*उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल ,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन खामगाव नगरीत जल्लोषात साजरे*
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरी ए. के. नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज महावीर भवन खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी नुकतेच 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या साहित्यिक रसिकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले.
या संमेलनाचा ग्रंथ दिंडीने प्रारंभ झाला वेगवेगळे पाच धार्मिक ग्रंथ होते या प्रसंगी संमेलनाच्या निमंत्रक डॉ. प्रवीना शहा व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व त्यांची पत्नी खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर ग्रंथ दिंडीचे पूजन केले त्यानंतर ए.के. नॅशनल हायस्कूल पासून ग्रंथ दिंडीचे सुरुवात झाली व अग्रसेन चौकामध्ये या संमेलनाचे कार्याध्यक्ष उद्योजक विनोद यांच्या तर्फे सर्वांना शरबत पाणी व नाश्त्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी सर्व साहित्यिक रसिकांनी फुगडीचा सुद्धा मनसोक्त आनंद घेतला महावीर भवन या ठिकाणी या ग्रंथ दिंडीची सांगता झाली याप्रसंगी या संमेलनाचे उद्घाटन चिखली मेहकर येथील उद्योजक, समाजसेवक अशोक अग्रवाल यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष लताताई गुठे ,मुंबई संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य डॉ. प्रविणा शहा स्वागताध्यक्ष खामगाव येथील समाजसेवक किशोर गरड संमेलनाचे संयोजक डॉ. प्रवीण क्षीरसागर संमेलनाचे कार्यध्यक्ष खामगाव येथील उद्योजक विनोद डीडवानिया संमेलनाचे सह कार्याध्यक्ष डॉ. दीपक पाचपोर सह निमंत्रक डॉ. किशोर वानखडे महिला आर्थिक महामंडळाच्या माजी अध्यक्ष तथा कोकण साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष सौ.ज्योतीताई ठाकरे, मुंबई यांची सुद्धा विशेष उपस्थिती लक्षणीय ठरली तसेच उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष डॉ. सतीश तराळ उपाध्यक्ष प्रसिद्ध लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले राज्य संपर्कप्रमुख डॉ.श्रीकांत पाटील राज्य समन्वयक डॉ. राजकुमार कांकरिया राज्य प्रसिद्ध प्रमुख ह. भ. प. शंकर महाराज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे,कल्याण, पुणे, नाशिक ,धाराशिव संभाजीनगर, अमरावती, अकोला,जळगाव, धुळे, नाशिक, अमरावती, आदी विविध जिल्ह्यातील साहित्यिक, पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष डॉ . शिवचरण उज्जैनकर यांनी केले. प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल व गुलाब बुके मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला या उद्घाटन सत्राचे सुरेल सूत्रसंचालन फाउंडेशनचे राज्य समन्वयक प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया, पुणे आणि फाउंडेशनचे जळगाव जिल्हा महील संपर्कप्रमुख श्रीमती ज्योतीताई राणे यांनी केले याप्रसंगी सर्वच मान्यवरांचे समायोजित भाषण झालीत प्रसंगी उपस्थितांनी या भाषणांना मनापासून टाळ्या वाजवून दाद दिली दुपारच्या सत्रामध्ये भोजन झाल्यानंतर सय्यद अहमद कथाकथन व्यासपीठावर खामगाव येथील जेष्ठ कलाकार रामदादा मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन उत्कृष्ट रंगले यामध्ये निमंत्रक प्राचार्य डॉ. प्रविना शहा जळगाव येथील मधुकर पोतदार व स्थानिक ए.के. नॅशनल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला याप्रसंगी महावीर भवनमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने साहित्यिकांसह उपस्थित होते तर दुपारच्या सत्रामध्ये देशोन्नती बुलढाणा जिल्हा आवृत्तीचे संपादक राजेश राजोरे यांच्या अध्यक्षतेखाली सदानंद शिनगारे परिसंवाद व्यासपीठ खूपच चांगले रंगले विषय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य वास्तव आणि अपेक्षा या विषयावर जळगाव जामोद येथील प्राचार्य राम देशमुख मुंबई येथील ज्योतीताई ठाकरे वर्धा येथील डॉ.मनीषा रिठे अकोला येथील डॉ. अशोक शिरसाट हिवरा आश्रम येथील प्रा.डॉ.ज्ञानेश्वर गाडे बुलढाणा येथील सुरेश साबळे आदी मान्यवरांनी या विषयावर चांगलीच रंगत आणली या परिसरातील सूत्रसंचालन फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा सहसचिव शिवप्रसाद थुत्ट्टे यांनी केले तर आभार फाउंडेशनचे कार्यकारणी सदस्य मुक्ताईनगर येथील पत्रकार विनायक वाडेकर यांनी केले याप्रसंगी सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ए.के.नॅशनल हायस्कूल व ज्यु.कॉलेजचे विद्यार्थिनींनी कविवर्य ना.धो.महानोर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या मराठी गीतांचे नृत्य आयोजित आले प्रसंगी सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले.
त्यानंतर आठ वाजता पुणे येथील कवी बाळकृष्ण अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली रात्री बारा वाजेपर्यंत दर्जेदार कवी संमेलन ए . के.नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात चांगलेच रंगले याप्रसंगी एकुण 56 कवींनी सहभाग नोंदवला या कवी संमेलनाचे सुरेल सूत्रसंचालन खामगाव येथील अरविंद शिंगाडे सर यांनी केले तर शेवटी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी आभार व्यक्त केले खामगावात नगरीतील बुलढाणा जिल्ह्यातील तसेच विविध जिल्ह्यातील कवी व रशीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments