सांगा पाहू.
(१) चामडे, ताग, लोकर, कापूस व पाणी, माती, धातू या दोन गटातील नैसर्गिक पदार्थांमध्ये कोणता फरक आहे ?
उत्तर- चामडे, ताग, लोकर, कापूस हे पदार्थ वनस्पती व प्राण्यांपासून मिळतात म्हणजेच ते जैविक पदार्थ आहे. तर पाणी, माती, धातू या वस्तू निसर्गात उपलब्ध असतात म्हणजेच ते नैसर्गिक पदार्थ आहेत.
(२) प्लॅस्टिक, नायलॉन, पितळ, सिमेंट हे पदार्थ निसर्गात मिळतात
उत्तर नाही. हे मानवनिर्मित पदार्थ आहेत.
(३) नैसर्गिकरित्या कोणकोणत्या पदार्थापासून धागे मिळतात.
उत्तर - कापसाच्या झाडापासून कापूस, आंबाडीच्या झाडापासून ताग, शेळ्यांपासून लोकर व रेशीम कीटकांपासून रेशीम हे धागे नैसर्गिकरित्या मिळतात.
(४) वस्त्रे कशापासून निर्माण केली जातात ?
उत्तर वस्त्रे धाग्यांपासून निर्माण केली जातात.
(५) चामडे, लोकर व ताग, कापूस या पदार्थात काय फरक आहे ? (पा.पु.पृ.क्र. ४३) उत्तर- चामडे, लोकर हे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात. तर ताग, कापूस हे पदार्थ वनस्पतींपासून मिळतात, त्यांना वनस्पतीजन्य पदार्थ म्हणतात.
शोध
(१) कागद तयार करण्याचा शोध कुठे लागला आहे ?
उत्तर चीनमध्ये सातव्या शतकात कागद तयार करण्याचा शोध लागला आहे.
(२) आपल्या पाठ्यपुस्तकाचा कागद कोणत्या प्रकारचा आहे व त्याचा आकार काय आहे ?
उत्तर - पाठ्यपुस्तकाचा कागद ६० ते ७० जी.एस.एमच्या दरम्यान क्रिमव्होव्ह प्रकारचा असून त्याचा आकार A आहे.
(३) चलनी नोटांचा कागद कसा तयार केलेला असतो ?
उत्तर - कापसाचा लगदा, लायनन व ८०-९० ग्रॅम स्टॉर्च पेपर यांच्या मिश्रणापासून चलनी नोटांचा कागद तयार होतो, म्हणून ते कडक राहतात
प्रश्न १ योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(अ) व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर (आ) नैसर्गिक पदार्थावर पदार्थ आहे.
करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात. हा कृत्रिम धागा तयार झाला. (इ) न्यूयॉर्क व लंडन येथेबालविद्या परीक्षेची गुरुकिल्ली (भाग-२)
(ई) रेयॉनला नावाने ओळखले जाते.
उत्तरे (अ) कृत्रिम, (आ) प्रक्रिया, (३) नायलॉन, (ई) कृत्रिम रेशीम.
प्रश्न २ उत्तरे लिहा.
(अ) मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली ?
उत्तर- मानवाने काही नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले. नंतर असे आढळले की हे पदार्थ वापरायला अधिक सोईचे किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळणारे होते म्हणून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला.
(आ) निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात ?
उत्तर- कापूस, कागद, रबर, ताग, इत्यादी वस्तू वनस्पतीजन्य आहेत तर चामडे, लोकर, रेशीम इत्यादी वस्तू प्राणीजन्य आहेत.
(इ) व्हल्कनायझेशन म्हणजे काय ?
उत्तर - व्हल्कनायझेशनच्या प्रक्रियेमुळे नैसर्गिक रबरापासून कृत्रिम रबर बनविल्या जातो. व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये रबर गंधकाबरोबर तीन-चार तास तापवले जाते. त्यामुळे गंधकाचे प्रमाण कमी-अधिक करून रबराला गरजेनुसार कठीणपणा आणल्या जातो.
(ई) नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात ?
उत्तर कापूस, रेशम, जूट.
