* हा कोणता किल्ला नाही तर शाळा खोली नांदुरा पंचायत समिती बुलढाणा जिल्हा अंतर्गत शाळेतील एक अळगळी ची खोली आणि बदलेलेले आजचे रूप*
शाळेतील बऱ्याच वर्षा पासून बंद असलेली खोली ,ज्या खोलीत शाळेतील इतर सामान भरल्या जात होते.भिंतीचे प्लॅस्टर,रंग पूर्ण खराब झालेली एक खोली जी प म उ प्रा शाळा अंबोडा येथे अस्तित्वात होती.परंतु याच खोलीत वर्ग मिळाल्याने स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केली.खालील फरश्या सहकारी शिक्षकांच्या साहाय्याने दुरुस्त केल्या.याच खोलीला जिवंत रूप द्यावे ही प्रबळ इच्छाशक्ती मनात होतीच.आणि मग कार्यास सुरुवात केली.आतील रंगरंगोटी केली.सुविचार लिहिले.फलक लिहिले.बाहेरील रूप देखणे पाहिजे,आणि काहीतरी वेगळे पाहिजे म्हणून एक नव्या उमेदीने रंग कामास सुरुवात केली .विदर्भातील सर्वांत सुंदर आणि देखणा किल्ला गाविलगड चे स्वरूप वर्गाचे बाह्य भागास दिले.आज रंग काम पूर्ण होताच सर्वांना ते चित्र विलक्षण भावले..त्या भिंतीजवळ फोटो,सेल्फी काढण्यास सहकारी शिक्षक,विद्यार्थी गावातील तरुण मंडळी गोळा झाली आणि एका छोट्या कृती ला विलक्षण प्रतिसाद मिळाला..
जी प म ऊ प्रा शाळा आम्बोडा पंचायत समिती नांदुरा डॉक्टर पदवी घेतलेले
शिक्षक किशोर वानखडे यांच्या कल्पनेतून साकारले किल्ल्याचे रूप
*विकासाची इच्छा असल्यास काहीही करता येते 🚩🚩🚩🚩🚩
0 Comments