सामाजिक परिषदेत इतिहास संशोधक डॉ किशोर वानखेडे यांचा सत्कार.
राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित सामाजिक समता परिषद दिनांक.29 जून 2024 रोजी देशमुख वाडा येथे मा. देवेंद्र दादा देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली होती.याच वाड्यात 1917 साली राजश्री शाहू महाराज टीम दिवस मुक्कामास होते.या घटनेचे औचित्य साधत पुन्हा सामाजिक चळवळ सुरू व्हाव्यात आणि जनसेवा घडावी या हेतूने चर्चा सत्र आयोजित केले होते.येथूनच पूर्ण विदर्भात सामाजिक चळवळीची बीजे रोवली गेली.वऱ्हाड प्रांतातील सामाजिक ,शैक्षणिक,राजकीय ,
सत्यशोधक, दलीत,कामगार चळवळीवर संशोधन करीत असताना या भागातील अनेक समाज सुधारक यांचा इतिहास डॉ किशोर वानखेडे यांनी लेखणीतून पुढे आणला.त्यांनी राव बहादुर केशवराव देशमुख यांच्या कार्याची प्रेरणा घेत 1900 ते 1947 या काळात होऊन गेलेल्या विविध सत्यशोधकांचे कार्यावर 6 खंड प्रकाशित केले आहेत.या ग्रंथात वऱ्हाड प्रांतातील 72 शिलेदारांच्या कार्याची सविस्तर माहिती लेखन केली. खामगाव मधील राव बहादुर केशवराव देशमुख यांच्या पुढाकारातून अनेक समाजसेवक,सत्यशोधक उदयास आले. या शिलेदारांच्या कार्यावर लेखणीतून प्रकाश टाकला आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करणे आवश्यक आहे असे देवेंद्र दादा देशमुख यांनी कार्यक्रमात सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष होमिओपॅथिक कॉलेज खामगाव चे संस्थापक डॉ दादासाहेब कवीश्वर साहेब,डॉ गणी साहेब श्रीमंत शिवाजीराव देशमुख, डॉ राजेश जी मिरगे, राष्ट्रमाता जिजाऊ यांची भूमिका अभिनयातून सर्वांपर्यंत पोहोचविणाऱ्या सौ गौरी ताई थोरात ,कार्यक्रमाचे आयोजक देवेंद्र दादा देशमुख ,श्री धोंडीराम जी खंडारे शरद भाऊ वसतकर आणि उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. महाराजांचे पदस्पर्शाने पावन झाला आहे. याच जागेवर ही सामाजिक समता परिषद आयोजित करण्यात आली. देशमुख वाडा हा विदर्भातील सामाजिक चळवळी चा केंद्रबिंदू राहिला आहे. या परिषदेचे आयोजन यशस्वी श्रीमंत देवेंद्र दादा देशमुख यांनी पुढाकार घेत ही परिषद यशस्वी केली
0 Comments