Subscribe Us

डॉ संतोष बनसोड, डॉ किशोर वानखेडे लिखित वऱ्हाड चा स्वातंत्र्य लढा ग्रंथाचा प्रकाशन सोहळा,आणि मान्यवरांचा अभिप्राय

 *वऱ्हाडचा स्वातंत्र्यलढा या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न  :-             भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत वऱ्हाडचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. या वऱ्हाडने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला गतिमान केलेले आहे. या वऱ्हाड मध्ये एकूण पाच जिल्हे आहेत. अमरावती ,अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा .या पाचही जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याची चळवळ अग्रेसित राहिली. या स्वातंत्र्य चळवळीवर संशोधन करून प्रा. डॉ. संतोष बनसोड व डॉ. किशोर वानखडे   यांनी हा लढा दोन खंडांमध्ये लिहिलेला आहे. या दोन्ही खंडाचे प्रकाशन अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा तथा आमदार रविभाऊ राणा यांच्या हस्ते आज अमरावती रेल्वे स्टेशन वरील भव्य दिव्य कार्यक्रमात संपन्न झाले. यावेळी इतिहासकार प्रा. डॉ. संतोष बनसोड यांनी या ग्रंथावर  भाष्य केले. ग्रंथातील घटकावर प्रकाश टाकला. ग्रंथाचे महत्त्व पटवून दिले. स्वातंत्र्याच्या चळवळीवर विवेचन केले. या कार्यक्रमाला दोन ते तीन हजारापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता*.       

*जिद्द, काम करण्याची कुवत  आणि स्वतःचा आत्मविश्वास या तीन गोष्टींमध्येच दडलेल आहे आपल्या यशाचं खर शिखर.........!!!* 


 *कोणती ही गोष्ट साकारून तिला अंतिम टप्प्यात नेणं किंवा अंतिम स्वरूप प्रदान करणे हे खूप महत्त्वाचं असतं, असंच काही प्रा. डॉ. संतोष बनसोड सर यांनी उघळकीस आणून केलेल आहे. ते म्हणजे वऱ्हाड प्रांतामधील इतिहासाची रूपरेषाचे बारीक-सारीक अवलोकन करून त्याला प्रस्थापित समाज व्यवस्थेला उपलब्ध करून देणे* ....



 *सरजी तुमचे खूप खूप अभिनंदन............!!* 

🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹


 *विशेष म्हणजे या वऱ्हाड ग्रंथाबद्दल बोलायचे झाल्यास हा ग्रंथ दोन भागांमध्ये विभागलेला आहे. प्राचीन पासून तर आधुनिक पर्यंत याची* *रूपरेषा वराळ प्रांतामध्ये कशा स्वरूपाची होती याची मीमाश्या करणारा हा महत्त्वाचा ग्रंथ आहे.* 

 *आणि हा ग्रंथ वराळ प्रांतावरील सर्व घटनाक्रम आणि ऐतिहासिक दृष्ट्यातून महत्वपूर्ण उपलब्ध झालेला तत्कालीन गौरव ग्रंथ म्हणून सुद्धा याची विमासा करणे सुयोग्य होईल...* 


 *आजच्या तथाकथित समाज व्यवस्थेला आपल्या इतिहासाची जाणीव व्हावी आपल्या भू क्षेत्रामधील परस्पर इतिहासाची पार्श्वभूमी लक्षात यावी यासाठी हा ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो वऱ्हाड प्रांत म्हणजेच आजचा हा पश्चिम विदर्भ म्हणून ओळखल्या जातो. त्यामुळे या पश्चिम विदर्भाच्या इतिहासाला खतपाणी घालणारा हा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे* 


 *लेखकांनी हा ग्रंथ आपल्या कार्यकृतीतून अथक परिश्रमाने याला अंतिम स्वरूप प्रदान केले त्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन.....!!!* 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥


(टीप) ---: उत्तरोत्तर अधिकाधिक ग्रंथांची निर्मिती आपल्याकडून होत जावी

🙏🙏🙏🙏

Post a Comment

2 Comments