Subscribe Us

दुसरे राज्यस्तरीय बाल किशोर युवा साहित्य संमेलन.. खामगांव

*उज्जैनकर फाउंडेशनचे तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार नुकतेच राज्यस्तरीय साहित्य संमेलन खामगाव येथे प्रदान* शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे 27 ऑगस्ट 2023 रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरी ए.के. नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज महावीर भवन खामगाव जिल्हा बुलढाणा येथे आयोजित दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन नुकतेच भव्य व दिव्य स्वरूपात संपन्न झाले या प्रसंगी फाउंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कारार्थींना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष मुंबई येथील सौ.लता गुठे संमेलनाच्या निमंत्रक प्राचार्य डॉ.प्रवीना शहा संमेलनाचे स्वागताध्यक्ष किशोरभाऊ गरड संयोजक डॉ. प्रवीण क्षीरसागर संमेलचे कार्याध्यक्ष विनोदभाऊ डीडवाणीया या संमेलनाचे सहकार्यध्यक्ष डॉ. दीपक पाचपोर सह निमंत्रक डॉ.किशोर वानखडे सहसंयोजक डॉ. निवृत्तीभाऊ जाधव व शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या संमेलानाचे मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैन कर व साहित्यिक, रशिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत. आदिशक्ती संत मुक्ताई अध्यात्म सेवा पुरस्कार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर जि. जालना व ह. भ. प. स्वातीताई खोपकर पुणे, तापी पूर्णा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार ख्यातनाम लेखक श्री डी.बी.जगतपुरीया छत्रपती संभाजीनगर व अकोला येथील प्राचार्य डॉ. लताताई थोरात यांना प्रदान करण्यात आला तर तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट कला पुरस्कार बुलढाणा येथील लोककलाकार डी. चंद्रकांत लोकशाहीर प्रमोद दांडगे यांना आणि तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्था जळगाव, मुक्ताईनगर येथील स्री रोग तज्ञ डॉ. योगेश पाटील, खामगाव येथील श्रीराम खेलदार ,न्हावी ता. यावल येथील सौ.अश्विनी योगेश कोळी शेगाव येथील सौ.नंदिनीताई वैराळ चिखली मेहकर येथील संजीव यंगड अमरावती येथील प्रा. आनंद महाजन शिंदखेडा राजा येथील कृष्णकांत जोशी यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक प्रहार मुंबई येथील विभागीय वरिष्ठ अधिकारी किशोर उज्जैनकर, वृत्त संपादक दैनिक मातृभूमी, अकोलाचे रूबेन वाळके यांना प्रदान करण्यात आला. तसेच फाउंडेशनचे तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार खामगाव येथील बाल साहित्यिक प्रा. देवबा शिवाजी पाटील यांच्या आकाश गंगा या बाल विज्ञान कविता संग्रहास, साखरखेर्डा जिल्हा बुलढाणा येथील कवी रामदास कोरडे यांच्या बंध रेशमाचे या काव्यसंग्रहास, कोल्हापूर येथील परशराम आंबी यांच्या भाकर चोर या कथा संग्रहास, बोदवड जिल्हा जळगाव येथील चि. श्रीमद प्रशांत बडगुजर यांच्या कळसुबाई शिखर एक रोमांचक अनुभव या पुस्तकास, तसेच हिवरा आश्रम येथील शिव प्रसाद थुट्टे यांच्या गझल एक आस्वाद नजर, कोल्हापूर येथील अशोक कोकाटे यांच्या भुईपाश या कादंबरीस तर जळगाव येथील किशोर नेवे यांच्या दिव्य ज्योत या काव्यसंग्रहास तर पुणे येथील रामचंद्र गुरव यांच्या दिशाहीन या काव्यसंग्रहास धाराशिव येथील सरोज कुलकर्णी यांच्या आराधना काव्यसंग्रहास आणि शिरपूर जिल्हा धुळे येथील यशवंत निकवाडे यांच्या जगण्याची संजीवनी तर बुलढाणा येथील डॉ. मंजुश्री खोब्रागडे यांच्या हळवी सह या ललित संग्रहास उज्जैनकर फाउंडेशनचे तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नुकतेच संमेलनात मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व गुलाब बुके देऊन राज्यातील 27 पुरस्कारार्थींना तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्काराने गौरवण्यात आले. सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खामगांव, बुलढाणा, मुंबई, कल्याण, बदलापूर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, , जळगाव, अकोला, अमरावती आदि जिल्ह्यातील फाऊंडेशनचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments