Subscribe Us

उज्जैन कर फाऊंडेशन चे राज्य आणि जिल्हा कार्यकारणी चा विस्तार


 *उज्जैनकर फाउंडेशनच्या बुलढाणा जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र प्रदान करून केले सन्मानित*


शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि.जळगावच्या बुलढाणा जिल्हा शाखेला दोन वर्षे पूर्ण झालेत त्यानिमित्त ही कार्यकारणी पूर्वी 21 पदाधिकाऱ्यांची होती त्यामध्ये नुकत्याच झूम मीटिंग द्वारे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी 10  नवीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित केले त्यात राज्य कार्यकारिणी मध्ये चार नवीन पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले  त्यानिमित्त नुकतेच खामगाव येथे ए.के. नॅशनल हायस्कूलमध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी राज्य कार्यकारणीचे नूतन उपाध्यक्ष येथील उद्योगपती श्री विनोदभाऊ डिडडवाणीया राज्य मार्गदर्शक प्राचार्य डॉ. प्रवीना शहा राज्य खजिनदार डॉ. किशोर वानखडे त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष श्री शंकरराव अनासुने खजिनदार डॉ.प्रवीण क्षीरसागर प्रसिध्दी प्रमुख श्री विजय बुडूखले त्याचप्रमाणे संघटक श्री प्रवीण जमधाडे जिल्हा सदस्य श्री बाळूभाऊ इटणारे श्री संतोषभाऊ उंबरकर यांना निवड पत्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतर चिखली मेहकर येथे अग्रसेन रिसॉर्ट मध्ये खामगाव येथील संमेलनाचे उद्घाटक उद्योगपती श्री अशोक अग्रवाल यांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले याप्रसंगी श्री अशोक अग्रवाल यांनी डॉ. उज्जैनकर सर यांचा गुलाब बुके देऊन त्यांच्या सत्कारही केला त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा कार्यकारणीतील नूतन उपाध्यक्ष श्री दिनकर झनक सहसचिव श्री प्रदीप मोरे यांना याप्रसंगी डॉ.उज्जैनकर यांनी निवड पत्र देऊन गौरविण्यात आले  त्याचप्रमाणे खामगाव येथे संमेलनातील तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवेचा पुरस्कार चिखली येथील समाजसेवक राजीव यंगड सर यांना श्री अशोक अग्रवाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले प्रसंगी डॉ. शिवचरण उज्जैनकर व सर्व पदाधिकाऱ्यांनी श्री अग्रवाल यांच्या गोशाळेला त्याप्रमाणे बायोगॅस प्लांट व जिनिंग फॅक्टरी ला भेट देऊन श्री अशोक अग्रवाल यांचे मनापासून अभिनंदन केले श्री अशोक अग्रवाल यांनी सर्वांनाच रिसॉर्टमध्ये स्नेहभोजनही दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शाहीर मनोज पवार यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष श्री दिनकरराव झनक सर यांनी आभार मानले. त्यानंतर हिवरा आश्रम येथे फाउंडेशनचे  जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य खजिनदार पदी कवी रामदास कोरडे तसेच बुलढाणा जिल्हा सचिव श्री शिवप्रसाद थुटे बुलढाणा जिल्हा सदस्य शाहीर ईश्वर मगर बुलढाणा जिल्हा खजिनदार श्री मनोहर काळे आदींना निवड पत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा संत शुकदास महाराज यांचे बोधपर पुस्तक सप्रेम भेट देऊन सत्कार केला याप्रसंगी बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री पांडुरंग दैवज्ञ साहेब जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहरराव पवार जिल्हा संघटक  डॉ. निवृत्तीभाऊ जाधव त्यांचे वडील श्री विठ्ठलराव जाधव जिल्हा सदस्य श्री बाळूभाऊ इटणारे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर परतीच्या प्रवासात जिल्हा सदस्य खामगाव येथील श्री बाळूभाऊ इटनारे यांच्या निवासस्थानी राज्य उपाध्यक्ष श्री विनोदभाऊ डीडवानिया यांनी जिल्हा सदस्य पदी निवड झालेले श्री संतोषभाऊ उंबरकर यांना निवड पत्र प्रदान केले याप्रसंगी डॉ. शिवचरण उज्जैनकर श्री पांडुरंग दैवद्य साहेब श्री शंकर अनासुने सर श्री अमीर चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments