Subscribe Us

सजीवां तील विविधता आणि वर्गीकरण



प्रश्न ४- सत्य की


असत्य ओळखा.

(अ) गोगलगाय हा जलचर प्राणी आहे.

(आ) उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात.

(इ) पृष्ठवंशीय प्राण्यात मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते.

ई) अमीबा हा बहुपेशीय प्राणी आहे.

उत्तर द्या

(a) खोटे

(एए) खोटे

(e) खरे

(इ) खोटे.

प्रश्न ५ - दोन नावे लिहा.

(अ) सपुष्प वनस्पती

(१) सदाफुली

(२) डाळिंब

(आ) अपुष्प वनस्पती

(१) बुरशी

(२) नेचा

(इ) झाड

(१) चिंच

(२) उंबर

(ई) झुडूप

(१) लिंबू

(२) कन्हेर

(१) मनीप्लांट

(२) काकडी

(ऊ) वार्षिक वनस्पती

(१) ज्वारी

(२) सूर्यफूल

(ए) द्विवार्षिक वनस्पती

(१) गाजर

(२) बीट

(१) आंबा

(२) गुलमोहर

(अ) बारमाही वनस्पती

प्रश्न ६ - खालील प्रश्नांची उत्तरे दया.

(अ) वनस्पतीचे अवयव कोणते ?

उत्तर मूळ, खोड, पाने, फुले व फळे हे सर्व वनस्पतीचे अवयव आहेत.

(आ) मुळांची कार्ये कोणती ?

उत्तर - (i) मुळे वनस्पतीतला मातीत घट्ट धरून ठेवते व आधार देते. (ii) जमिनीतील पाण्याचे व पोषकतत्वाचे शोषण करून ते वनस्पतीच्या सर्व अवयवांना देण्याचे कार्य मुळे करतात.

(इ) सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे ?

उत्तर - (i) पृथ्वीवर विविध प्रकारचे प्राणी व वनस्पती आढळून येतात. (ii) ज्यामध्ये

काही समानता आहेत तसेच विविधता आहेत. (iii) या सजीवांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास

करणे सोईचे व्हावे म्हणून त्यांचे वर्गीकरण करणे आवश्यक असते.

(ई) सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात ?

उत्तर - सजीवांचे वर्गीकरण करताना त्यांच्यामधील समानता भेद, विविधता हे निकष विचारात घेतले जातात.

(उ) वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा.

उत्तर - वेलींची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत (i) वेलींचे खोड हे अतिशय लवचिक, मऊ व हिरवे असते. (ii) काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात. तर काही जमिनीवर पसरतात.

(ऊ) रोपट्यांची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे दया.

उत्तर - रोपट्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत (ⅰ) रोपट्यांची उंची साधारण १ ते १.५ मीटरपर्यंत असते. (ii) रोपट्यांची खोडे मऊ आणि लवचिक असते

(ए) प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे कराल ?

उत्तर - प्राण्यांचे वर्गीकरण पुढील निकषांच्या आधारे करतात (i) पेशींच्या संख्येवरून पाठीचा कणा आहे किंवा नाही (ii) प्रजननाचा प्रकार (iii) अधिवास. वनस्पतींचे वर्गीकरण पुढील निकषांच्या आधारे करतात (i) अन्न मिळविण्याच्या प्रक्रिया (ii) खोडांची रचना (iii) वनस्पतींचा जीवनक्रम (iv) फुले येणे अथवा न येणे.

(ऐ) प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते ?

उत्तर (i) सामान्यतः प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण त्यांच्या त्वचेमुळे होते. - (ii) पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरावर संरक्षणासाठी खवले, केस, पिसे यांचे आणखी एक आच्छादन असते.

प्रश्न ५ - कारणे दया.

(१) एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्ये आपल्याला विविधता आढळते.

उत्तरे - एकाच प्रक्रारच्या वनस्पतींच्या घटकांचा रंग, आकार किंवा चवीमध्ये फरक आढळतो. त्यामुळे एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्ये आपल्याला विविधता आढळते.

(२) मनिप्लांट, काकडी यांसारख्या वेलींना आधाराची गरज असते.

उत्तर - मनिप्लांट, काकडी या वेलींची खोडे अतिशय लवचिक व मऊ असतात म्हणून त्यांना वाढीसाठी आधाराची गरज असते.

(प्रत्येकी २ गुण)

प्रश्न ६ - खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.

(१) वनस्पतींच्या रचनेतील दोन भाग कोणते ?

उत्तर - वनस्पतींच्या रचनेत दोन मुख्य भाग खालील प्रमाणे आहेत - (१) जमिनीच्या

वर असणारा खोडाचा भाग (२) जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग.

(२) वनस्पतीमध्ये पानाचे महत्त्वाचे कार्य कोणते ?

उत्तर (i) वनस्पतींची पाने पसरट व हिरव्या रंगाची असतात. (ii) पानामधील

हरितद्रव्याच्या साहाय्याने वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून अन्ननिर्मितीमध्ये पानांची भूमिका महत्त्वाची आहे.

(३) प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून वर्गीकरण कसे केल जाते ते सविस्तर

३९. स्पष्ट करा.

उत्तर (i) प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्यांचे भूचर आणि जलचर असे सर्वसाधारण वर्गीकरण केले जाते. (ii) परंतु बेडूक, सॅलेमेंडर, टोड हे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात म्हणून त्यांना उभयचर म्हणतात. (iii) मधमाशी, घार, गरूड यासारखे प्राणी विविध ठिकाणी राहत असले तरी हवेमध्ये संचार करतात. त्याला खेचर असे म्हणतात.

(४) प्रजनन प्रकारावरून मांजरीचे कोणत्या गटात वर्गीकरण करता येईल ?

उत्तर प्रजनन प्रकारावरून मांजरीचे जरायुज म्हणजे पिलांना जन्म देणारे या गटात

वर्गीकरण करता येईल.

(५) टीप लिहा - बहुवार्षिक वनस्पती

(2गुणधर्म

उत्तर - (i) ज्या वनस्पतींचे जीवनचक्र तीन किंवा अधिक वर्षांचे असते त्यांना बहुवार्षिक वनस्पती असे म्हणतात. (ii) ही वृक्षे अनेक वर्षे जगतात व त्यांना अनेक वर्षे कले-फळे येतात. उदा. जास्वंद, कन्हेर, आंबा, गुलमोहर.


Post a Comment

0 Comments