुंफा नजरेस पडते. पुन्हा खोदीव पायऱ्या चढत गेल्यावर खऱ्या अर्थाने किल्ल्यात प्रवेश केला जातो. येथे इंग्रजांनी बऱ्याच ठिकाणी सुरूंग लावून पायऱ्या उध्वस्त केल्याचे जाणवते. त्यामुळे या किल्ल्यावरची वर्दळ कमी झाली. आणि किल्ल्याचा जिवंतपणा लोप पावला असल्याचे जाणवते. समोर उंचावर एक काळ्या कभिन्न पाषाणाची मंदिरासारखी लक्षवेधी वास्तू दिसते. त्यावर फडफडणारा भगवा ध्वज अंग शहारून टाकतो. पुढे दक्षिण बाजूला पाण्याच्या पाच खोदीव टाक्या आहे. येथूनच पुढे गडमाथा येतो.
येथे ढिगाऱ्याजवळ गडदेवता जिजाबाईचे वृंदावन आहे. पूर्वेला कुकडी खोऱ्यातली हडसर, चावंड, शिवनेरी यांची मांदियाळी भुरळ पाडते. तर पश्चिमेला कोकणाचा अफाट मुलूख दृष्टिक्षेपात राहतो. उत्तरेला वराडा डोंगररांग व पलिकडे दूरवर हरिश्चंद्रगड, रतनगड असे इतर किल्ले दिसतात. दक्षिणेला दुर्ग-ढाकोबाच्या अजस्त्र कातळकडा दिसतात. पश्चिम बाजूने उतरायला सुरुवात केली तर तीन कमानयुक्त दरवाजे, अर्ध गोलाकार बुरूज, तटबंदीचे अवशेष, पुढे सलग कातळातील दरवाजा असे सर्व इतिहासकालीन स्थापत्यवैभव न्याहाळत बांदरलिंगीच्या गगनभेदी सुळक्याचे दर्शन होते. मग पश्चिम बाजूला माचीसारख्या जागेवर बाहेरचा रस्ता दिसतो.
४७
ट
आणि
c
.
व
नाही.
0 Comments