Subscribe Us

सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण



 (१) तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती व प्राणी एकसारखे आहेत का ?

उत्तर - नाही. काही वनस्पती तसेच प्राण्यांमध्ये काही समानता असतात. परंतु त्या बर वैशिष्ट्ये वेगवेगळी असू शकतात.

(२) आंबा, वड व चिंच यामध्ये काय साम्य आहे 

उत्तर - आंबा, वड व चिंच ही तिन्ही वृक्ष या गटात मोडतात. त्यांची खोडे ट मजबूत असतात व ती उंच वाढतात. हे वृक्ष आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असत

(३) जास्वंद, कन्हेर व घाणेरी यांमध्ये काय साम्य आहे ? (पा.पु.पृ.क्र.

उत्तर - जास्वंद, कन्हेर व घाणेरी आकाराने वृक्षांपेक्षा लहान असते यांचे खोड टणक असते. जमिनीलगतच यांना अनेक फांदया फुटतात. ही झुडूपे दोन व तीन मीटर च वाढतात.

थोडे आठवा.

(१) सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणांमध्ये दिसून येते ?

उत्तर - शिलावरण, जलावरण व वातावरण या पृथ्वीच्या आवरणांमध्ये सजीवांचे अस्तित्व दिसून येते.

सांगा पाहू.

(१) भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्षे असे वेल तुम्ही पाहिले आहेत का ? ते कशाच्या आधारे वाढतात ?

उत्तर - होय. काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात, तर काही वेली जमिनीवर पसरतात. आधाराच्या साहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते.

(४) मेथी, सदाफुली यामध्ये काय साम्य आहे ?

उत्तर - रोपटी सुमारे १ ते १.५ मीटर पर्यंत उंच वाढतात. यांचे खोडे वृक्ष व झुडूपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात. हे काही महीने ते दोन वर्ष जगतात.

(५) शेतामधील बाजरी, गहू, मका, मुळा झेंडू ही पिके किती वर्षे जगतात ?

उत्तर - ही सर्व वार्षिक पिके आहेत त्यामुळे ती फक्त १ वर्षापर्यंतच जगतात.

(६) वनस्पतींच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षिले जातात 

उत्तर वनस्पतींच्या फुलांकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षिले जातात.

(७) साप, सरडा, वाघ, मासा, गरुड, कोंबडी, खेकडा, माशी, गांडूळ, मगर, टोळ या प्राण्यांच्या शरीरचनेत काय फरक आहे ?

उत्तर - साप, सरडा, वाघ, मासा, मगर, गरुड, कोंबडी ह्यांना पाठीचा कणा असतो तर खेकडा, माशी, गांडूळ, टोळ ह्यांना पाठीचा कणा नसतो.

८) आपल्या पाठीच्या मध्यावरून जी हाडांची माळ जाते तिला काय म्हणतात ?

असेच्या मध्यावरून जी हाडांची माळ जाते तिला पाठीचा कणा म्हणतात.

(९) अंडी घालणारे, पिलांना जन्म देणारे प्राणी कोणकोणते आहेत ?

उत्तर - कोंबडी, बदक, चिमणी, इ. पक्षी साप, मासा, बेडूक, पाली, मगर इत्यादी

प्राणी अंडी घालतात.

मनुष्य, कुत्रा, मांजर, व्हेल मासा, वाघ, हरीण असे अनेक प्राणी पिलांना जन्म देतात.

(१०) घोडा, अस्वल, कासव, सुसर, मासा, हरीण, बेडूक हे प्राणी कोठे आढळतात ?

उत्तर - घोडा, अस्वल, हरीण हे प्राणी जमिनीवर आढळतात. तर मासा फक्त पाण्यात व कासव, सुसर, बेडूक पाणी तसेच जमिनीवर राहतात.

(१) जलपर्णी पाण्यावर का तरंगते ?

उत्तर जलपर्णी वनस्पतीमध्ये हवेच्या पिशव्या बनलेल्या असल्यामुळे ती पाण्यावर तरंगते.

(२) निवडुंगाचे खोड मांसल का असते ?

खोडात

उत्तर - निवडुंग मुख्यतः कमी पाण्याच्या प्रदेशात आढळते. त्यामुळे त्याच्या पाणी साठवून ठेवण्याची नैसर्गिक क्षमता असते प्रकाश संश्लेषणाचे काम चपटे व मांसल झालेले खोड करतात. म्हणून निवडुंगाचे खोड मांसल असते.

(३) वनस्पतींचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते?

उत्तर - वनस्पतींचे वर्गीकरण पुढील निकषांचा आधारे केल्या जातो

(i) वनस्पतींच्या खोडांचा आकार व उंची

(ii) वनस्पतींचा जीवनक्रम कालावधी

(iii) फुले येणे व न येणे जरा डोके चालवा.

(iv) वनस्पतींच्या अन्न मिळविण्याच्या पद्धतीवरून,

(१) भूछत्र, अळंबी ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे ?

उत्तर- भूछत्र, अळंबी ह्या अपुष्प वनस्पती आहे.

(२) उंबर ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे ?

उत्तर - सपुष्प, स्वयंपोषी, वृक्ष

(३) नेचे, शेवाळ, मनिप्लांट या वनस्पतींना फुले असतात का ?

उत्तर- नाही; या अपुष्प वनस्पती आहेत.

(४) प्राण्यांचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते ?

उत्तर प्राण्याची शरीरचना, आकार, हालचाल, अधिवास, अन्न मिळविण्याच्या व अन्नग्रहण करण्याच्या, पद्धती या निकषाच्या आधारे त्यांचे वर्गीकरण केले जाते.

सांगा पाहू.

(५) डाळिंबाचे झुडुप कोठे वाढते ?

उत्तर जमिनीवर

(६) कमळ कोठे वाढते ?

उत्तर पाण्यात

(७) पानकणीस, गारवेल कोठे वाढतात ?

उत्तर - दलदली भागात

(८) अमरवेल ही वनस्पती कोठे वाढते ?

उत्तर अमरवेल ही वनस्पती अन्य वनस्पतींचा आधाराने वाढते.



Post a Comment

0 Comments