Subscribe Us

इतिहासाची साधने.वर्ग 7

(१) स्मारकामध्ये कोणकोणत्या बाबींची समावेश होतो ?

उत्तर- स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ या बाबींचा समावेश. होतो.

(२). तवारिख म्हणजे काय ?

• उत्तर- तवारिख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम होय.

(३). इतिहासलेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतातै ? *

उत्तर - इतिहासलेखनात लेखकाचा निःपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू फार महत्त्वाचे असतात.

प्रश्न ३ - गटातील वेगळा शब्द शोधून लिहा.

'(१) भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिकं साधने

उत्तर - अलिखित साधने

(२) स्मारके, नाणी, लेणी, कथा

उत्तर - कथा

(३) भुर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे

उत्तर - मंदिरे

(४) ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके

उत्तर - तवारीखा

प्रश्न ४ - संकल्पना स्पष्ट करा.

(१) भौतिक साधने

उत्तर- किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट या वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची 'भौतिक साधने' असे म्हणतात.

(२) लिखित साधने

उत्तर - त्या काळातील देवनागरी, अरेबियंन, पर्शियन, मोडी, आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फर्मान, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण-समारंभ यांचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची 'लिखित साधने' असे म्हणतात.

(३) शाब्दिक अर्थ

उत्तर - लोकपरंपरेत पिढ्यान्पिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यांतून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची 'मौखिक साधने' असे म्हणतात.

प्रश्न ५ - ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का ? तुमचे मत सांगा

(i) या ऐतिहासिक साधनांतील अस्सल साधने कोणती आणि बर्नावट साधने कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. (ii) इतिहास लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे, यालाही महत्त्व असते. (iii) लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. (iv) आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. (v) सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. (vi) इतिहासलेखनात लेखकाचा निःपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते.

प्रश्न ६ - तुमचे मत लिहा.

(१) शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.

उत्तर - शिलालेखातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला

मदत होते. म्हणून शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो.

(२) मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.

उत्तर - लोकपरंपरेत पिढ्या‌न्पिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके या मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.

उत्तर होय. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. कारण - ऐतिहासिक साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते.

(i) या ऐतिहासिक साधनांतील अस्सल साधने कोणती आणि बर्नावट साधने कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. (ii) इतिहास लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे, यालाही महत्त्व असते. (iii) लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. (iv) आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. (v) सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. (vi) इतिहासलेखनात लेखकाचा निःपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते.

प्रश्न ६ - तुमचे मत लिहा.

(१) शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.

उत्तर - शिलालेखातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायलामदत होते. म्हणून शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो.

(२) मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.

उत्तर - लोकपरंपरेत पिढ्या‌न्पिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके या मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.

• अतिरिक्त प्रश्नोत्तरे

2- (अ) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

२) भौतिक साधनांमध्ये चे महत्त्वपूर्ण स्थान असते.

(ग्रंथाचे, किल्ल्यांचे, बखरीचे)

म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख होय. (ताम्रपट, भूर्जपत्रे, शिलालेख)

२)

३) सम्राट अकबराच्या नाण्यांवर हे चित्र होते.

(शिवपार्वतीचे, रामसीतेचे, अकबराचे)

तर (१) किल्ल्यांचे (२) शिलालेख (३) रामसीतेचे

1) योग्य जोड्या लावा.

'अ' गट

'ब' गट

) भौतिक साधने

(अ) लोकगीते

) लिखित साधने

(b) किल्ले

) शाब्दिक अर्थ

(a) ताम्रपट

(ड) परंपरा

बार (1 - B), (2 - A), (3 - A)

- खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

- कोणत्या व्यक्तींनी लिहिलेल्या तवारिखा उपलब्ध आहेत ?

२- अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद,

इतिहास व नागरिकशास्त्र -

मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारिखा उपलब्ध आहेत.

(२) कोणत्या पाश्चात्त्य इतिहासकारांचे ग्रंथ महत्त्वाचे आहेत ?

उत्तर - रॉबर्ट आर्म, एम. सी. स्प्रंगल आणि ग्रँट डफ या पाश्च्यात्य इतिहासकारांचे ग्रंथ महत्त्वाचे आहेत.

रचनात्मक मूल्यांकन

• तोंडी काम/तोंडी परीक्षा

प्रश्न १ - एका शब्दांत उत्तर सांगा.

(१) दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख-

उत्तरः शिलालेख

(२) तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख-

उत्तर - ताम्रपट

प्रश्न २ - गटात न बसणारा पर्याय लिहा.

(१) गिरिदुर्ग, वनदुर्ग, भुईदुर्ग, राणीवासा

उत्तर - राणीवास

(२) राजवाडे, मंत्रिनिवास, घरे, वीरगळ

उत्तर - वीरगळ

उत्तर - तवारिख / तारीख म्हणजे घटनाक्रम होय.

प्रश्न १ - सांगा पाहू.

नाणी इतिहास कसा सांगतात.

उत्तर - नाण्यांवरून राज्यकर्त्याचे नाव, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते. त्या काळातील धातूशास्त्राची प्रगती समजते. यांवरून नाणी इतिहास सांगतात..

ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा.

उत्तर - (i) ऐतिहासिक स्थळांना भेटी देतांना तेथील साधनांवर कोणत्याही विकृत प्रकारचे लेखन करणार नाही. याची काळजी घ्यावी. (ii) तेथे कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी. (iii) पुरातन वास्तूंची योग्य वेळी डागडुजी करावी. (iv) तेथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. (v) ऐतिहासिक साधनांचे जतन करण्या चे ही लक्ष द्यायला हवे

Post a Comment

0 Comments