बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात 'भिडे वाडा' प्रतिकृती प्रदर्शनाने उजळली सावित्रीची स्मृती, छगन भुजबळ यांची 'समता यात्रा' शहरातून मार्गस्थ*
* सामाजिक प्रबोधनाचा संगम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
,. बुलढाणा, दि. २६ मे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या 'भिडे वाडा' या ऐतिहासिक वास्तूच्या प्रतिकृतीचे दर्शन आणि ज्येष्ठ नेते मा. छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतील 'समता यात्रा'चे आगमन अशा दुहेरी प्रबोधन पर्वाने आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर न्हाऊन निघाले. सामाजिक समतेचा व स्त्री शिक्षणाचा जागर करणारा हा कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.
*भिडे वाडा प्रतिकृतीतून सावित्रीच्या कार्याला उजाळा*
पुण्यातील मूळ भिडे वाड्यात 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या ऐतिहासिक क्षणाची व वास्तूची आठवण करून देणाऱ्या 'भिडे वाडा' प्रतिकृतीचे प्रदर्शन आज खामगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रतिकृतीसोबतच सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणा व फुले दाम्पत्याच्या योगदानावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला खामगाव चा नगराध्यक्ष सौ.अपर्णा सागर फुंडकर , माळी महासंघाचे अध्यक्ष धोंडीराम खंडारे, सामाजिक कार्यकर्ते गजानन राऊत, प्राध्यापक डॉ.किशोर वानखेडे, सुषमा ताई वानखेडे, ज्येष्ठ संपादक योगेश हजारे, उल्हास वानखेडे यांच्यासह शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून सावित्रीच्या कार्याला अभिवादन केले.
*'समता यात्रा'चे जल्लोषात स्वागत*
दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी निघालेली "समता यात्रा" आज खामगाव शहरात दाखल झाली. ढोल-ताशांच्या गजरात व घोषणांनी शहर दणाणून गेले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसारख्या महापुरुषांच्या विचारांचा जागर या यात्रेद्वारे करण्यात आला. प्रमुख मार्गांवरून फिरून नागरिकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर ही यात्रा पुढील नियोजित मार्गाकडे मार्गस्थ झाली.
*शांततेत सांगता, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद*
पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. 'भिडे वाडा' प्रतिकृती पाहण्यासाठी व 'समता यात्रा'च्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. फुले-आंबेडकरी चळवळीला बळ देणारा व नवीन पिढीला प्रेरणा देणारा हा दिवस ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त क
* "खामगावात फुले विचारांचा जागर; 'भिडे वाडा' प्रदर्शन व 'समता यात्रा'ने वेधले लक्ष"
खामगाव येथे 'भिडे वाडा' प्रतिकृतीचे उद्घाटन करताना मान्यवर व 'समता यात्रा'चे शहरात आगमन झाले तेव्हाचे दृश्य"

0 Comments