प्रश्न ३ आमचे उपयोग काय आहेत ?
(अ) माती
उत्तर - झाडे लावण्यासाठी, मातीची घरे बांधण्यासाठी, मुर्त्या, खेळणे, मातीची भांडी तयार करण्यासाठी मातीचा उपयोग होतो.
(आ) लाकूड
घर बांधकामात, फर्निचर बनविण्यासाठी, कागद
उत्तर द्या
बनविण्यासाठी.
(e) नायलॉन
उत्तर- वस्त्रनिर्मित, मासेमारीची जाळी आणि दोरखंड इत्यादी तयार करण्यासाठी.
(ई) कागद
उत्तर - वर्तमानपत्रे, वह्या-पुस्तके, नोटा, तिकीटे, कॅलेंडर, कागदी पॅकेट इ. अनेक वस्तूंसाठी कागदाचा उपयोग होतो.
(3) रबर
उत्तर खोडरबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी, हातमोजे, टायर, रबर बैंड इ. अनेक वस्तू तयार करण्यासाठी रबराचा उपयोग होतो.
प्रश्न ४ कागदनिर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर - कागद बनविण्यासाठी पाइनसारख्या सूचिपर्णी वृक्षांचा उपयोग करतात. या वृक्षांच्या लाकडाच्या ओंडक्याची साल काढून त्यांचे बारीक तुकडे करतात. हे तुकडे आणि४६
विशिष्ट रसायने एकत्रित बराच काळ भिजत ठेवतात. त्यामुळे त्यांचा लगदा तयार होतो. रासायनिक क्रियेमुळे लगदद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात. त्यामध्ये रंगद्रव्ये मिसळून रोलर्समध्ये टाकतात तो लगदा लाटून पुढे येतो व कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात गुंडाळला जातो.
प्रश्न ५ - कारणे लिहा.
(अ) उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत.
कारण सुती कापडे आपल्या शरीराचा घाम शोषून घेतात व आपल्या शरीराला थंड ठेवतात म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत.
(आ) पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी.
कारण - कोणत्याही वस्तू नैसर्गिक पदार्थांचा उपयोग करूनच तयार होतात. नैसर्गिक पदार्थांचे साठे मर्यादित आहेत तसेच ते तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. म्हणून आपण या पदार्थांचा वापर काटकसरीने केला तर ते दीर्घकाळ आपल्याला कामात येतील.
(इ) कागद वाचवणे काळाची गरज आहे.
कारण - कागद हा झाडापासून तयार होतात. एक झाड तयार होण्यासाठी १०- १५ वर्षांचा काळ लागतो. दिवसेंदिवस कागदाचा उपयोग वाढतच आहे. भविष्यामध्ये कागद मिळत राहावा म्हणून कागद वाचवणे गरजेचे आहे.
(ई) मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे.
कारण - मानवनिर्मित पदार्थ वापरायला अधिक सोईचे किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, म्हणून त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. काही मानवनिर्मित पदार्थ
(3) कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे.
जलरोधी, वजनाने हलके आणि वाहतुकीसाठी सोईचे असल्यामुळे त्यांची जास्त मागणी आहे.
कारण (परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वांत वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होते.)
मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर तो थर तयार होतो. त्याला कुथित मृदा (ह्युमस) म्हणतात. ही मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. आतील पाणी धरून ठेवण्याचे काम ही कुथित मृदा करते.
प्रश्न ६ कसे मिळवतात याची माहिती मिळवा.
(१) लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात ?
उत्तर लाख हा पदार्थ 'लेसीफर लॅका' नावाच्या कीटकापासून मिळतो. हजारो कीटक पळस, कुसुम अशा झाडांच्या फांदीवर राहून एक रसायनाचा स्त्राव करतात त्यापासून लाख तयार होतो. उद्योगाकरिता लाख किडे पाळतात.
भारत व बांग्लादेश हे देश प्रामुख्याने लाख उत्पादन करतात.
(२) मोती हे रत्न कसे मिळतात ?
उत्तर मोती हे नैसर्गिकरित्या तसेच कृत्रिमरित्या तयार होतात. मोती हे रत्न
कृत्रिमरित्या 'ऑयस्टर' या कीटकापासून मिळविता येते. तर नैसर्गिक मोती हा समुद्राच्या पाण्यात शिंपल्यामध्ये तयार होतो.
◇ तोंडी प्रश्न
(१) मोटार गाड्यांचे विविध भाग कशापासून तयार करतात ?
(२) प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात ?
(३) वस्तू कशाच्या बनतात ?
(४) प्लॅस्टिक नैसर्गिक आहे की कृत्रिम ?
(५) 'व्हल्कनायझेशन' प्रक्रियेचा शोध कोणी लावला ?
उत्तर - (१) लोखंडापासून (२) प्राणिजन्य पदार्थ (३) वस्तू पदार्थांच्या बनतात.
(४) कृत्रिम (५) 'चार्लस् गुडईअर'.
विभाग (ब)
संकलित मूल्यमापन
प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(प्रत्येकी १ गुण)
(१) पदार्थ चे बनलेले असतात.
(२) टणक टायर्समुळे दळणवळण क्रांती झाली
(३) नैसर्गिक रबर
या झाडाच्या चिकापासून मिळतात.
(४) रबराला टणक बनविण्यासाठी मिसळतात.
५) ( धागे लवकर पेट घेणारे असतात.
उत्तर - (१) सूक्ष्मकणांचे (२) रबराच्या (३) लटेक्स (४) गंधक (५) कृत्रिम. (प्रत्येकी १ गुण) प्रश्न
२ - सांगा मी कोणाशी जोडी लावू ?
'अ' गट
'ब' गट
(१) साहित्य लेखन
(अ) अॅल्युमिनिअम
(२) वीजवाहक तारा
(आ) लोखंड
(३) कृत्रिम धागे
(इ) कागद
(४) विजेचे खांब
(e) रेयॉन
उत्तर – (१) ३, (२) अ, (
3) - ई, (4) आ.
प्रश्न ३ - नावे लिहा.
(२) कृत्रिम धागे –
नायलॉन, रेयॉन
(३) साहित्य लेखन
दगडी पाट्या, कागद
प्रश्न ४ - खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.
(१) रबर बँड्समध्ये जास्त गंधक मिसळतात.
(२) रेयॉनचे धागे सूर्यकिरणांसारखे चमकदार असतात.
(३) आजकाल बऱ्याच वस्तू कृत्रिम धाग्यांपासून बनतात.
(४) कागद वाचविणे गरजेचे नाही.
(५) जेथे शक्य असेल तेथे पाटी-पेन्सिल वापरावी.
उत्तर - (१) चूक (२) बरोबर (३) बरोबर (४) चूक (५) बरोबर.
प्रश्न ५ - खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
(प्रत्येकी २ गुण)
(१) दिवसेंदिवस मानवनिर्मित पदार्थांचा उपयोग वाढतच आहे ? स्पष्ट करा.
उत्तर - (i) मानवनिर्मित पदार्थ जलरोधी, वजनाने हलके आणि वाहतुकीच्या सोईचे असतात. (ii) शिवाय ते कमी खर्चात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणून दिवसेंदिवस मानवनिर्मित पदार्थांचा उपयोग वाढतच आहे.
(२) अपरिवर्तनीय बदल म्हणजे काय ? उदाहरण दया.
उत्तर - (i) काही पदार्थांच्या गुणधर्मात झालेले बदल हे कायमस्वरूपी असतात. (ii) म्हणजेच नवीन पदार्थापासून मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाहीत. (iii) अशा बदलास अपरिवर्तनीय बदल म्हणतात. उदा. - हिरव्या मिरच्या किंवा टोमॅटो 'लाल' झाल्यावर पुन्हा 'हिरवे' होत नाही हा बदल अपरिवर्तनीय आहे.
(३) कृत्रिम धाग्यांचे ३ दोष सांगा.
उत्तर - (i) जलरोधी असल्यामुळे शरीराचा घाम शोषला जात नाही. (ii) हे धागे लवकर पेट घेणारे असतात. (iii) या धाग्यांचे सूक्ष्मजीवाद्वारे विघटन होत नाही.
0 Comments